MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Credit Card EMI : क्रेडिट कार्ड EMI की पर्सनल लोन? व्याज निम्म्याने कमी करण्याच्या सिक्रेट टिप्स

Credit Card EMI : क्रेडिट कार्ड EMI की पर्सनल लोन? व्याज निम्म्याने कमी करण्याच्या सिक्रेट टिप्स

तुम्हीही क्रेडिट कार्डचं बिल EMI मध्ये कन्व्हर्ट करताय का? व्याज, GST आणि इतर छुपे चार्जेस असे ६ मोठे खर्च तुम्हाला माहीत असायलाच हवेत. यामागचं सत्य काय आहे?

3 Min read
Author : Karishma R
Published : Oct 05 2026, 07:43 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
क्रेडिट कार्डचं बिल EMI मध्ये कन्व्हर्ट करताय?
Image Credit : Gemini AI

क्रेडिट कार्डचं बिल EMI मध्ये कन्व्हर्ट करताय?

महिन्याअखेरीस क्रेडिट कार्डचं बिल पाहिल्यावर टेन्शन येतं का? अशा वेळी 'Convert to EMI' हा एकच पर्याय आपल्याला दिसतो. दर महिन्याला थोडे-थोडे पैसे भरले की झालं, असा विचार करून आपण सुटकेचा निश्वास टाकतो. पण बँक ॲपवर दिसणाऱ्या या छोट्या मासिक हप्त्यामागे (Monthly EMI) एक मोठं गणित लपलेलं असतं.

फायनान्शियल एक्सपर्ट्स सांगतात की, हप्ता कमी दिसतो याचा अर्थ खर्च कमी आहे असं अजिबात नाही. क्रेडिट कार्डचं बिल EMI मध्ये बदलण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
बिल पेंडिंग ठेवायचं की EMI करायचा? कोणता पर्याय बेस्ट?
Image Credit : Getty

बिल पेंडिंग ठेवायचं की EMI करायचा? कोणता पर्याय बेस्ट?

समजा, तुमच्या क्रेडिट कार्डचं बिल १ लाख रुपये आलंय. तुमच्यासमोर पहिला पर्याय असतो की, घरखर्च किंवा इमर्जन्सी फंडला धक्का न लावता वेळेवर पूर्ण बिल भरणं. तुम्ही पूर्ण बिल भरलंत, तर तुम्हाला एक रुपयाही व्याज किंवा चार्ज लागणार नाही.

पण जर तुम्ही बिल भरू शकला नाहीत आणि ते तसंच पेंडिंग (Revolving credit) ठेवलंत, तर तो मोठा धोका ठरू शकतो. यावर महिन्याला ३.७५% पर्यंत फायनान्स चार्ज लागतो. म्हणजेच, पहिल्याच महिन्यात फक्त व्याज म्हणून ३,७५० रुपये वाढतील. जर तुम्ही हे बिल 'रिड्यूसिंग बॅलन्स' पद्धतीने १.७५% व्याजाने ९ महिन्यांच्या EMI मध्ये बदललंत, तर तुमचा मासिक हप्ता १२,१०६ रुपये येईल. तुम्हाला एकूण १.०९ लाख रुपये परत करावे लागतील (प्रोसेसिंग फी आणि टॅक्स वेगळे).

Related Articles

Related image1
Credit Card Security : क्रेडिट कार्ड वापरताय? या 7 सेटिंग्स ऑफ केल्या नाहीत तर अकाउंट होईल रिकामं
36
महिन्याचं व्याज कमी वाटतंय? इथेच होतेय तुमची फसवणूक!
Image Credit : Asianet News

महिन्याचं व्याज कमी वाटतंय? इथेच होतेय तुमची फसवणूक!

'एअरपे मनी' (airpay money) चे सीईओ कुमार विनीत सांगतात की, महिन्याला फक्त १.७५% व्याज आहे, हे वरवर पाहून फसू नका. ते एक महत्त्वाचा सल्ला देतात; बँकेने दिलेला व्याजाचा दर 'रिड्यूसिंग बॅलन्स' (Reducing balance) पद्धतीने कॅल्क्युलेट केलाय का, हे नक्की तपासा. मुद्दल, एकूण व्याज, प्रोसेसिंग फी, GST आणि इतर चार्जेस मिळून तुम्हाला एकूण किती खर्च येतोय, याचं गणित मांडा. तुम्ही EMI चा कालावधी वाढवलात तर महिन्याचा हप्ता छोटा वाटेल, पण शेवटी तुम्ही भरणारी एकूण रक्कम खूप जास्त वाढलेली असेल.

46
EMI ला 'ओके' करण्यापूर्वी या ६ गोष्टी नक्की चेक करा!
Image Credit : Asianet News

EMI ला 'ओके' करण्यापूर्वी या ६ गोष्टी नक्की चेक करा!

व्याजदर (Interest rate): हा फ्लॅट रेट आहे की रिड्यूसिंग बॅलन्स पद्धत आहे?

