MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Passport Statistics : महाराष्ट्रात किती जणांकडे आहे पासपोर्ट? आणि भारतात? जाणून घ्या पासपोर्ट काढण्याची ऑनलाईन पद्धत

Passport Statistics : महाराष्ट्रात किती जणांकडे आहे पासपोर्ट? आणि भारतात? जाणून घ्या पासपोर्ट काढण्याची ऑनलाईन पद्धत

मुंबई - परदेशात जायचं असेल तर पासपोर्ट असणं गरजेचं आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण महाराष्ट्रात किती जणांकडे पासपोर्ट आहे, कोणत्या राज्यात पासपोर्ट धारकांची संख्या जास्त आहे, भारतात काय आकडेवारी आहे, जाणून घ्या. 

3 Min read
Asianetnews Marathi Stories
Published : Jul 17 2025, 01:16 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
भारतात किती टक्के लोकांकडे पासपोर्ट आहे?

भारतात किती टक्के लोकांकडे पासपोर्ट आहे?

८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत भारतात ९,२६,२४,६६१ पासपोर्ट जारी झाले आहेत आणि सध्या वापरात आहेत. ही संख्या २०२३ च्या ३१ डिसेंबरच्या भारताच्या लोकसंख्येच्या सुमारे ६.५ टक्के आहे. म्हणजेच दर १०० भारतीयांपैकी फक्त ६-७ जणांकडेच पासपोर्ट आहे.

ही आकडेवारी पाहिली तर, भारतात आंतरराष्ट्रीय प्रवास करण्याची संधी अजूनही खूप कमी लोकांनाच उपलब्ध आहे हे लक्षात येतं. अजूनही सुमारे ९३.५ टक्के लोक पासपोर्टशिवाय राहतात.

27
राज्यानुसार पासपोर्ट धारकांची संख्या

राज्यानुसार पासपोर्ट धारकांची संख्या

केरळमध्ये सर्वाधिक पासपोर्ट धारक आहेत. केरळमधील अनेक कुटुंबं परदेशात राहतात, त्यामुळे तिथे आंतरराष्ट्रीय प्रवास जास्त होतो.

पुरुषांमध्ये उत्तर प्रदेशात सर्वाधिक पासपोर्ट धारक आहेत, तर महिलांमध्ये केरळमध्ये सर्वाधिक पासपोर्ट धारक आहेत. ही आकडेवारी राज्यांचा विकास, जागरूकता आणि स्थलांतराच्या ट्रेंड्स दर्शवते.

Related Articles

Related image1
MNS Beats Marwadi Shopkeeper : विक्रोळीतील मारवाडी दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Related image2
Rohit Patil : आमदार रोहित पाटील यांची प्लास्टिक फुलांवर बंदीची मागणी, १०५ आमदारांनी दिला पाठिंबा
37
पासपोर्ट जारी होण्याचं प्रमाण वाढतंय

पासपोर्ट जारी होण्याचं प्रमाण वाढतंय

पासपोर्ट धारकांची संख्या कमी असली तरी २०१४ च्या तुलनेत २०२३ मध्ये दरवर्षी जारी होणाऱ्या पासपोर्टची संख्या दुप्पट झाली आहे. २०२३ मध्ये एकूण १.३७ कोटी पासपोर्ट जारी झाले. ही आकडेवारी भारतीयांच्या प्रवासाच्या संधी वाढत आहेत हेच नव्हे तर सरकारी पासपोर्ट सेवांची पायाभूत सुविधाही सुधारत आहे हे दर्शवते.

47
भारतीय पासपोर्टची ताकद - व्हिसा फ्री देश

भारतीय पासपोर्टची ताकद - व्हिसा फ्री देश

हेन्ली पासपोर्ट इंडेक्स २०२५ नुसार, भारतीय पासपोर्ट धारक ५७ देशांमध्ये व्हिसाशिवाय किंवा ऑन अरायव्हल व्हिसा सुविधेने प्रवास करू शकतात. यात बहुतेक आफ्रिका, दक्षिण आशिया आणि काही छोटी बेटं असलेले देश आहेत.

सिंगापूर , जपान , अमेरिका या देशांच्या पासपोर्टना जास्त महत्त्व आहे. जागतिक प्रवास स्वातंत्र्याच्या बाबतीत भारतीय पासपोर्ट अजूनही खूप मागे आहे.

57
रँकिंगमध्ये भारताची घसरण

रँकिंगमध्ये भारताची घसरण

२०२५ मध्ये भारताचा पासपोर्ट रँकिंग ८५ व्या स्थानावर घसरला आहे. २०२४ मध्ये तो ८० व्या स्थानावर होता, म्हणजे गेल्या चार वर्षांतला सर्वात कमी रँक. या घसरणीमागे अनेक कारणं असू शकतात. भारतासोबत द्विपक्षीय करार करणाऱ्या देशांची संख्या कमी होणं, आंतरराष्ट्रीय धोरणांमध्ये बदल, किंवा भारतीय पासपोर्टवर प्रवास करण्यासाठी अधिक निर्बंध येणं ही काही कारणं असू शकतात.

