- Home
- Utility News
- Onion Juice For Hairs : डॉ. रितेश बजाज सांगतात- केसांसाठी कांद्याचा रस आहे गुणकारी, केस गळती थांबेल, येतील नवीन केस
Onion Juice For Hairs : डॉ. रितेश बजाज सांगतात- केसांसाठी कांद्याचा रस आहे गुणकारी, केस गळती थांबेल, येतील नवीन केस
मुंबई - कांद्याचा रस खुप गुणकारी आहे. त्याचा वापर केस गळती रोखण्यासाठी आणि नवीन केस येण्यासाठीही केला जाऊ शकतो. ९०% लोकांना कांद्याचा रस योग्य पद्धतीने कसा वापरायचा हे माहित नाहीये, असं डॉक्टरांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. जाणून घेऊयात…

कांद्याचा रस कसा वापरायचा ते पाहूया
बऱ्याच मुली लांब आणि दाट केसांसाठी वेगवेगळे घरगुती उपाय वापरतात. त्यातलाच एक म्हणजे कांदा. पण कांदा वापरूनही केस का वाढत नाहीत असा प्रश्न पडतो. खरं तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना तो वापरण्याची योग्य पद्धतच माहिती नसते. मग कांद्याचा रस कसा वापरायचा ते पाहूया...
केस लांब आणि दाट असावेत
प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपले केस लांब आणि दाट असावेत. पण प्रदूषण, चुकीची खाण्यापिण्याची सवय आणि अपुरी झोप हे स्वप्न पूर्ण होऊ देत नाही. फार लहान वयात केस गळती सुरु होते. ती थांबवणे अशक्य होऊन बसतं. नवीन केसही येत नाहीत.
कांद्याचा रस योग्य पद्धतीने काढायला हवा
आजकाल बाजारात कांद्यापासून बनवलेले अनेक उत्पादने मिळतात. काही लोक घरीच कांदा वापरतात. कांदा वापरणं ठीक आहे, पण तो योग्य पद्धतीने कसा वापरायचा हे माहीत नसतं. पण नुकतंच त्वचारोगतज्ज्ञ डॉ. रितेश बजाज यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे, ज्यात त्यांनी ९०% लोकांना कांद्याचा रस योग्य पद्धतीने कसा वापरायचा हे माहित नाहीये असं म्हटलं आहे.
योग्य पद्धत महत्त्वाची
व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कांद्याचा रस चुकीच्या पद्धतीने लावल्याने काहीही फायदा होत नाही. योग्य पद्धतीने लावला तर केस लांब आणि दाट होतात, असं डॉ. रितेश बजाज यांनी सांगितलं आहे. त्याची पद्धत त्यांनी सांगितली आहे. ती आपण फॉलो करायला हवी.
रस आंबवून ठेवावा लागतो
आपण बरेच जण कांद्याचा रस थेट गाळून लावतो, पण असं करू नये असं डॉ. रितेश म्हणाले. हा रस आंबवून ठेवावा लागतो. कांद्याचा रस ७२ तास आंबवून मग लावा. रस आंबवल्यावर तो केसांसाठी गुणकारी ठरतो. त्यामुळे तो आंबवणे आवश्यक आहे.
वापरण्याची योग्य पद्धत
केसांना कांद्याचा रस लावण्यासाठी, प्रथम तुमची टाळू ओली करा. आता आंबवलेला कांद्याचा रस केसांना २-३ मिनिटे मसाज करा. नंतर संपूर्ण केस शॉवर कॅपने झाकून घ्या. आता ते ३०-६० मिनिटे तसेच राहू द्या. तुमचे केस दोनदा धुवा आणि शाम्पू लावा. ४-६ आठवडे दररोज दोनदा वापरा. अशा प्रकारे वापरल्याने तुम्हाला अनेक फायदे दिसून येतील.
टीप: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. कोणताही घरगुती उपाय वापरण्यापूर्वी कृपया तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

