- Home
- Utility News
- 8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांची मज्जाच मज्जा, आठव्या वेतन आयोगात शिपायाला 45000 तर सचिवांना 5 लाख पगार, बंपर वाढ
8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांची मज्जाच मज्जा, आठव्या वेतन आयोगात शिपायाला 45000 तर सचिवांना 5 लाख पगार, बंपर वाढ
कर्मचाऱ्यांसाठी 8वा वेतन आयोग बंपर, 1 जानेवारीपासून शिपायाला 45000, तर सचिवांना 5 लाख रुपये पगार मिळणार आहे. नवीन वर्षापासून पगारात वाढ होत आहे. लेव्हल 1 ते लेव्हल 18 पर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.

1 जानेवारीपासून पगारवाढ -
केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला मंजुरी दिली आहे. 1 जानेवारीपासून 8वा वेतन आयोग लागू होत आहे. नवीन वर्षापासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. नवीन वर्षासाठी केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना बंपर गिफ्ट दिले आहे. यामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या लेव्हल 1 ते लेव्हल 18 पर्यंतच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे.
8व्या वेतन आयोगातील पगारवाढ (अंदाजे सरासरी) -
- शिपाईसह डी ग्रुप कर्मचारी: 45,000 रुपये (सध्या 18,000 रुपये)
- लेव्हल 5: 62,700 रुपये (सध्या पगार 29,200 रुपये)
- लेव्हल 10: 1,20,615 रुपये (सध्या 56,100 रुपये)
- लेव्हल 15: 3,91,730 रुपये (सध्या 1,82,200 रुपये)
- लेव्हल 18: 5,37,500 रुपये (सध्या 2,50,000 रुपये)
मूळ वेतनात लक्षणीय वाढ -
यावेळच्या पगारवाढीचे वैशिष्ट्य म्हणजे मूळ वेतनात मोठी वाढ होत आहे. यामुळे प्रत्येकाच्या पगारात लक्षणीय वाढ होणार आहे.
केंद्र सरकारचे 18 लेव्हलचे कर्मचारी
- लेव्हल 1: सुरुवातीची लेव्हल, ग्रुप डी कर्मचारी
- लेव्हल 2-9: ग्रुप सी कर्मचारी
- लेव्हल 10-12: ग्रुप बी कर्मचारी
- लेव्हल 13-18: ग्रुप ए कर्मचारी
7वा वेतन आयोग 31 डिसेंबरला समाप्त -
मागील 7व्या वेतन आयोगाचा कालावधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत लागू आहे. 2026 पासून नवीन वेतन आयोग निश्चित करण्यासाठी 8व्या वेतन आयोगाची बैठक झाली होती. अनेक अहवाल आणि बैठकांनंतर आयोगाने 8व्या वेतन आयोगाची शिफारस केली होती. नुकतेच केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली.
मूळ वेतनात वाढ -
8व्या वेतन आयोगात मूळ वेतनात वाढ करण्यात आली आहे. यासोबतच महागाई भत्ता, दैनिक भत्ता यासह इतर सुविधांचाही समावेश असेल. यामुळे हातात येणारा पगार दुप्पट होणार आहे.

