MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • सावधान! तुमच्या गाडीची 'HSRP' नंबर प्लेट बनावट तर नाही ना? अशी ओळखा खरी प्लेट; 'या' ६ चुका टाळा

सावधान! तुमच्या गाडीची 'HSRP' नंबर प्लेट बनावट तर नाही ना? अशी ओळखा खरी प्लेट; 'या' ६ चुका टाळा

How To Identify Fake HSRP Number Plate : सरकारने हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) अनिवार्य केली असली तरी, बनावट प्लेट्सचे रॅकेट सक्रिय झाले. या बनावट प्लेट्समुळे वाहनधारकांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे खरी HSRP प्लेट कशी ओळखावी

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Dec 27 2025, 04:50 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
सावधान! तुमच्या गाडीची 'HSRP' नंबर प्लेट बनावट तर नाही ना?
Image Credit : Social Media

सावधान! तुमच्या गाडीची 'HSRP' नंबर प्लेट बनावट तर नाही ना?

मुंबई : वाहन चोरीला लगाम लावण्यासाठी सरकारने 'हाय सिक्युरिटी नंबर प्लेट' (HSRP) अनिवार्य केली असली, तरी आता यातही फसवणुकीचे मोठे रॅकेट सक्रिय झाले आहे. काही टोळ्या हुबेहूब दिसणाऱ्या बनावट (Duplicate) नंबर प्लेट्स बनवून वाहनधारकांची फसवणूक करत आहेत. तुमची नंबर प्लेट अधिकृत आहे की नाही, हे वेळीच ओळखले नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. 

25
बनावट नंबर प्लेटचा असा होतोय खेळ
Image Credit : gemini

बनावट नंबर प्लेटचा असा होतोय खेळ

अनेक वाहनधारक वेळ वाचवण्यासाठी किंवा स्वस्त मिळते म्हणून स्थानिक मेकॅनिककडून नंबर प्लेट बनवून घेतात. मात्र, या प्लेट्स केवळ दिसण्यापुरत्या 'हाय सिक्युरिटी' असतात. आरटीओच्या रेकॉर्डवर त्यांची नोंद नसल्याने पोलीस तपासणीत तुमचे वाहन संशयास्पद ठरू शकते.

Related Articles

Related image1
पुणेकरांसाठी गुड न्यूज! नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मध्य रेल्वेने सोडल्या 'स्पेशल' गाड्या; पाहा संपूर्ण वेळापत्रक
Related image2
Hinjewadi Metro : पुणेकरांची प्रतीक्षा लांबली! डेडलाईन हुकली पण मेट्रो धावणार; 'हा' नवा प्लॅन आला समोर
35
खरी नंबर प्लेट कशी ओळखाल? (हे ६ नियम विसरू नका)
Image Credit : our own

खरी नंबर प्लेट कशी ओळखाल? (हे ६ नियम विसरू नका)

१. फक्त ऑनलाइन बुकिंग: नंबर प्लेटसाठी नेहमी अधिकृत वेबसाइटचा (उदा. transport.maharashtra.gov.in) वापर करा.

२. रोख व्यवहार पूर्णपणे बंद: HSRP साठीची फी केवळ ऑनलाइनच भरावी लागते. जर एखादा डीलर किंवा एजंट 'कॅश' मागत असेल, तर समजा काहीतरी गडबड आहे.

३. कागदपत्रांची पडताळणी: अधिकृत डीलर प्लेट बसवण्यापूर्वी तुमच्या वाहनाचा चेसिस नंबर आणि मूळ कागदपत्रांची बारकाईने तपासणी करतो.

४. लेझर कोडचे गुपित: नंबर प्लेट बसवल्यानंतर vahan.parivahan.gov.in वरून तुमच्या आरसीची (RC) प्रिंट काढा. तुमच्या आरसीवरील लेझर कोड आणि नंबर प्लेटवरील लेझर कोड एकच असणे अनिवार्य आहे.

५. नोंदणीची खात्री: जर तुमच्या आरसीवर लेझर कोड दिसत नसेल, तर तुमची नंबर प्लेट बनावट असण्याची दाट शक्यता आहे.

६. तक्रार कुठे करावी? कोडमध्ये तफावत आढळल्यास त्वरित परिवहन विभागाच्या अधिकृत पोर्टलवर तक्रार नोंदवा. 

45
जुन्या वाहनांसाठी काय प्रक्रिया आहे?
Image Credit : our own

जुन्या वाहनांसाठी काय प्रक्रिया आहे?

१ एप्रिल २०१९ पूर्वीच्या गाड्यांना ही प्लेट बसवणे अनिवार्य आहे. यासाठीची सोपी पद्धत खालीलप्रमाणे

SIAM पोर्टल: 'SIAM' च्या अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमच्या घरा जवळच्या डीलरची निवड करा.

स्लॉट बुकिंग: ऑनलाइन फी भरल्यानंतर तुम्हाला हवी ती तारीख आणि वेळ निवडून तुम्ही डीलरकडे जाऊन अवघ्या काही मिनिटांत प्लेट बसवू शकता.

55
महत्त्वाची टीप
Image Credit : our own

महत्त्वाची टीप

बनावट नंबर प्लेटमुळे तुमचे वाहन गुन्हेगारी कामात वापरले गेल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता. त्यामुळे अधिकृत डीलरकडूनच प्लेट बसवून घ्या आणि लेझर कोडची खात्री नक्की करा.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
नव्या वर्षाची धमाकेदार भेट! देशातील पहिली 'वंदे भारत स्लीपर' ट्रेन धावणार; गुवाहाटी ते कोलकाता प्रवास आता हाय-टेक
Recommended image2
केसांचे आरोग्य: तुम्ही जास्त शाम्पू वापरता? जाणून घ्या धोकादायक परिणाम
Recommended image3
जादुई पेय: रोज सकाळी हे पेय प्या, तुम्हाला अवघ्या एका महिन्यात केसांची वाढ दिसेल
Recommended image4
LIC: वर्षाला १ लाख रुपये गॅरंटीड पेन्शन, जाणून घ्या एलआयसीची जबरदस्त स्कीम
Recommended image5
सावधान! घरमालक आणि भाडेकरूंसाठी आजपासून नवे नियम लागू; दुर्लक्ष केल्यास बसणार ५,००० रुपयांचा फटका
Related Stories
Recommended image1
पुणेकरांसाठी गुड न्यूज! नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मध्य रेल्वेने सोडल्या 'स्पेशल' गाड्या; पाहा संपूर्ण वेळापत्रक
Recommended image2
Hinjewadi Metro : पुणेकरांची प्रतीक्षा लांबली! डेडलाईन हुकली पण मेट्रो धावणार; 'हा' नवा प्लॅन आला समोर
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved