सार
म्युचअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एसआयपीचा पर्याय निवडला जातो. सर्वसामान्यपणे म्युचअल फंड कंपन्यांकडून एसआयपीचा हप्ता न भरला गेल्यास कोणताही शुल्क आकारला जात नाही. पण बँकेच्या ऑटो डेबिट ट्रांजेक्शनमुळे दंड आकारला जाऊ शकतो.
SIP Investment : स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे काही मार्ग आहेत. यापैकी म्युचअल फंडात सर्वाधिक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा मार्ग निवडला जातो. योग्य पद्धतीने म्युचअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास उत्तम नफा होऊ शकतो. दीर्घकाळासाठी म्युचअल फंडाच्या सिस्टिमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन (SIP) च्या माध्यमातून गुंतवणूक करणे फायद्याचे मानले जाते.
एसआयपी म्हणजे काय?
एसआयपी अशी एक योजना आहे ज्यामध्ये सातत्याने एक रक्कम गुंतवली जाते. या योजनेचा लाभ घेत असताना त्यामध्ये खंड पडू देऊ नये हे फार महत्वाचे असते. सर्वसामान्यपणे एसआयपीमध्ये ऑटो-डेबिटचा पर्याय उपलब्ध आहे. अशातच एसआयपीला लिंक असणाऱ्या बँक खात्यात पैसे नसल्यास काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशातच एसआयपीचा हप्ता चुकवल्यास किती दंड भरावा लागतो आणि गुंतवणूकीवर काय परिणाम होतो याबद्दल जाणून घेऊया...
ऑटो डेबिट ट्रांजेक्शन न झाल्यास किती दंड आकारला जातो?
एसआयपीसाठी ऑटो-डेबिट सुविधा सुरू केल्यानंतर बँक खात्यात पुरेसे पैसे नसल्यास दंड आकारला जातो. सर्वसामान्यपणे म्युचअल फंड कंपन्या एसआयपीचा हप्ता न भरल्यास कोणताही शुल्क घेत नाही. पण बँक ऑटो डेबिट ट्रांजेक्शन न झाल्यास 100 ते 750 रुपयांपर्यंतचा शुल्क आकारला जातो. वेगवेगळ्या बँकांकडून हा शुल्क वेगळा असू शकतो. इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्विस (ECS) किंवा नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउस (NACH) च्या माध्यमातून ऑटो-डेबिटसाठी बँक खात्यात पुरेसे पैसे नसल्यास शुक्ल आकारला जातो. याशिवाय सेबीच्या नियमांनुसार, सातत्याने 3 महिने एसआयपीचा हप्ता न भरल्यास म्युचअल फंड कंपन्या स्वत:हून एसआयपीची गुंतवणूक रद्द करतात.
एसआयपीची गुंतवणूक पॉझ करता येते?
पेनल्टी किंवा म्युचअल फंड कंपनीला तुम्ही एसआयपीच्या गुंतवणूकीला पॉझ करण्यास सांगू शकता. यासाठी तुमची पॉलिसी काही वेळासाठी थांबवली जाते. पैसे आल्यानंतर तुम्ही परत एसआयपीची गुंतवणूक सुरू करू शकता.
आणखी वाचा :
नवीन वर्षात काय बदल होणार, १ जानेवारीपासून अंमलबजावणीला सुरुवात
25 हजारांच्या पगारातही 10 कोटींचा रिटायरमेंट फंड, वाचा गुंतवणूकीचे पर्याय