Kawasaki Z1100 Launched in India : जपानची प्रसिद्ध कंपनी कावासाकीने नवीन सुपरनेकेड मोटरसायकल Z1100 भारतीय बाजारात आणली आहे. या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 12.79 लाख रुपये आहे. ही बाईक 1,099 सीसी इंजिन, आधुनिक फीचर्स आणि आक्रमक 'सुगोमी' डिझाइनसह येते.
Kawasaki Z1100 Launched in India : जपानची प्रसिद्ध टू-व्हीलर कंपनी कावासाकीने आपली नवीन सुपरनेकेड मोटरसायकल Z1100 भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. तिची एक्स-शोरूम किंमत 12.79 लाख रुपये आहे. बऱ्याच काळापासून बंद झालेल्या Z1000 ची जागा घेणारे हे मॉडेल आहे. यात मोठे इंजिन, आधुनिक तंत्रज्ञान आणि मेकॅनिकल पार्ट्स वापरण्यात आले आहेत. तसेच, कंपनीचे खास 'सुगोमी' डिझाइन कायम ठेवण्यात आले आहे.
Z1100 मध्ये कावासाकीच्या नेकेड सिरीजची ओळख असलेले आक्रमक स्टाइलिंग कायम ठेवण्यात आले आहे. ड्युअल LED हेडलॅम्प, शार्प टेल सेक्शन आणि दमदार फ्युएल टँकमुळे बाईकला संतुलित आणि स्पोर्टी लूक मिळतो. बाईकचा एकूण लूक कंपनीच्या सिग्नेचर डिझाइनशी मिळताजुळता आहे.
या मोटरसायकलमध्ये निंजा 1100SX मधून घेतलेले 1,099 सीसी, लिक्विड-कूल्ड, इनलाइन-फोर इंजिन आहे. हे इंजिन 9,000 rpm वर 136 bhp पॉवर आणि 7,600 rpm वर 113 Nm टॉर्क निर्माण करते. यात 6-स्पीड गिअरबॉक्स आहे, जो कावासाकीच्या क्विक शिफ्टर सिस्टीमसह येतो. यामुळे क्लचशिवाय गिअर बदलता येतात. ही बाईक निंजा 1100SX च्याच ॲल्युमिनियम फ्रेमवर बनवली आहे आणि आंतरराष्ट्रीय मॉडेलप्रमाणे तिचे वजन 221 किलो आहे.
रायडरसाठी उत्तम
कावासाकी Z1100 मध्ये रायडरसाठी आवश्यक असलेली सर्व महत्त्वाची फीचर्स आहेत, जी नवीन 5-इंचाच्या TFT कन्सोलद्वारे नियंत्रित केली जातात. रायडरच्या मदतीसाठी यात 5-ॲक्सिस IMU, 3-लेव्हल ट्रॅक्शन कंट्रोल, दोन पॉवर मोड, क्रूझ कंट्रोल, बाय-डायरेक्शनल क्विकशिफ्टर आणि ड्युअल-चॅनल ABS सारखी प्रमुख फीचर्स आहेत.
उत्तम राइड क्वालिटी आणि अचूक हँडलिंगसाठी, मोटरसायकलच्या दोन्ही बाजूंना पूर्णपणे ॲडजस्टेबल शोवा सस्पेन्शन दिले आहे. ब्रेकिंगसाठी टोकिको कॅलिपर्स वापरले आहेत. बाईकमध्ये पुढच्या बाजूला 120/70-ZR17 आणि मागच्या बाजूला 190/50-ZR17 साईजचे डनलॉप स्पोर्टमॅक्स Q5A टायर्स मिळतात.


