विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला अंध क्रिकेट संघाला तब्बल 5 कोटींचे बक्षीस
रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरमन नीता अंबानी यांनी 'युनायटेड इन ट्रायम्फ' कार्यक्रमात भारताच्या तीन विश्वचषक विजेत्या क्रिकेट संघांचा सन्मान केला. या विशेष प्रसंगी त्यांनी अंध महिला क्रिकेट संघाला 5 कोटी रुपयांचे बक्षीस दिले.

विश्वचषक विजेत्या संघाचा सन्मान
रिलायन्स कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या पत्नी आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरमन नीता अंबानी यांनी सोमवारी 'युनायटेड इन ट्रायम्फ' कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वात विश्वचषक विजेत्या संघाचा सन्मान केला.
बक्षीसाची घोषणा
त्यांनी भारताच्या तीन विश्वचषक विजेत्या संघांचे - पुरुष संघ, महिला संघ आणि अंध महिला संघाचे आभार मानले. याचवेळी त्यांनी अंध महिला क्रिकेट संघासाठी 5 कोटींच्या बक्षीसाची घोषणा केली.
नीता अंबानी काय म्हणाल्या..
त्यांनी दाखवलेल्या उत्कृष्ट खेळाबद्दल आणि वचनबद्धतेसाठी आम्ही महिला अंध क्रिकेट संघाला 5 कोटी रुपयांचे बक्षीस देताना खूप आनंदी आहोत, असे नीता अंबानी म्हणाल्या.
उपस्थित लोकांचे डोळे पाणावले...
जेव्हा नीता अंबानी यांनी ही घोषणा केली, तेव्हा तिथे उपस्थित लोकांचे डोळे पाणावले. अंध क्रिकेट संघाच्या खेळाडूंच्या डोळ्यातही अश्रू आलेले दिसले.
हा चेक घ्या....
हा चेक घ्या. हे सर्व तुमचेच आहे. आणखी खेळा. आणखी वाचा. आणखी कप जिंका, असे म्हणत नीता अंबानी यांनी चेक देताना खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
सर्व एकाच छताखाली
"मला वाटते की आपण नवीन वर्षाची सुरुवात एका खूप खास प्रसंगाने करत आहोत. तीन क्रिकेट संघ - पुरुष क्रिकेट संघ, महिला क्रिकेट संघ आणि भारताचा अंध महिला क्रिकेट संघ - सर्व एकाच छताखाली आहेत. प्रत्येक भारतीयाच्या वतीने, आम्हाला इतका आनंद दिल्याबद्दल आम्ही आज रात्री त्यांचा सन्मान करणार आहोत," असे त्या म्हणाल्या.
मनं आणि भारताला खेळ एकत्र आणतो
खेळाची अनोखी शक्ती आणि त्याच्या परिवर्तनीय प्रभावाबद्दल बोलताना नीता अंबानी म्हणाल्या, "खेळ मनं आणि भारताला एकत्र आणतो. आज आपण विजयाच्या उत्सवात एकत्र आलो आहोत. आपण त्यांचा आणि त्यांच्या विजयांचा उत्सव साजरा करणार आहोत."
ऐतिहासिक विजय
या सोहळ्याचे केंद्रबिंदू भारताचे तीन विश्वचषक विजेते कर्णधार - रोहित शर्मा, हरमनप्रीत कौर आणि दीपिका टीसी होते. त्यांच्या नेतृत्व आणि विश्वासाने ऐतिहासिक विजय मिळवून देशाला प्रेरणा दिली.
कोण होत उपस्थित
विश्वचषक विजेत्या संघातील जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स आणि गंगा कदम, क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि रविचंद्रन अश्विन, तसेच ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक दिग्गज मुरलीकांत पेटकर, दीपा मलिक आणि देवेंद्र झाझरिया उपस्थित होते.
अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांची उपस्थिती
भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रमुख व्यक्ती अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्या उपस्थितीने भारताच्या सर्वात प्रतिष्ठित व्यक्तींचा एक दुर्मिळ आणि प्रभावी संगम घडवून आणला.