Car market : मारुती सुझुकीला 2025 हे वर्षं विक्रीसाठी खूपच चांगले ठरले. डिसेंबर 2025 मध्ये 1,78,646 युनिट्सच्या विक्रीसह मारुती सुझुकीने 37.3% वार्षिक वाढ नोंदवली. अल्टो, बलेनो आणि ब्रेझा यांसारख्या मॉडेल्सच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे हे यश मिळाले.
Car market : भारतात वाहनांची वाढती मागणी आहे. दरवर्षी दुचाकी आणि कार्सची मोठ्या प्रमाणावर विक्री रोते. देशातील रस्त्यांवर वर्षागणिक गाड्यांची संख्या वाढतच आहे. ही मागणी लक्षात घेऊन वेगवेगळ्या कारनिर्मिती कंपन्या आपल्या विविध मॉडेल्समध्ये अपग्रेडेशन करतच असतात. सर्वात आरामदायी प्रवास, तसेच विविध सुखसोयी उपलब्ध करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न या कंपन्या करत आहेत. त्यात त्यांना यश मिळत असल्याचे मारुती सुझुकीच्या आकडेवारीवरून दिसते.
2025 डिसेंबरमध्ये 1,78,646 युनिट्सच्या विक्रीसह, मारुती सुझुकीने नोव्हेंबर 2024 मध्ये विकलेल्या 1,30,117 युनिट्सच्या तुलनेत 37.3% वार्षिक वाढ नोंदवली. यामुळे विक्रीच्या प्रमाणात 48,529 युनिट्सची वाढ झाली. नोव्हेंबर 2025 मध्ये विकलेल्या 1,70,971 युनिट्सच्या तुलनेत, मारुती सुझुकीने मासिक 4.49% वाढ साधली, ज्यामुळे मासिक विक्रीत 7,675 युनिट्सची वाढ झाली.
हे आहेत आकडेवारी
आकडेवारी अधिक तपशीलवार पाहिल्यास, अल्टो आणि एस-प्रेसोचा समावेश असलेल्या मिनी सेगमेंटची विक्री गेल्या वर्षीच्या 7,418 युनिट्सवरून जवळपास दुप्पट होऊन 14,225 युनिट्स झाली आहे. कॉम्पॅक्ट सेगमेंटनेही (4 मीटरपेक्षा कमी) चांगली वाढ दर्शवली आहे, गेल्या महिन्यात 78,704 युनिट्सची विक्री झाली, जी मागील वर्षी 54,906 युनिट्स होती. या सेगमेंटमध्ये बलेनो, सेलेरियो, डिझायर, इग्निस, स्विफ्ट आणि वॅगनआर यांसारख्या कारचा समावेश आहे.
युटिलिटी सेगमेंटमध्ये ब्रेझा, अर्टिगा, फ्रॉन्क्स, ग्रँड विटारा, इन्व्हिक्टो, जिमनी, व्हिक्टोरिस आणि XL6 यांचा समावेश आहे. या सर्वांनी चांगली वाढ दर्शवली आहे, गेल्या वर्षी 55,651 युनिट्सच्या तुलनेत यावेळी 73,818 युनिट्सची विक्री झाली. व्हॅन सेगमेंटमध्ये थोडी वाढ झाली, ईकोची विक्री 11,678 वरून 11,899 युनिट्स झाली. मारुतीची एकूण प्रवासी वाहन विक्री 1,78,646 युनिट्स आणि सीव्ही (सुपर कॅरी) विक्री 3,519 युनिट्स आहे.
2025 मध्ये मारुती सुझुकीची एकूण देशांतर्गत विक्री 23,51,139 युनिट्स होती, जी आतापर्यंतची सर्वाधिक वार्षिक विक्री आहे. या आकडेवारीचे विभाजन केल्यास, देशांतर्गत बाजारात 19,55,491 युनिट्स आणि निर्यातीसाठी 3,95,648 युनिट्सची विक्री झाली. ब्रँडची देशांतर्गत आणि निर्यात दोन्ही आकडेवारी आतापर्यंतची सर्वोच्च आहे. 2025 मध्ये जागतिक बाजारपेठेत 3.95 लाख वाहने निर्यात करून, मारुती सुझुकी सलग पाचव्या वर्षी भारतातील नंबर वन प्रवासी वाहन निर्यातदार बनली आहे.