67
महाराष्ट्रात किती जणांकडे पासपोर्ट
Image Credit : Getty

महाराष्ट्रात किती जणांकडे पासपोर्ट

सर्वाधिक पासपोर्ट केरळच्या लोकांकडे आहे. केरळच्या ३५.३ टक्के लोकांकडे पासपोर्ट आहे. त्यानंतर पंजाबच्या २८.८७ टक्के लोकांकडे पासपोर्ट आहे. त्यानंतर तेलंगणाच्या १४.९८ टक्के लोकांकडे पासपोर्ट आहे. तर महाराष्ट्राच्या ९.७५ टक्के लोकांकडे पासपोर्ट आहे. 

77
आता पासपोर्ट मिळवणे अगदी सोपं झालंय
Image Credit : stockPhoto

आता पासपोर्ट मिळवणे अगदी सोपं झालंय

सरकारने सुरू केलेल्या पासपोर्ट सेवा पोर्टलमुळे नागरिक घरबसल्या पासपोर्टसाठी अर्ज करू शकतात. खाली दिलेल्या सोप्या टप्प्यांद्वारे तुम्ही सहजपणे ऑनलाईन अर्ज करू शकता.

ऑनलाइन पासपोर्टसाठी सोपी पद्धत :

१. अधिकृत वेबसाइटला भेट द्या

www.passportindia.gov.in या वेबसाइटवर जा.

२. नवीन खाते तयार करा / लॉगिन करा

नवीन युजर असल्यास "Register Now" वर क्लिक करून खाते तयार करा.

आधीच युजर असाल तर युजरनेम आणि पासवर्डने लॉगिन करा.

३. अर्ज भरा (Apply for Fresh / Re-issue of Passport)

"Apply for Fresh Passport" किंवा "Re-issue" यापैकी योग्य पर्याय निवडा.

ऑनलाइन अर्ज भरा किंवा PDF फॉर्म डाउनलोड करून नंतर अपलोड करा.

४. अपॉइंटमेंट बुक करा

आपले शहर निवडा आणि जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्रासाठी (PSK) अपॉइंटमेंट बुक करा.

उपलब्ध तारखा आणि वेळांपैकी एक निवडा.

५. शुल्क भरा

नेट बँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा UPI च्या माध्यमातून शुल्क भरा.

सामान्य पासपोर्टसाठी साधारण ₹1500 ते ₹2000 इतके शुल्क लागते.

६. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा / सोबत घेऊन जा

आधार कार्ड, पत्ता पुरावा, जन्माचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसार)

हे कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत किंवा PSK वर मूळ प्रती सोबत घ्याव्यात.

७. PSK वर भेट द्या

अपॉइंटमेंट दिवशी पासपोर्ट सेवा केंद्रावर वेळेवर पोहोचा.

तिथे तुमचे बायोमेट्रिक्स, फोटो आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल.

८. पोलिस व्हेरिफिकेशन

PSK प्रक्रियेनंतर स्थानिक पोलीस स्टेशनमार्फत पोलीस व्हेरिफिकेशन केले जाईल.

यासाठी पोलीस तुमच्या पत्त्यावर भेट देतील.

९. पासपोर्ट घरपोच

सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचा पासपोर्ट स्पीड पोस्टने घरपोच पाठवला जाईल.

सामान्यतः ७-१५ कामकाजाच्या दिवसांत पासपोर्ट प्राप्त होतो.

About the Author

AM
Asianetnews Marathi Stories
राष्ट्रीय बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Mahavitaran Bharti 2025 : तरुणांसाठी सुवर्णसंधी! महावितरणमध्ये 300 पदांवर मेगाभरती, दीड लाखांपर्यंत पगार; अर्ज कसा कराल?
Recommended image2
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडल्यास काय करावं, या पर्यायांनी होईल तजेलदार
Recommended image3
SBI SCO Bharti 2025 : बँकिंग क्षेत्रातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! विना परीक्षा SBI मध्ये मेगाभरती; अर्ज कसा कराल?
Recommended image4
नववर्षात कोकण-गोवा ट्रिप प्लॅन केलीय? रेल्वेची मोठी घोषणा, या मार्गांवर धावणार खास गाड्या वेळापत्रक जाणून घ्या
Recommended image5
एक बाईक तर प्रसिद्ध जर्मन कंपनीची, भारतातील सर्वात स्वस्त सुबारबाईक्स घ्या जाणून
Related Stories
Recommended image1
MNS Beats Marwadi Shopkeeper : विक्रोळीतील मारवाडी दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Recommended image2
Rohit Patil : आमदार रोहित पाटील यांची प्लास्टिक फुलांवर बंदीची मागणी, १०५ आमदारांनी दिला पाठिंबा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved