Parenting Tips ! या 5 सोप्या गोष्टी करा, मुले परीक्षेत सहज जास्त मार्क मिळवतील!
Parenting Tips : अनेकदा मुलांना परिक्षेत अपेक्षित यश मिळत नाही. त्यानंतर मुलांसह पालकांनाही निराशा येते. त्यामुळे मुलांना परीक्षेत चांगले गुण मिळावेत यासाठी पालकांनी कोणत्या गोष्टी कराव्यात, हे येथे जाणून घेऊया.

परीक्षेत यशासाठी पॅरेंटिंग टिप्स
मुलांनी चांगला अभ्यास करणे म्हणजे फक्त खूप अभ्यास करणे नाही, तर हुशारीने अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी अभ्यास, खेळ आणि विश्रांती यात संतुलन ठेवा. तरच ते परीक्षेत चांगले गुण मिळवतील.
टाइम टेबल बनवा!
खेळण्यासाठी, अभ्यासासाठी आणि विश्रांतीसाठी योग्य वेळ ठरवून त्याचे पालन करायला लावा. यामुळे मुले चांगली कामगिरी करतील. फक्त अभ्यासासाठी वेळ दिल्यास त्यांना अभ्यासात रस राहणार नाही. जास्त वेळ अभ्यास केल्याने ते थकतील.
पोमोडोरो टेक्निक वापरा
यामध्ये ठराविक वेळ अभ्यास करून थोडा ब्रेक घेतला जातो. उदा. 25 मिनिटे अभ्यास केल्यास 5 मिनिटांचा ब्रेक. हे तंत्र मुलांची एकाग्रता वाढवते आणि अभ्यासात आवड निर्माण करते. मुलांना जास्त वेळ अभ्यास करायला लावू नका.
नोट्स आणि माइंड मॅप
संपूर्ण पुस्तक पुन्हा पुन्हा वाचण्याऐवजी छोटे नोट्स काढून अभ्यास करणे सोपे असते. मुलांना समजून वाचायला शिकवा. महत्त्वाचे शब्द लक्षात ठेवणे, थोडक्यात नोट्स काढणे यासाठी मुलांना प्रोत्साहन द्या. यामुळे अभ्यास जास्त काळ लक्षात राहतो.
अभ्यासाची जागा बदला
मुलांना नेहमी घरातच न बसवता, मोकळ्या हवेत किंवा बागेत अभ्यासाला बसवा. यामुळे त्यांना अभ्यास लक्षात ठेवायला मदत होईल. मुले अभ्यास करत असताना पालकांनीही त्यांच्यासोबत बसून वर्तमानपत्र किंवा पुस्तक वाचावे. यामुळे मुलांना प्रोत्साहन मिळेल.

