Chicken Bone Soup : चिकन बोन सूपचे फायदे कळले तर रोज न चुकता प्याल, आताच वाचा..
Chicken Bone Soup :चिकन खाण्याचे फायदे तुम्ही खूप ऐकले असतील. पण चिकनच्या हाडांपासून बनवलेल्या सूपचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? हे तुमच्या त्वचेपासून हाडांपर्यंत सर्वांसाठी फायदेशीर आहे.

चिकन बोन सूप -
चिकनला प्रथिनांचा उत्तम स्रोत मानले जाते. पण तुम्ही कधी चिकन बोन सूप प्यायले आहे का? याला बोन ब्रॉथ असेही म्हणतात आणि भारतात हे बहुतेक चिकनची हाडे आणि कूर्चा (cartilage) पासून बनवले जाते. हे बनवण्यासाठी हाडे, बोन मॅरो आणि कनेक्टिव्ह टिश्यू अनेक तास शिजवले जातात, जेणेकरून त्यातील पोषक तत्वे पाण्यात उतरतात.
कोलेजन -
बोन सूपमधील कोलेजन जास्त वेळ शिजवल्यावर जिलेटिनमध्ये बदलते, जे तुमच्या सांध्यातील कूर्चासाठी (cartilage) चांगले असते. करंट मेडिकल रिसर्च अँड ओपिनियनमधील 2008 च्या अभ्यासानुसार, खेळाडूंना 24 आठवडे कोलेजन हायड्रोलायसेट सप्लिमेंट दिल्याने त्यांची वेदना 33 टक्क्यांनी कमी झाली. बोन सूप प्यायल्यानेही तुम्हाला असेच फायदे मिळतील.
ग्लुटामाइन -
या सूपमधील ग्लुटामाइन तुमच्या आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. उंदरांवरील अभ्यासात याचे फायदे दिसून आले आहेत. ग्लुटामाइन तुमच्या आतड्यांच्या आतील पेशींचे आरोग्य सुधारते आणि त्यांचे संरक्षण करण्यास मदत करते.
ग्लायसीन -
जर तुम्हाला झोपायला त्रास होत असेल, तर बोन ब्रॉथ खूप फायदेशीर ठरू शकते. त्यातील ग्लायसीन मेंदूतील रिसेप्टर्सना शांत करते, झोपेची गुणवत्ता सुधारते आणि दुसऱ्या दिवशीचा थकवा कमी करते. या फायद्याला संशोधनानेही दुजोरा दिला आहे.
हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक खनिजे -
सूप बनवताना, हाडांमधून कॅल्शियम आणि मॅग्नेशियम पाण्यात उतरतात. 2017 च्या फूड अँड फंक्शनच्या अभ्यासात 1 कप चिकन बोन सूपमध्ये 16 मिग्रॅ कॅल्शियम आढळले. यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होऊ शकतो.
सूज कमी करणारे गुणधर्म -
सूपमधील प्रोलाइन आणि ग्लायसीन शरीरातील सूज कमी करण्यासाठी मदत करतात. सूजमुळे संधिवातासारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे, बोन ब्रॉथ हे सूज कमी करणाऱ्या गुणधर्मांचा उत्तम स्रोत आहे.
त्वचेचे हायड्रेशन आणि वजन नियंत्रण -
या सूपचे तुमच्या त्वचेसाठी आणि वजन नियंत्रणासाठी अनेक फायदे आहेत. काही आठवडे याचे सेवन केल्याने त्यातील कोलेजन पेप्टाइड्समुळे त्वचेचे हायड्रेशन वाढते, असे संशोधनात दिसून आले आहे. त्यातील जिलेटिन नाश्त्यासोबत घेतल्यास भूक नियंत्रित राहते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

