MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • BSNL Recharge : फक्त 172 रुपयांत अनलिमिटेड कॉलिंग, रोज 100 SMS; मग डेटाचं काय?

BSNL Recharge : फक्त 172 रुपयांत अनलिमिटेड कॉलिंग, रोज 100 SMS; मग डेटाचं काय?

तुम्हाला फक्त कॉलिंगची सुविधा हवी असेल आणि इंटरनेट डेटाची गरज नसेल, तर BSNL ने तीन नवीन स्वस्त रिचार्ज प्लॅन्स आणले आहेत. १७२ रुपये, १८४ रुपये आणि १९० रुपयांच्या या प्लॅन्समध्ये नेमके काय फायदे मिळतात ते जाणून घ्या.

2 Min read
Author : Karishma R
Published : Nov 09 2026, 11:54 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
BSNL चे नवीन १७२, १८४ आणि १९० रुपयांचे रिचार्ज प्लॅन्स
Image Credit : Asianet News

BSNL चे नवीन १७२, १८४ आणि १९० रुपयांचे रिचार्ज प्लॅन्स

मोबाईल रिचार्जचे दर वाढत असताना, ग्राहकांना कमी खर्चात सिम कार्ड अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी BSNL ने एक नवीन पर्याय उपलब्ध करून दिला आहे. कंपनीने १७२, १८४ आणि १९० रुपयांचे तीन नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स लाँच केले आहेत. विशेष म्हणजे या तिन्ही प्लॅन्समध्ये इंटरनेट डेटा दिला जात नाही. पण ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० SMS सारखे फायदे मिळतात.

TRAI च्या सूचनेनुसार टेलिकॉम कंपन्या डेटा नसलेले स्वस्त रिचार्ज प्लॅन्स लाँच करत आहेत. याच पार्श्वभूमीवर BSNL ने हे तीन नवीन प्लॅन्स आणले आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
१. १७२ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
Image Credit : X

१. १७२ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

BSNL च्या १७२ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. यासोबतच रोज १०० SMS पाठवण्याची सुविधाही देण्यात आली आहे. या प्लॅनचा रोजचा खर्च सरासरी ६.१४ रुपये येतो. ज्यांना कमी खर्चात फक्त कॉलिंग करायचे आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन फायदेशीर ठरू शकतो.

२. १८४ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

दुसऱ्या बाजूला १८४ रुपयांच्या प्लॅनमध्येही अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि रोज १०० SMS ची सुविधा दिली जाते. ज्यांना इंटरनेटची फारशी गरज भासत नाही, अशा ग्राहकांसाठी डेटा नसलेला हा प्लॅन आणला गेला आहे.

34
३. १९० रुपयांचा रिचार्ज प्लॅन
Image Credit : Chatgpt

३. १९० रुपयांचा रिचार्ज प्लॅन

१९० रुपयांच्या प्लॅनमध्ये एका महिन्याची व्हॅलिडिटी मिळते. यामध्येही अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि रोज १०० SMS सारखे फायदे दिले जातात. विशेषतः ज्यांना इंटरनेट डेटाची अजिबात गरज नाही आणि फक्त कॉलिंगसाठी मोबाईल वापरतात, त्यांच्यासाठी हा प्लॅन एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

जिओ, एअरटेल, व्हीआयलाही टक्कर!

डेटा नसलेले असे स्वस्त रिचार्ज प्लॅन्स फक्त BSNL कडेच नाहीत. जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया (Vi) सारख्या कंपन्यांनीही TRAI च्या सूचनेनुसार असेच प्लॅन्स आणले आहेत.

ज्या ग्राहकांना इंटरनेट डेटा नकोय, त्यांच्याकडून जास्तीचे पैसे न आकारता त्यांना कमी खर्चात मोबाईल कनेक्शन वापरता यावे, हा यामागील मुख्य उद्देश आहे.

44
हे रिचार्ज प्लॅन्स कोणासाठी फायद्याचे?
Image Credit : Gemini

हे रिचार्ज प्लॅन्स कोणासाठी फायद्याचे?

जे दररोज मोबाईल इंटरनेट वापरत नाहीत, ज्यांच्या घरी वायफाय आहे, किंवा जे फक्त कॉलिंग आणि SMS चा जास्त वापर करतात, ते या प्लॅन्सचा विचार करू शकतात.

त्याच वेळी, ज्यांना इंटरनेट डेटाची आवश्यकता भासल्यास त्यांना वेगळे डेटा व्हाउचर रिचार्ज करून वापरावे लागतील.

थोडक्यात सांगायचे तर, कमी खर्चात सिम कार्ड चालू ठेवायचे असेल, तर BSNL चे हे तीन प्लॅन्स ग्राहकांना उत्तम पर्याय देतात.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Airtel Offer : एअरटेलची ग्राहकांसाठी भारी ऑफर, ॲपवरून रिचार्जवर बाय वन गेट वन फ्री
Recommended image2
Petrol Diesel Prices : पेट्रोल, डिझेलचे आजचे दर, इथेनॉलच्या आरोपांवर कंपन्यांचे स्पष्टीकरण
Recommended image3
Gold Rate Today : 9 नोव्हेंबरचे सोन्या-चांदीचे ताजे दर, खरेदीपूर्वी इथे तपासा भाव
Recommended image4
Diwali Car Offers: दिवाळीला नवीन कार घेताय? या 6 गोष्टी नक्की तपासा
Recommended image5
Tata EV Discounts : टाटा पंच ईव्ही, नेक्सॉन ईव्ही: भन्नाट ऑफर्स!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved