आज दुपारी 3.15 पासून या 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस, पिता-पुत्रामुळे बंपर लाभ
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य आपला पुत्र शनीच्या राशीत प्रवेश करणार आहे. यावर्षी सूर्य दुपारी 3.15 वाजता मकर राशीत प्रवेश करेल. त्यामुळे काही राशींसाठी हे फलदायी ठरू शकतो. कोणत्या आहेत या राशी.जाणून घेऊया या लेखात

सूर्य आणि शनी
आज 14 जानेवारी म्हणजेच उत्तरायण (मकर संक्रांत). आज सूर्यदेव आपला पुत्र शनीच्या राशीत प्रवेश करत आहेत. ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि शनी पिता-पुत्र असले तरी शत्रू मानले जातात. पण मकर संक्रांतीला पिता सूर्य पुत्र शनीच्या राशीत प्रवेश करतो. यावर्षी हा योग आज म्हणजेच 14 जानेवारीला होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि शनीचा हा संयोग तीन राशींसाठी फायदेशीर ठरेल.
वृषभ राशी
वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्याचा शनीच्या राशीत प्रवेश शुभ परिणाम देऊ शकतो. आर्थिक स्थिती सुधारेल. कमाईच्या नवीन संधी मिळतील. जुन्या गुंतवणुकीतून किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून लाभाची शक्यता आहे. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात गोडवा राहील. नाती अधिक घट्ट होतील. आरोग्याच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.
तूळ राशी
तूळ राशीच्या लोकांसाठी शनी आणि सूर्याचा हा संयोग शुभ संकेत घेऊन येईल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. नवीन दुकान, कारखाना किंवा नवीन काम सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे. तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे.
मीन राशी
मीन राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि शनीचा हा संयोग फायदेशीर ठरू शकतो. आर्थिक बाजू मजबूत होईल. अचानक आर्थिक लाभाची शक्यता आहे. तुम्ही भविष्यासाठी नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. तुम्हाला संपत्ती किंवा जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल.

