Mahindra : महिंद्रा 2026 पर्यंत आपली लोकप्रिय एसयूव्ही XUV700 चे फेसलिफ्ट आणि XEV 7e नावाची नवीन 7-सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे.
Mahindra : या वर्षी स्वातंत्र्यदिनी, महिंद्रा अँड महिंद्राने त्यांचे नवीन NU_IQ मोनोकॉक प्लॅटफॉर्म आणि व्हिजन टी, व्हिजन एक्स, आणि व्हिजन एसएक्सटी या चार एसयूव्ही संकल्पना सादर केल्या. या सर्व कॉनसेप्ट एसयूव्ही NU_IQ आर्किटेक्चरवर आधारित आहेत. स्कॉर्पिओ कुटुंबातील कॉम्पॅक्ट एसयूव्ही, थार इलेक्ट्रिक एसयूव्ही, न्यू-जनरेशन XUV 3XO आणि ऑफ-रोड फोकस्ड एसयूव्हीसाठी हा बेस म्हणून राहण्याची शक्यता आहे. व्हिजन एसयूव्ही संकल्पनांचे प्रोडक्शन-रेडी मॉडेल 2027 पासून बाजारात येण्यास सुरुवात होईल.
याशिवाय, 2026 च्या सुरुवातीलाच लोकप्रिय स्कॉर्पिओ N आणि XUV700 एसयूव्ही अपडेट करण्याचीही कंपनीची योजना आहे. महिंद्रा XEV 9e ची तीन-रो आवृत्ती देखील तयार होत आहे. महिंद्रा XEV 7e नावाची ही इलेक्ट्रिक एसयूव्ही XEV 9e आणि आयसीईवर चालणाऱ्या XUV700 सोबत डिझाइन शेअर करेल. जर तुम्ही 7-सीटर फॅमिली कार किंवा एसयूव्ही शोधत असाल, तर आगामी 2026 मध्ये महिंद्रा XUV700 फेसलिफ्ट आणि XEV 7e यांचा विचार करू शकता.

2026 महिंद्रा XUV 700 फेसलिफ्ट
नव्या महिंद्रा XUV 700 मध्ये काही नवीन वैशिष्ट्यांसह किरकोळ कॉस्मेटिक बदल अपेक्षित आहेत. एसयूव्हीमध्ये नवीन डिझाइनची ग्रील, सुधारित ट्विन बॅरल प्रोजेक्टर हेडलॅम्प, नवीन एलईडी डीआरएल सिग्नेचर आणि नवीन अलॉय व्हील्स असतील. आतमध्ये, 2026 महिंद्रा XUV700 फेसलिफ्टमध्ये नवीन ट्रिपल स्क्रीन सेटअप (XEV 9e मधून घेतलेले), हरमन कार्डन ऑडिओ सिस्टीम आणि नवीन स्टीयरिंग मिळण्याची शक्यता आहे. नवीन XUV 700 मध्ये सध्याचे 197bhp, 2.0L टर्बो पेट्रोल आणि 185bhp, 2.2L डिझेल इंजिन कायम राहतील. ट्रान्समिशन पर्याय देखील तेच राहतील, म्हणजेच 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक निवडक व्हेरिएंटमध्ये ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टीम उपलब्ध असेल.

महिंद्रा XEV 7e
लीक झालेल्या फोटोंनुसार, महिंद्रा XEV 7e आणि XEV 9e मध्ये बरेच साम्य असेल. या 7-सीटर एसयूव्हीमध्ये क्लोज-ऑफ ग्रील, एलईडी हेडलॅम्प, कनेक्टेड एलईडी डीआरएल आणि एलईडी फॉग लॅम्प यांसारखी वैशिष्ट्ये समोरच्या बाजूला असतील. नवीन एअरो-ऑप्टिमाइज्ड 19-इंच अलॉय व्हील्स वगळता, बाजूचा आणि मागचा भाग XUV700 सारखाच असेल.
महिंद्रा XEV 7e मध्ये तीन-रो सीटिंग कॉन्फिगरेशन असेल आणि तिची बहुतेक वैशिष्ट्ये XEV 9e सोबत शेअर केली जातील. या ईव्हीमध्ये ट्रिपल स्क्रीन, टू-स्पोक स्टीयरिंग व्हील, फ्रंट पॉवर आणि व्हेंटिलेटेड सीट्स, मल्टी-झोन क्लायमेट कंट्रोल, 16-स्पीकर हरमन कार्डन ऑडिओ सिस्टीम, ADAS आणि बरेच काही मिळण्याची शक्यता आहे. 59kWh आणि 79kWh बॅटरी पॅक पर्यायांसह येणाऱ्या XEV 9e मधून पॉवरट्रेन सेटअप घेतला जाऊ शकतो.


