सार

दिवाळी धमाका! बीएसएनएलने ग्राहकांसाठी आकर्षक रिचार्ज प्लॅनची किंमत कमी केली आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने दिवाळीनिमित्त ग्राहकांसाठी एक आकर्षक ऑफर जाहीर केली आहे. १९९९ रुपयांच्या वार्षिक रिचार्ज प्लॅनची किंमत कमी करून बीएसएनएल ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, या रिचार्ज प्लॅनमधील सुविधांमध्ये कोणतीही कपात कंपनीने केलेली नाही. सवलतीच्या दरात हा प्लॅन रिचार्ज करण्यासाठी आता फक्त तीन दिवस शिल्लक आहेत.

१९९९ रुपयांच्या वार्षिक रिचार्ज प्लॅनवर दिवाळीनिमित्त १०० रुपयांची सूट बीएसएनएलने जाहीर केली आहे. ३६५ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या रिचार्ज प्लॅनसाठी आता फक्त १८९९ रुपये मोजावे लागतील. या कालावधीत एकूण ६०० जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएस, गेम्स, संगीत अशा सुविधा बीएसएनएल या रिचार्ज प्लॅनमध्ये देत आहे. हा प्लॅन मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे. ७ नोव्हेंबरपर्यंत रिचार्ज करणाऱ्या बीएसएनएल ग्राहकांनाच ही ऑफर मिळेल.

दुसरा एक प्लॅनही जाहीर

९० दिवसांच्या वैधतेसह ३४९ रुपयांचा रिचार्ज प्लॅनही बीएसएनएलने आणला आहे. अमर्यादित व्हॉइस कॉल, अमर्यादित डेटा (३० जीबी नंतर ४० केबीपीएस स्पीड) या सुविधा या प्लॅनमध्ये मिळतील. GP-II ग्राहकांसाठी हा मर्यादित कालावधीसाठीचा विशेष व्हाउचर आहे. २८ नोव्हेंबरपर्यंत हा प्लॅन रिचार्ज करता येईल. अलिकडच्या काळात बीएसएनएलने अनेक आकर्षक रिचार्ज प्लॅन जाहीर केले आहेत आणि याच मालिकेतील हे दोन नवीन प्लॅन आहेत.