iPhone 17 Pro चा 256 GB व्हेरिएंट ॲपलने भारतात 1,34,900 रुपयांना लाँच केला होता. पण आता ॲपल iPhone 17 Pro वर 5,000 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक देत आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षांनिमित्त ही खास सवलत मिळत आहे.
दिल्ली: ॲपलप्रेमींसठी ख्रिसमस व नवीन वर्षांनिमित्त खास बातमी आहे. नवीन iPhone 17 Pro खरेदी करू इच्छित असाल तर दोन उत्तम डील्स तुमच्यासमोर उपलब्ध असतील. तुम्ही iPhone 17 Pro वर मोठी सवलत मिळवू शकता. ॲपल आणि विजय सेल्स iPhone 17 Pro वर ऑफर देत आहेत. iPhone 17 Pro हा ॲपलच्या सर्वात शक्तिशाली फ्लॅगशिप मोबाईल फोनपैकी एक आहे.
iPhone 17 Pro वर ॲपलची डील
iPhone 17 Pro चा 256 GB व्हेरिएंट ॲपलने भारतात 1,34,900 रुपयांना लाँच केला होता. पण आता ॲपल iPhone 17 Pro वर 5,000 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक देत आहे. ही ऑफर पात्र अमेरिकन एक्सप्रेस, ॲक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक कार्डांवर उपलब्ध आहे. ॲपल स्टोअरमधून ऑनलाइन आणि ऑफलाइन iPhone 17 Pro खरेदी करताना हा इन्स्टंट कॅशबॅक मिळेल. ॲपल ट्रेड-इन प्रोग्रामद्वारे जुन्या आयफोनवर 64,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. एक्सचेंजची किंमत फोनच्या मॉडेल आणि स्थितीनुसार ठरवली जाईल. जे आता iPhone 17 Pro खरेदी करतील, त्यांना कंपनी तीन महिन्यांसाठी ॲपल म्युझिक, ॲपल टीव्ही+ आणि ॲपल आर्केडचे फायदेही देत आहे. जर तुम्ही ॲपल इकोसिस्टमचे चाहते असाल, तर तुम्हाला हे फायदे नक्कीच आवडतील.
विजय सेल्सची iPhone 17 Pro डील
दुसरीकडे, रिटेलर विजय सेल्स iPhone 17 Pro वर 5,000 रुपयांची इन्स्टंट सवलत देत आहे. ही इन्स्टंट सवलत फक्त निवडक बँक कार्डांवर उपलब्ध आहे, जसे की आयसीआयसीआय, एसबीआय आणि आयडीएफसी फर्स्ट बँक. कार्डनुसार विजय सेल्स नो-कॉस्ट ईएमआयची सुविधाही देत आहे.
iPhone 17 Pro ची वैशिष्ट्ये
iPhone 17 Pro मध्ये 120Hz प्रोमोशनसह 6.3-इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर ओएलईडी डिस्प्ले आहे. A19 प्रो चिपवर चालणाऱ्या या फोनमध्ये सुधारित थर्मल डिझाइन आणि वेपर चेंबर कूलर आहे. यात 48-मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. iPhone 17 Pro मध्ये 4x ऑप्टिकल झूम आणि 8x ऑप्टिकल-क्वालिटी झूमसह सुधारित टेलीफोटो लेन्स देखील आहे. फोनमध्ये प्रो-लेव्हल व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा आहे. सेल्फीसाठी iPhone 17 Pro मध्ये 18MP कॅमेरा देण्यात आला आहे. ॲपलने अपग्रेड केलेल्या बॅटरीसोबत 40W फास्ट चार्जिंग आणि 25W वायरलेस चार्जिंगची सुविधा दिली आहे.


