तुमच्या आधार कार्डवर किती सिम कार्ड रजिस्टर्ड आहेत हे तुम्हाला माहितेय का? कारण एकापेक्षा अधिक सिम कार्ड नावावर असल्यास कायदेशीर समस्या उद्भवू शकतात.
भारतात एका व्यक्तीच्या नावावर अधिकाधिक 9 सिम कार्ड रजिस्टर्ड असू शकतात. काही ठिकाणी जसे की, जम्मू-काश्मीर आणि आसाम येथे सिम कार्डची संख्या 6 आहे.
तुमच्या नावावर 9 पेक्षा अधिक सिम कार्ड असल्यास दंडात्मक कार्यवाही किंवा शिक्षाही होऊ शकते.
तुमच्या आधार कार्डवर किती सिम कार्ड रजिस्टर्ड आहेत हे शोधायचे असल्यास संचार साथी वेबसाइटचा वापर करू शकता.
संचार साथीच्या वेबसाइटवर जाऊन मोबाइल क्रमांक, कॅप्चा आणि ओटीपी घाला. यानंतर आधार कार्ड संबंधित संपूर्ण लिस्ट दिसेल.
फसवणूक करुन सिम घेतल्यास 3 वर्षांची शिक्षा किंवा 50 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो.
मर्यादेपेक्षा अधिक सिम कार्ड घेतल्यास 50 हजारांचा दंड होऊ शकतो. यानंतर प्रत्येक वेळी दंड 2 लाख रुपयांपर्यंत वाढली जाऊ शकतो.
नवीन वर्षात काय बदल होणार, १ जानेवारीपासून अंमलबजावणीला सुरुवात
सोन्याचे दर: प्रमुख शहरांमध्ये आजचे 24 कॅरेट सोन्याचे दर घ्या जाणून
नोकऱ्यांचा भडिमार!, पुढील 5 वर्षांत TATA ग्रुप देईल 5 लाख नवीन नोकऱ्या
जानेवारीत 15 दिवस बँका बंद राहणार, सुट्ट्या कधी आहेत हे जाणून घ्या