Online Fraud : ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यास काय कराल? जाणून घ्या पैसे परत मिळवण्याचे पर्याय

| Published : Apr 09 2024, 03:56 PM IST

Online Fraud
Online Fraud : ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यास काय कराल? जाणून घ्या पैसे परत मिळवण्याचे पर्याय
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

ऑनलाईन आर्थिक व्यवहार वाढल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने अनेकांना गंडा घालून आर्थिक फसवणूक होत असल्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र अशा प्रकारे ऑनलाईन फसवणूक झाल्यास पैसे परत मिळवण्यासाठी काय करावे याच्या मार्गदर्शक सूचना रिझर्व्ह बँकेने जारी केल्या आहेत.

Delhi I अलीकडील काळामध्ये ऑनलाईन आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. हातोहाती मोबाईल आल्यामुळे अनेकजण डिजिटल पेमेंटला प्राधान्य देताना दिसतात. मात्र हीच संधी साधून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे चोरटेदेखील आता ऑनलाईन पद्धतीने आर्थिक फसवणूक करत आहेत. या फसवणुकीला आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक वेळोवेळी पावले उचलत आहे. फसवणूक होऊ नये यासाठी तसेच फसवणूक झाल्यास पुढे काय करावे यासाठी रिझर्व्ह बँकेने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आर्थिक फसवणूक झाल्यास गेलेले पैसे पुन्हा मिळवण्यासाठी या सूचनांचे पालन करायला हवे.

ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यास काय कराल?

तुमची नकळतपणे ऑनलाईन फसवणूक झाल्यास तुम्ही याविषयी बँकेकडे तक्रार नोंदवू शकता. फसवणूक झाल्यावर तीन दिवसांच्या आतमध्ये याविषयी बँकेला माहिती द्यावी. ४ ते ७ दिवसांमध्येदेखील फसवणुकीची माहिती बँकेला दिल्यास तुमचे पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. याव्यतिरिक्त एखाद्या तिऱ्हाईत व्यक्तीने किंवा संस्थेने तुमच्या खात्यातून पैसे काढले आणि याला तुम्ही किंवा बँक जबाबदार नसेल तरीसुद्ध तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात.

पैसे परत कसे मिळवाल? 

रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईननुसार जर तुमचे फसवणूक झालेले पैसे देण्यास बँकेने मनाई केली तर तुम्ही खालील मार्गदर्शक सूचना पाळाव्यात

  1. ऑनलाईन फसवणूक झाल्यास सर्वप्रथम तुमच्या जवळच्या पोलिसांत याविषयी तक्रार नोंदवा. एफआयआर किंवा तक्रार यापैकी काहीही नोंद केले तरी चालू शकते.
  2. यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी बँकेत जाऊन फसवणुकीची तक्रार द्यावी तसेच त्यासोबत पोलिसांत दिलेली तक्रारदेखील जोडावी.
  3. या दोन्ही तक्रारींची सॉफ्ट कॉपी रिझर्व्ह बँकेच्या crpc@rbi.org.in या ईमेल आयडीवर तसेच तुमच्या बँकेच्या ईमेल आयडीवर पाठवावी. हि सर्व प्रक्रिया तुमची फसवणूक झाल्यापासून ३ दिवसांच्या आत व्हायला हवी.