लॅपटॉप आणि फोनची स्क्रिन सॅनिटायझरने करता स्वच्छ? वाचा सविस्तर

| Published : Jan 02 2025, 08:19 AM IST

Laptop Screen Cleaning
लॅपटॉप आणि फोनची स्क्रिन सॅनिटायझरने करता स्वच्छ? वाचा सविस्तर
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

लॅपटॉप आणि मोबाइलची स्क्रिन स्वच्छ करण्यासाठी क्लिनिंग सॉल्यूशनचा वापर करावा. पण स्क्रिन स्वच्छ करण्यासाठी विचार न करता सॅनिटायझर स्प्रे करत असाल तर मोठी समस्या उद्भवू शकते.

Tech Tips : सध्या प्रत्येकजण मोबाइल किंवा लॅपटॉपच्या स्क्रिनवर दिवसभरातील अधिक वेळ घालवतो. यामुळे स्क्रिनवरील गोष्टी स्पष्ट दिसण्यासाठी त्याची काच स्वच्छ केली जाते. यासाठी खास क्लिनिंग सॉल्यूशन येतात. पण बहुतांशजण आपल्या डिवाइसची स्क्रिन स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करतात. तुम्ही देखील सॅनिटायझरने स्क्रिन स्वच्छ करता का? याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...

सॅनिटायझरने स्क्रिन स्वच्छ करणे टाळा

सॅनिटायझरमध्ये काही रासायनिक तत्त्व जसे की, अल्कोहोल आणि अन्य तत्त्व असतात. यामुळे स्क्रिनचे नुकसान होऊ शकते. अत्याधिक प्रमाणात सॅनिटायझरचा स्क्रिनसाठी वापर केल्यास डिवाइसमध्ये टेक्निकल समस्या उद्भवू शकते.

स्क्रिन भुरकट होऊ शकते

सॅनिटायझरमध्ये असणाऱ्या केमिकलमुळे स्क्रिन भुरकट होऊ शकते. यामुळे डिवाइस वारंवार स्वच्छ करावे लागू शकते. सॅनिटायझरने स्क्रिन स्वच्छ केल्यास ती चिकटही होऊ शकते. याशिवाय स्क्रिनची संवेदनशीलता कमी होण्यासह अस्वच्छ लेअरही त्यावर तयार होऊ शकते.

डिवाइस स्क्रिन गार्ड होईल खराब

सॅनिटायझरने स्क्रिन स्वच्छ केल्यास त्यावर लावण्यात आलेले स्क्रिन गार्ड खराब होईल. यामधील रासायनिक तत्त्वे स्क्रिन गार्डला नुकसान पोहोचवू शकतात.

आणखी वाचा : 

WhatsApp वर करता येणार कॉल शेड्यूल, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

तुमच्या आधार कार्डवर किती SIM Card रजिस्टर्ड? असे काढा शोधून