Blouse Reuse तुमचा आवडता ब्लाउज घट्ट झालाय का? त्याला कपाटात ठेवून देण्याऐवजी, काही सोपे बदल करून तुम्ही तो पुन्हा वापरू शकता. या आयडियामुळे तुमचे पैसे तर वाचतीलच, पण जुन्या ब्लाउजला एक नवीन आणि स्टायलिश लुकही मिळेल.
असं अनेकदा होतं की आपला एखादा आवडता ब्लाउज काही दिवसांनी घट्ट होतो. वजन वाढल्यामुळे, कापड आकसल्यामुळे किंवा जुन्या फिटिंगमुळे अनेकजणी आपले चांगले ब्लाउज वापरणं सोडून देतात. पण प्रत्येक वेळी नवीन ब्लाउज शिवायलाच हवा असं नाही. थोडीशी हुशारी आणि क्रिएटिव्हिटी वापरून तुम्ही जुन्या, घट्ट झालेल्या ब्लाउजला पुन्हा स्टायलिश आणि आरामदायी बनवू शकता. विशेष म्हणजे, या पद्धतींनी फक्त फिटिंगच सुधारत नाही, तर ब्लाउजचा लुक पूर्वीपेक्षा जास्त सुंदर दिसू शकतो. जर तुमचाही आवडता ब्लाउज घट्ट झाला असेल, तर या ६ सोप्या आयडिया तुमच्या नक्की कामी येतील.

साइडला एक्स्ट्रा कापड जोडा
जर ब्लाउज कंबरेला किंवा छातीजवळ घट्ट होत असेल, तर दोन्ही बाजूंना मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट रंगाचं कापड जोडून तो सैल करता येतो. आजकाल कॉन्ट्रास्ट पॅनल असलेले ब्लाउज ट्रेंडमध्येही आहेत. यामुळे ब्लाउजला एक नवीन आणि डिझायनर लुक मिळतो.

बॅक डिझाइन बदलून नवीन लुक द्या
जुन्या घट्ट ब्लाउजचा मागचा भाग थोडा उघडा करून त्यात दोरी किंवा नेटचं कापड लावता येतं. यामुळे ब्लाउज अधिक आरामदायी होतो आणि त्याला स्टायलिश लुकही मिळतो. विशेषतः पार्टीवेअर किंवा लग्नसमारंभात घालण्याच्या ब्लाउजसाठी ही आयडिया खूप छान आहे.
हुकच्या जागी एक्स्ट्रा लूप लावा
जर ब्लाउज थोडासाच घट्ट होत असेल, तर लगेच नवीन शिवण्याऐवजी तुम्ही हुक एक्सटेंशन वापरू शकता. यात एक्स्ट्रा लूप किंवा कापडाची छोटी पट्टी जोडून काही इंच जागा वाढवता येते. हा एक सोपा आणि कमी खर्चाचा उपाय आहे.

स्लीव्हजमध्ये करा स्टायलिश बदल
अनेकदा ब्लाउज दंडामध्ये घट्ट होतो. अशावेळी, जुन्या स्लीव्हज काढून तुम्ही तो स्लीव्हलेस करू शकता किंवा त्याला पफ स्लीव्हज किंवा नेटच्या स्लीव्हज जोडू शकता. यामुळे फिटिंग तर सुधारतेच, पण जुना ब्लाउज एकदम ट्रेंडी दिसू लागतो.
पेपलम स्टाइलमध्ये बदला
जर ब्लाउज खूपच जास्त घट्ट झाला असेल, तर त्याला पेपलम ब्लाउज स्टाइलमध्ये बदलता येतं. कमरेच्या खाली एक्स्ट्रा कापड जोडून एक नवीन डिझाइन तयार होऊ शकतं. ही स्टाइल साडीसोबत खूप फॅशनेबल दिसते आणि पोटाचा भागही व्यवस्थित कव्हर करते.

जॅकेट ब्लाउज म्हणून वापरा
जुन्या ब्लाउजचा वापर तुम्ही फ्रंट ओपन जॅकेटसारखाही करू शकता. याला पूर्णपणे फिट करण्याऐवजी ओपन स्टाइलमध्ये घाला आणि आतमध्ये प्लेन ब्लाउज किंवा क्रॉप टॉप घाला. यामुळे तुमचा जुना ब्लाउज एका नव्या आउटफिटसारखा दिसेल.


