सार
२०२५ हे वर्ष काही दिवसांत सुरु होणार आहे आणि या वर्षाची सुरुवात ३ राशींसाठी चांगली राहणार आहे. कारण नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बुध ग्रह या ३ राशींवर कृपा करणार आहे.
बुधाला ग्रहांचा राजकुमार म्हटले जाते. व्यक्तीच्या जीवनात बुध हा बुद्धिमत्ता, त्वचा, वाणी, सुगंध आणि सौंदर्याचा कारक असतो. बुध दर २१ दिवसांनी राशी बदलतो आणि या २१ दिवसांमध्ये बुध नक्षत्र देखील बदलतो. बुधाच्या राशी बदलाइतकाच प्रभावी बुधाचा नक्षत्र बदलही असतो.
पंचांगाच्या मते, २४ डिसेंबर आणि मंगळवारी बुध ज्येष्ठ नक्षत्रात प्रवेश केला आहे. ज्येष्ठ नक्षत्र हे २७ नक्षत्रांपैकी १८ वे नक्षत्र आहे. ज्येष्ठ नक्षत्र हे वृश्चिक राशीत येते. या राशीत बुध प्रवेश करत असल्याने ३ राशींच्या लोकांना नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच लाभ मिळणार आहे.
मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. बुधाचा संचार या राशीवर सकारात्मक प्रभाव पाडेल. बुधाचा नक्षत्र बदल मिथुन राशीच्या लोकांना लाभ मिळवून देईल. नोकरीतील अडचणी दूर होतील. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. धनप्राप्तीचे योग आहेत. आर्थिक समस्या सुटतील. प्रेम जीवनातील चढउतरांना शांतता येईल. जोडीदाराबरोबर रोमँटिक क्षणांचा आनंद घ्याल.
कन्या राशीच्या लोकांसाठी मिथुन राशीप्रमाणेच बुध लाभदायक आहे. बुधाचा नक्षत्र बदल कन्या राशीच्या लोकांना शुभ प्रभाव देईल. गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांचे आरोग्य सुधारण्यास सुरुवात होईल. करिअरमध्ये केलेले प्रयत्न यशस्वी होतील. नोकरी करणाऱ्यांना मोठ्या कंपन्यांकडून ऑफर मिळू शकतात. व्यवसायात महत्त्वाचा व्यवहार पूर्ण होऊ शकेल. आर्थिक लाभ होतील.
मीन राशीच्या लोकांसाठीही बुधाचा संचार लाभदायक आहे. विद्यार्थ्यांची सर्जनशील क्षमता वाढेल. पालकांबरोबर समस्या असतील तर संबंध सुधारतील. समाजहिताचे काम करण्याची संधी मिळेल. समस्या दूर होण्यास सुरुवात होईल. भागीदारी व्यवसायात लाभ होईल. मालमत्तेची खरेदी करू शकाल.