सार
अॅमेझॉन प्राइमवर येत्या 20 जुलैपासून प्राइम डे सेल सुरु होणार आहे. याआधी सायबर हल्लेखोर अॅक्टिव्ह झाले आहेत. अशातच नागरिक सेलदरम्यानअधिकृत अॅप अथवा लिंकवरुनच खरेदी करावी. अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.
Amazon Prime Day Sale : अॅमेझॉनवरील ‘प्राइम डे’ सेल येत्या 20 जुलै ते 21 जुलैदरम्यान सुरु राहणार आहे. अशातच बहुतांशजणांनी आतापर्यंत ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुन काय-काय खरेदी करायचे याची लिस्ट तयार करुन ठेवली असेल. पण सेलदरम्यान सायबर हल्लेखोर अधिक अॅक्टिव्ह होतात या गोष्टीकडेही तुम्ही लक्ष द्या. अन्यथा तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. यंदाच्या अॅमेझॉन प्राइम डे सेलसाठी सायबर हल्लेखोरांनी काही बनावट वेबसाइट्स आणि लिंक तयार केल्या आहेत. याच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढून बँक खाती रिकामी करण्याच्या प्रयत्नात आहेत.
सायबर हल्लेखोरांकडून 25 बनावट वेबसाइट लिंक तयार
सायबर हल्लेखोरांकडून अॅमेझॉनसंदर्भात 25 बनावट वेबसाइट लिंक तयार केल्या आहेत. याचा खुलासा सायबर सिक्युरिटी वेबसाइट चेकपॉइंट डॉट कॉम यांनी केली आहे. सायबर सिक्युरिटीने नागरिकांना पुढील काही लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन केले आहे.
या लिंक्सवर चुकूनही करू नका क्लिक
1. amazon-onboarding[.]com
2. amazonmxc[.]shop
3. amazonindo[.]com
4. shopamazon2[.]com
5. microsoft-amazon[.]shop
6. amazonapp[.]nl
7. shopamazon3[.]com
8. amazon-billing[.]top
9. amazonshop1[.]com
10. fedexamazonus[.]top
11. amazonupdator[.]com
12. amazon-in[.]net
13. espaces-amazon-fr[.]com
14. usiamazon[.]com
15. amazonhafs[.]buzz
16. usps-amazon-us[.]top
17. amazon-entrega[.]info
18. amazon-vip[.]xyz
19. paqueta-amazon[.]com
20. connect-amazon[.]com.
21. user-amazon-id[.]com
22. amazon762[.]cc
23. amazoneurosir.com
24. amazonw-dwfawpapf[.]top
25. amazonprimevidéo[.]com
अशाप्रकारे सायबर हल्लेखोर करतात बँक खाते रिकामे
सायबर हल्लेखोर बँक खाते रिकामे करण्यासाठी मेसेजचा वापर करतात. मेसेज नागरिकांना व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि ईमेलच्या माध्यमातून पाठवला जातो. यामध्ये शॉपिंग अॅपच्या नावाने ऑफर दिली जाते. एवढेच नव्हे बंपर सूटच्या नावाखाली नागरिकांची दिशाभूल केली जाते. मेसेजमध्ये हॅकर्सकडून एक बनावट लिंक देखील शेअर केली जातो. या लिंकच्या माध्यमातून हॅकर्स नागरिकांची फसवणूक केली जाते.
ऑनलाइन शॉपिंग करताना या गोष्टीही ठेवा लक्षात
- सेल दरम्यान शॉपिंग करताना फसवणूकीपासून दूर राहण्यासाठी URL https:// असणारी वेबसाइट पहावी.
- हॅकर्स सेलदरम्यान मिळणारे मॅसेशियल कोडच्या माध्यमातून डिस्काउंट कूपन तयार केले जातात ज्यावर मोठी डिस्काउंट मिळणार असल्याचे सांगितले जाते. या कोडच्या माध्यमातून शॉपिंग केल्यास तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते.
- सेलदरम्यान कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करु नये.
- सोशल मीडिया प्लॅटफॉर्म WhatsApp, Facebook अथवा Instagram वरुन थेट कधीच खरेदी करू नये. याच्या माध्यमातूनही फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते.
- ऑनलाइन खरेदी करताना ज्या वेबसाइटवर आहेत तेथे लॉक URL तपासून पहा.
आणखी वाचा :
Vi वापरकर्त्यांसाठी नवीन संकट, दर वाढवल्यानंतर Jio, Airtel सुद्धा देणार धक्का?