MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
TRENDING :
Daily Use Items Cheap at Dmart
Gold and Silver Price Today
Tata Nexon Next Generation 2027
Groundnut Oil Vs Sunflower Oil
Chanakya Niti Jealous People Tips
Triumph Bonneville 400
Royal Enfield One Ride
Fridge Vastu Tips
Rat Home Remedy
Amazon Great Indian Festival Sale 2026
Petrol & Diesel Price Today
ज्वेलरी
माझे पुणे
माझी मुंबई
ऑटोमोबाईल
Religion & राशिभविष्य
  • Home
  • Sports
  • Cricket
  • Smriti Mandhana 11000 Runs : स्मृती मंधानाचा ऐतिहासिक रेकॉर्ड, 11 हजार रन्स करणारी जगातील पहिली महिला क्रिकेटर

Smriti Mandhana 11000 Runs : स्मृती मंधानाचा ऐतिहासिक रेकॉर्ड, 11 हजार रन्स करणारी जगातील पहिली महिला क्रिकेटर

भारतीय महिला क्रिकेट टीमची स्टार ओपनर स्मृती मंधानाने एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध जबरदस्त बॅटिंग करत तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले ११ हजार रन्स पूर्ण केले आहेत.

2 Min read
Author : Karishma R
Published : Sep 22 2026, 01:07 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
इतिहास रचणारी स्मृती मंधाना
Image Credit : X/BCCIWomen

इतिहास रचणारी स्मृती मंधाना

मुंबई : जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या गोल्ड मेडल मॅचमध्ये टीम इंडियाची व्हाईस कॅप्टन स्मृती मंधानाने हा नवा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. निशिन येथील कोरोगी स्पोर्ट्स पार्कमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना तिने आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये ११,००० रन्स पूर्ण केले. अशी कामगिरी करणारी ती जगातील पहिली महिला क्रिकेटर ठरली आहे. ३० वर्षीय या लेफ्ट हँड बॅटरने आपल्या करिअरमध्ये आणखी एक मोठा माईलस्टोन गाठला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
अवघ्या १० बॉल्समध्ये गाठला टप्पा
Image Credit : X/BCCIWomen

अवघ्या १० बॉल्समध्ये गाठला टप्पा

श्रीलंकेविरुद्धची ही फायनल मॅच सुरू होण्यापूर्वी स्मृतीला ११,००० रन्सचा टप्पा गाठण्यासाठी फक्त १३ रन्सची गरज होती. इनिंगची सुरुवात करताना तिने अवघ्या १० बॉल्समध्ये हे १३ रन्स पूर्ण करत वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला. टॉस जिंकून बॅटिंगला उतरलेल्या टीम इंडियाला स्मृतीने एक शानदार सुरुवात करून दिली. तिने फक्त ३० बॉल्समध्ये आपली हाफ सेंचुरी पूर्ण केली. या मॅचमध्ये तिने ४५ बॉल्समध्ये ५ फोर आणि ७ सिक्स मारत ७९ रन्सची खेळी केली.

Related Articles

Related image1
Rahul Dravid ODI Career : 'तो निर्णय घेतला नसता तर द्रविडचं करिअर संपलं असतं', गांगुलीचा मोठा खुलासा
35
मिताली राजचा रेकॉर्ड मोडला
Image Credit : X/BCCIWomen

मिताली राजचा रेकॉर्ड मोडला

आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स करणाऱ्या खेळाडूंच्या लिस्टमध्ये आता स्मृती मंधाना टॉपवर पोहोचली आहे. याआधी टीम इंडियाची माजी कॅप्टन मिताली राजच्या नावावर १०,८६८ रन्सचा रेकॉर्ड होता. महिला आशिया कप २०२६ मध्ये हाँगकाँगविरुद्ध १२४ रन्सची मोठी खेळी करत स्मृतीने मितालीचा हा रेकॉर्ड मोडला होता. आता आशियाई गेम्सच्या फायनलमध्ये तिने थेट ११,००० रन्सचा टप्पा ओलांडून सर्वांना मागे टाकले आहे.

45
तिन्ही फॉरमॅटमध्ये स्मृतीचा दबदबा
Image Credit : X/BCCIWomen

तिन्ही फॉरमॅटमध्ये स्मृतीचा दबदबा

५ एप्रिल २०१३ रोजी बांगलादेशविरुद्ध टी-२० मॅचमधून इंटरनॅशनल डेब्यू करणाऱ्या स्मृतीने आतापर्यंत तिन्ही फॉरमॅटमध्ये कमाल केली आहे.

• टेस्ट: ९ मॅचेसमध्ये ७८८ रन्स (२ सेंचुरी, ५ हाफ सेंचुरी)

• वनडे: १२० मॅचेसमध्ये ५,४११ रन्स (१४ सेंचुरी, ३५ हाफ सेंचुरी)

• टी-२०: १७९ मॅचेसमध्ये ४,७९२ रन्स (२ सेंचुरी, ३६ हाफ सेंचुरी, १०१ सिक्स)

एकूण ३०८ मॅचेसमध्ये १८ सेंचुरी आणि ७६ हाफ सेंचुरीच्या मदतीने तिने ११,००१* रन्स पूर्ण केले. टी-२० मध्ये १०० सिक्स मारणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटर असून हा रेकॉर्ड तिने सेमीफायनलमध्येच केला होता.

55
शेफाली वर्मासोबत रचला नवा इतिहास
Image Credit : X/BCCIWomen

शेफाली वर्मासोबत रचला नवा इतिहास

या मॅचमध्ये स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा या जोडीने आणखी एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही विकेटसाठी ४,००० रन्सची पार्टनरशिप करणारी ही पहिली जोडी ठरली आहे. श्रीलंकेविरुद्ध पहिल्या विकेटसाठी त्यांनी ९९ रन्सची पार्टनरशिप करत टीम इंडियाला भक्कम सुरुवात करून दिली. त्यानंतर रिचा घोषने अवघ्या २२ बॉल्समध्ये नाबाद ४९ रन्सची तुफानी खेळी केली. यामुळे भारताने २० ओव्हर्समध्ये ३ विकेट्स गमावून २१६ रन्सचा डोंगर उभा केला.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
क्रिकेट बातम्या
क्रीडा बातम्या

Recommended Stories
Recommended image1
India vs Japan T20: आयआयटी ते जपान क्रिकेट टीम, बिहारचा अभिषेक आनंद भारताशी भिडणार
Recommended image2
Zaheer Khan CSK: चेन्नई सुपर किंग्सचा नवा बॉस! फ्लेमिंगच्या जागी झहीर खानची एन्ट्री
Recommended image3
Zaheer Khan CSK Head Coach: 'आऊट ऑफ सिलॅबस', झहीर खान CSK चा नवा हेड कोच; फॅन्सही झाले थक्क!
Recommended image4
Wasim Akram: 'तू तिथे हरभरे विकत होतास का?', वसीम अक्रमने बाबर आझमची काढली खरडपट्टी
Recommended image5
Women Cricket Records : पुरुष क्रिकेटर्सचे रेकॉर्ड्स मोडणाऱ्या ५ महिला खेळाडू!
Related Stories
Recommended image1
Rahul Dravid ODI Career : 'तो निर्णय घेतला नसता तर द्रविडचं करिअर संपलं असतं', गांगुलीचा मोठा खुलासा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved