Health Tips: रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणारे तीन पदार्थ कोणते आहेत? जाणून घ्या
Health Tips: भारतात मधुमेह झपाट्याने वाढत चालला आहे. मधुमेह ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढते. मधुमेहाचे वेगवेगळे प्रकार आहेत. सर्वात सामान्य प्रकार म्हणजे टाइप 1 आणि टाइप 2. साखर नियंत्रणात ठेवणे पेशंटसाठी महत्त्वाचे असते.

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणारे तीन पदार्थ
मधुमेह ही एक अशी स्थिती आहे ज्यात रक्तातील साखरेची पातळी वाढते. मधुमेहाचे वेगवेगळे प्रकार आहेत. सर्वात सामान्य म्हणजे टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेह. टाइप 1 मधुमेह हा एक ऑटोइम्यून आजार आहे, तर टाइप 2 मधुमेह अनुवांशिकता, जास्त वजन आणि व्यायामाचा अभाव यासारख्या विविध कारणांमुळे होऊ शकतो.
18 वर्षांवरील 14 टक्के प्रौढांना मधुमेह आहे: WHO
या दोन्ही स्थितींमध्ये, स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही किंवा शरीर प्रभावीपणे इन्सुलिन वापरू शकत नाही, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. WHO नुसार, 2022 मध्ये 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या 14 टक्के प्रौढांना मधुमेह असल्याचे निदान झाले.
आरोग्यदायी आहार महत्त्वाची भूमिका बजावतो
जीवनशैलीशी संबंधित आजार रोखण्यासाठी आरोग्यदायी आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. नियमित जेवणासोबत काही फळे आणि भाज्या खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
जांभळा कोबी, ऑलिव्ह ऑईल, ब्लूबेरी साखर नियंत्रणात ठेवतात
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हार्मोन्स नियंत्रित करण्यासाठी आणि ग्लुकोजचे संतुलन राखण्यासाठी आहारात तीन पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे.
जांभळा कोबी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो
जांभळा कोबी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतो. पांढऱ्या कोबीपेक्षा यात चयापचय सुधारणारे आणि पचनास मदत करणारे घटक असतात. यातील फायबर आणि पॉलीफेनॉल पचन सुधारतात, ज्यामुळे साखरेतील चढ-उतार टाळता येतात.
ब्लूबेरीमध्ये अँथोसायनिन्स असतात
ब्लूबेरीमध्ये अँथोसायनिन्स असतात. यातील अँटीऑक्सिडंट्स इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारतात, सूज कमी करतात आणि मेंदूच्या आरोग्यास मदत करतात. हे गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्यापासून रोखतात.
एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते
एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. या तेलातील आरोग्यदायी फॅट्स इन्सुलिन प्रतिसाद नियंत्रित करण्यास आणि हृदयाच्या आरोग्यास मदत करतात.