प्रोसेसिंग फी (Processing fee): बिल EMI मध्ये बदलताना बँक एकदाच ही फी घेते.

१८% जीएसटी (GST): व्याज आणि प्रोसेसिंग फीवर वेगळा GST लागतो.

कालावधी (Tenure): जेवढा जास्त काळ, तेवढं जास्त व्याज.

प्री-क्लोजर चार्जेस (Pre-closure / Foreclosure charges): जर तुमच्याकडे पैसे आले आणि तुम्ही वेळेआधीच कर्ज फेडायचं ठरवलंत, तर त्यावर पेनल्टी लागेल का?

एकूण भरायची रक्कम: मुद्दलाव्यतिरिक्त तुमच्या खिशातून एकूण किती पैसे जाणार आहेत?

एक महत्त्वाची सूचना: तुम्ही बिल EMI मध्ये बदललंत, की त्या रकमेएवढी तुमच्या कार्डची सध्याची क्रेडिट लिमिट (Credit limit) ब्लॉक केली जाते.

56
पैसे वाचवण्याची 'सुपर' टेक्निक: पार्ट पेमेंट करा!
Image Credit : Asianet News

पैसे वाचवण्याची 'सुपर' टेक्निक: पार्ट पेमेंट करा!

पूर्ण बिल तसंच EMI मध्ये बदलण्याऐवजी, तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत ते आधी भरून टाका आणि फक्त उरलेल्या रकमेचा EMI करा. यामुळे तुमचे हजारो रुपये वाचू शकतात. जर तुम्ही १ लाख रुपयांचं बिल १६% वार्षिक व्याजाने, १.५% प्रोसेसिंग फी आणि GST सह १२ महिन्यांच्या EMI मध्ये बदललंत, तर तुम्हाला सुमारे १२,२४५ रुपये जास्तीचे मोजावे लागतील.

पण, जर तुम्ही आधी ४०,००० रुपये भरले आणि उरलेल्या ६०,००० रुपयांचाच EMI केला, तर हा जास्तीचा खर्च सुमारे ७,३४७ रुपयांवर येईल. या स्मार्ट ट्रिकमुळे तुमचे जवळपास ४,९०० रुपये वाचतील.

66
गरजेपुरतंच कर्ज घ्या... सवय लावू नका!
Image Credit : Getty

गरजेपुरतंच कर्ज घ्या... सवय लावू नका!

'वेल्थेरिया' (Wealtheria) च्या संस्थापिका आणि सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर (CFP) अंकिता पटेल एक महत्त्वाचा नियम सांगतात. अचानक येणाऱ्या खर्चासाठी, जर तुमच्याकडे पुढच्या ६ ते १२ महिन्यांत पैसे फेडण्याइतपत इन्कम असेल, तरच क्रेडिट कार्ड EMI चा वापर करा. तसं नसेल आणि तुम्ही कार्डवर खर्च करून प्रत्येक बिल EMI मध्ये बदलत राहिलात, तर कर्जाचा डोंगर वाढतच जाईल. फक्त विशिष्ट गरजेसाठीच कर्ज घ्या, कर्जाची सवय लावून घेऊ नका!

क्रेडिट कार्ड EMI की पर्सनल लोन?

मोठा खर्च असेल, तर कार्ड EMI निवडण्यापूर्वी चांगल्या पर्सनल लोनसोबत (Personal Loan) त्याची तुलना करा. फक्त फ्लॅट रेट न पाहता, कर्जाचा खरा वार्षिक खर्च, प्रोसेसिंग फी आणि प्री-क्लोजर चार्जेस या सगळ्याचा हिशोब करा. फक्त महिन्याचा हप्ता कमी दिसतोय यावर न जाता, तुमच्या खिशातून एकूण किती पैसे जात आहेत हे पाहून हुशारीने निर्णय घ्या.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Credit Card : क्रेडिट कार्डवर मिळणारे '45 दिवसांचे फ्री टाइम' खरंच फायद्याचे असते का? हे नक्की जाणून घ्या
Recommended image2
Indian Railway Child Ticket Rules : ट्रेनमध्ये लहान मुलांसाठी 50% तिकीट... वयाची अट माहितीये का?
Recommended image3
iPhone 17 की iPhone 16 कोणता फोन घेणं फायद्याचं ठरेल? वाचा सर्वकाही डिटेल्स
Recommended image4
Jio 450 Plan : जिओचा नवा ३६ दिवसांचा प्लॅन, या स्पेशल रिचार्जमध्ये मिळणार धमाकेदार ऑफर्स
Recommended image5
ATM Refund Rules : एटीएममधून पैसे आले नाहीत? रोज मिळतील १०० रुपये, जाणून घ्या नियम
Related Stories
Recommended image1
Credit Card Security : क्रेडिट कार्ड वापरताय? या 7 सेटिंग्स ऑफ केल्या नाहीत तर अकाउंट होईल रिकामं
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved