MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Car Rental Business : कार रेंटल बिझनेस सुरू करायचा? सरकारचे अटी आणि सुरक्षेबाबत नवे नियम

Car Rental Business : कार रेंटल बिझनेस सुरू करायचा? सरकारचे अटी आणि सुरक्षेबाबत नवे नियम

स्वतःचा कार रेंटल बिझनेस सुरू करायचा विचार करताय? मग आता ५० कार्स घेण्याची गरज नाही. लायसन्सची फी, अटी आणि सुरक्षेचे नियम काय आहेत?

2 Min read
Author : Karishma R
Published : Nov 16 2026, 02:47 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
५० ऐवजी फक्त ५ कार्स पुरे
Image Credit : Asianet News

५० ऐवजी फक्त ५ कार्स पुरे

भारतात कार रेंटल बिझनेसची क्रेझ वाढतेय. काही तास, दिवस किंवा आठवड्यांसाठी भाड्याने कार वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अशात लहान उद्योजकांना या क्षेत्रात उतरता यावं, यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) नवीन नियम प्रस्तावित केले आहेत. यानुसार आता कार रेंटल कंपनी सुरू करण्यासाठी किमान वाहनांची संख्या ५० वरून ५ करण्यात येणार आहे. या ड्राफ्ट प्लॅनला Rent-a-Cab Scheme 2026 असं नाव दिलंय.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
एका ठिकाणी किमान दोन कार्स आवश्यक
Image Credit : Asianet News

एका ठिकाणी किमान दोन कार्स आवश्यक

नवीन प्रस्तावानुसार, एका कंपनीकडे एकूण किमान ५ कार्स असणं गरजेचं आहे. तर प्रत्येक ऑपरेशन आणि मेंटेनन्स ठिकाणी किमान २ कार्स असणं बंधनकारक असेल. यामुळे लहान गुंतवणूकदारांनाही या बिझनेसमध्ये एंट्री करता येईल. तसंच ग्राहकांना सेल्फ-ड्राइव्ह आणि ड्रायव्हरसह कार असे दोन्ही पर्याय देता येतील. जुन्या नियमांनुसार, ५ पर्यटन शहरांमध्ये शाखा असण्याची अट होती, तीही आता रद्द करण्यात येणार आहे.

35
२५ हजार रुपयांत एकच लायसन्स
Image Credit : Google

२५ हजार रुपयांत एकच लायसन्स

सध्या वेगवेगळ्या ठिकाणांसाठी वेगवेगळी लायसन्स प्रक्रिया असल्याने कंपन्यांना त्रास होतो. हे सोपं करण्यासाठी आता राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात लागू होणारं एकच इलेक्ट्रॉनिक लायसन्स देण्याचा प्रस्ताव आहे. याची फी २५,००० रुपये असेल. वाहनांची संख्या किंवा ठिकाणांनुसार ही फी बदलणार नाही. लायसन्स देण्यासाठी आणि नूतनीकरणासाठी ६० दिवसांची मुदत आणि वाहनं किंवा ठिकाणं वाढवण्यासाठी ३० दिवसांत निर्णय घेण्याची प्रक्रिया प्रस्तावित आहे.

45
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नवे नियम
Image Credit : Google

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नवे नियम

बिझनेस सुरू करण्याचे नियम सोपे केले असले, तरी सुरक्षेबाबत कडक नियम लागू होणार आहेत. भाड्याच्या कारमध्ये लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस आणि फर्स्ट एड बॉक्स असणं अनिवार्य आहे. प्रवाशी आणि ड्रायव्हरसाठी योग्य इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. वाहनाचं रजिस्ट्रेशन, फिटनेस सर्टिफिकेट आणि पीयूसी व्हॅलिड असावी. याशिवाय कंपन्यांना वेबसाइट, २४ तास हेल्पलाईन, इमर्जन्सी रिपेअर आणि टोइंग सुविधा देणंही आवश्यक असेल.

55
२०२७ च्या जानेवारीपासून नियम लागू होणार?
Image Credit : Google

२०२७ च्या जानेवारीपासून नियम लागू होणार?

या ड्राफ्टमध्ये ड्रायव्हर्सचं पोलीस व्हेरिफिकेशन आणि सोशल सिक्युरिटीचे नियमही आहेत. कारच्या पहिल्या रजिस्ट्रेशनच्या तारखेपासून ९ वर्षांपेक्षा जास्त जुनी कार नसावी आणि लायसन्स ५ वर्षांसाठी व्हॅलिड असेल, असा प्रस्ताव आहे. १९८९ च्या जुन्या नियमांऐवजी हा नवा प्लॅन जानेवारी २०२७ पासून लागू होण्याची शक्यता आहे. पण हा फक्त ड्राफ्ट आहे. जनता आणि संबंधित घटकांना ५ डिसेंबर २०२६ पर्यंत आपले विचार मांडण्याची मुदत दिली आहे.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Flight Journey : पहिल्यांदाच विमान प्रवास करायचा आहे? मग या बजेट-फ्रेंडली टिप्स नक्की वाचा
Recommended image2
Hero Vida UBX E-Bike : हिरोची नवी ई-बाईक येतेय, पेट्रोल बाईक्सना देणार तगडी टक्कर
Recommended image3
TVS Jupiter : कुटुंबासोबत प्रवासासाठी बेस्ट स्कूटर कोणती? होंडा ॲक्टिव्हाला टक्कर देणारी टीव्हीएस ज्युपिटर
Recommended image4
Petrol Price Today : 16 नोव्हेंबरचे पेट्रोल, डिझेलचे आजचे दर, किती आहे इंधन भाव?
Recommended image5
Gold Rate Today : सोने-चांदीचे आजचे दर काय? दिवाळीनंतर काय आहेत भाव?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved