व्हॉट्सअॅपवर काही वेळेस चॅट्स लपवण्याची गरज भासते. यावेळी चॅट्स Archive न करता कसे लपवायचे याबद्दल पुढे जाणून घेऊया.
सर्वप्रथम फोनमध्ये व्हॉट्सअॅप सुरु करा. जर WhatsApp Web चा वापर करत असल्यास आधी आपल्या अकाउंटमध्ये लॉगिन करा.
लॉगिन केल्यानंतर चॅट लिस्टमध्ये जे चॅट्स लपवायचे आहे त्याची निवड करा. त्या चॅटवर क्लिकही करा जेणेकरुन उघडले जातील.
चॅट्स उघडल्यानंतर वरती कोपऱ्यातील तीन डॉट्सच्या आयकॉनवर क्लिक करा.
तीन डॉट्सवर क्लिक केल्यानंतर एक मेन्यू दिसेल. येथे Lock Chat चा पर्याय निवडा. जेणेकरुन चॅट्स लॉक होतील.
Lock Chat वर क्लिक केल्यानंतर एक पॉप-अप येईल. यामध्ये Chat Lock and Hide असे लिहिलेले असेल तेथे Continue वर क्लिक करा.
तुम्ही निवडलेले चॅट आधीच्या ट्रिकने लॉक झाले आहेत. हे चॅट्स तुम्हीच उघडू शकता. यावेळी फिंगप्रिंट किंवा बायोमॅट्रिक लॉकचा वापर करा.