MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Senior Citizen Railway : रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना लोअर बर्थ कसा मिळेल? जाणून घ्या नियम

Senior Citizen Railway : रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना लोअर बर्थ कसा मिळेल? जाणून घ्या नियम

भारतीय रेल्वे ज्येष्ठ नागरिक आणि ठराविक वयाच्या महिलांना लोअर बर्थ (खालचा बर्थ) देण्याला प्राधान्य देते. पण तिकीट बुक करण्यापूर्वी आणि प्रवासादरम्यान तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे.

3 Min read
Author : Karishma R
Published : Oct 26 2026, 11:25 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
ज्येष्ठ नागरिकांना लोअर बर्थसाठी प्राधान्य
Image Credit : our own

ज्येष्ठ नागरिकांना लोअर बर्थसाठी प्राधान्य

लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात वरच्या बर्थवर चढणं आणि उतरणं ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप कठीण जातं. हीच अडचण ओळखून भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंगमध्ये काही प्रवाशांसाठी लोअर बर्थ राखीव ठेवण्याची सुविधा दिली आहे. रेल्वे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे पुरुष आणि ४५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या महिलांना लोअर बर्थ देण्यासाठी प्राधान्य देते. पण याचा अर्थ असा नाही की त्यांना प्रत्येक वेळी लोअर बर्थ मिळेलच. ट्रेनमधील रिकाम्या जागा, बुकिंगच्या वेळी उपलब्ध असलेले बर्थ आणि प्रवासाचा क्लास यावर हे अवलंबून असतं. या नियमानुसार स्लीपर क्लासमध्ये प्रत्येक डब्यात ६ ते ७ लोअर बर्थ, थर्ड एसीमध्ये ४ ते ५ आणि सेकंड एसीमध्ये ३ ते ४ बर्थ या प्रवाशांसाठी राखीव असतात.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
तिकीट काढताना घ्या काळजी
Image Credit : our own

तिकीट काढताना घ्या काळजी

हा कोटा ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील महिला आणि गर्भवती महिलांसाठी एकत्रितपणे काम करतो. त्यामुळे पालकांसाठी तिकीट काढताना त्यांचं वय अचूक टाकणं आणि बर्थचा पर्याय काळजीपूर्वक निवडणं खूप महत्त्वाचं आहे. ऑनलाइन रेल्वे तिकीट बुक करताना प्रवाशाचं नाव आणि वय बरोबर भरायला हवं. वयाच्या आधारावरच लोअर बर्थ दिला जातो, त्यामुळे चुकीचं वय टाकल्यास अडचण येऊ शकते. बर्थ निवडताना तुम्ही ‘Lower Berth’ हा पर्याय निवडू शकता. पण लक्षात ठेवा, हा पर्याय निवडला म्हणजे तुम्हाला लोअर बर्थ नक्की मिळेलच याची कोणतीही खात्री नसते.

Related Articles

Related image1
Life Lessons : आनंदी राहायचंय? मग रेल्वे प्रवासाचा हा नियम नेहमी लक्षात ठेवा
Related image2
Train Ticket Booking : रेल्वे तिकीट ऑनलाईन काढावं की काऊंटरवर? कशात कन्फर्म होण्याची शक्यता जास्त असते?
36
लोअर बर्थचा पर्याय
Image Credit : our own

लोअर बर्थचा पर्याय

काही ऑनलाइन बुकिंग प्लॅटफॉर्म्सवर 'लोअर बर्थ मिळाल्यासच तिकीट बुक करा' असा पर्याय उपलब्ध असतो. हा पर्याय दिसल्यास तुम्ही अटी वाचून त्याचा वापर करू शकता. पण जर लोअर बर्थ रिकामा नसेल, तर तुमचं तिकीट बुक होणार नाही हे लक्षात ठेवा. अशा वेळी तुम्हाला दुसरी ट्रेन किंवा वेगळी वेळ निवडावी लागू शकते. जर तुमचा प्रवास खूप महत्त्वाचा असेल, जसं की हॉस्पिटलची अपॉइंटमेंट किंवा एखादी तातडीची वेळ, तर फक्त लोअर बर्थच्या अट्टाहासापायी बुकिंगला उशीर करू नका. प्रवासाची गरज ओळखून योग्य तो निर्णय घ्या.

46
आवडीचा बर्थ
Image Credit : our own

आवडीचा बर्थ

ट्रेनमधील डब्यांच्या संख्येनुसार लोअर बर्थचा कोटा बदलत असतो. त्यामुळे तुम्ही कोणत्या क्लासमधून प्रवास करत आहात आणि बुकिंग करताना लोअर बर्थ उपलब्ध आहेत का, हे नक्की तपासा. तिकीट बुकिंग सुरू होताच लगेच तिकीट काढल्यास तुम्हाला तुमच्या आवडीचा बर्थ मिळण्याची शक्यता वाढते. तरीही, रेल्वे याची १०० टक्के खात्री देत नाही.

56
वृद्ध पालकांसोबत प्रवास
Image Credit : our own

वृद्ध पालकांसोबत प्रवास

तुम्ही वृद्ध पालकांसोबत प्रवास करत असाल, तर एकाच बुकिंगमध्ये सर्वांना लोअर बर्थ मिळेल असा विचार करू नका. प्रवाशांची संख्या, उपलब्ध बर्थ आणि रेल्वेचे नियम यावरच जागा दिल्या जातात. जर तुम्हाला पालकांच्या जवळ बसून त्यांना मदत करायची असेल, तर तिकीट बुक झाल्यानंतर मिळालेले बर्थ नंबर तपासा आणि त्यानुसार आधीच नियोजन करा. तिकीट कन्फर्म होण्यापूर्वीच आपल्याला हवा तो बर्थ मिळाला आहे, असा गैरसमज करून घेऊ नका.

66
प्रवासात रिकामा लोअर बर्थ
Image Credit : Google

प्रवासात रिकामा लोअर बर्थ

बुकिंग करताना तुम्हाला मिडल किंवा अप्पर बर्थ मिळाला असेल आणि प्रवासादरम्यान एखादा लोअर बर्थ रिकामा असेल, तर काय करायचं हे अनेकांना माहीत नसतं. प्रवासात लोअर बर्थ रिकामा राहिल्यास तो ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि गर्भवती महिलांना प्राधान्याने देण्याचा रेल्वेचा नियम आहे. यासाठी तुम्ही तिकीट तपासनीसाशी (TTE) बोलून तुमची अडचण सांगू शकता. पण यासाठी जागा रिकामी असणं आणि रेल्वेच्या नियमात बसणं गरजेचं आहे. बर्थ बदलून मिळेलच याची कोणतीही शाश्वती नसते. रेल्वे स्टेशनवर मदतीची गरज असल्यास, तुम्ही व्हीलचेअर किंवा इतर प्रवासी सुविधांबद्दल आधीच चौकशी करू शकता.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
RBI Repo Rate : कर्जदारांना मोठा झटका; EMI वाढणार? RBI घेणार महत्त्वाचा निर्णय
Recommended image2
JioFiber vs Airtel WiFi : 399चा जिओ की 499चा एअरटेल? घरच्या वायफायसाठी कोणता प्लॅन बेस्ट?
Recommended image3
LIC Jeevan Anand Policy : रोज फक्त 45 रुपये वाचवा आणि मिळवा तब्बल 25 लाख रुपये; पॉलिसी काय?
Recommended image4
Electric Scooter Sales September 2026 : हिरो विडामध्ये 88 टक्क्यांची वाढ, बजाज आणि एथरची स्थिती काय?
Recommended image5
LIC Nivesh Plus Plan 850 : एलआयसीची भन्नाट पॉलिसी; एकाच गुंतवणुकीत विमा आणि शेअर बाजाराचा फायदा
Related Stories
Recommended image1
Life Lessons : आनंदी राहायचंय? मग रेल्वे प्रवासाचा हा नियम नेहमी लक्षात ठेवा
Recommended image2
Train Ticket Booking : रेल्वे तिकीट ऑनलाईन काढावं की काऊंटरवर? कशात कन्फर्म होण्याची शक्यता जास्त असते?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved