- Home
- Sports
- Cricket
- Shikhar Dhawan Wedding : पहिलं लग्न ठरलं डिजास्टर, आता शिखर धवननं थाटात केलं दुसरं लग्न, पाहा PHOTOS
Shikhar Dhawan Wedding : पहिलं लग्न ठरलं डिजास्टर, आता शिखर धवननं थाटात केलं दुसरं लग्न, पाहा PHOTOS
Shikhar Dhawan Wedding : क्रिकेटर शिखर धवनने दुसरं लग्न केलं आहे. त्याने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. याआधी शिखरचं लग्न आयेशा मुखर्जीसोबत झालं होतं आणि त्यांना झोरावर नावाचा एक मुलगाही आहे.
16

Image Credit : Instagram@Shikhardhawan
अखेर घटस्फोट झाला
आठ वर्षांच्या संसारानंतर, ऑक्टोबर २०२३ मध्ये शिखर आणि आयेशा वेगळे झाले. या घटस्फोट प्रकरणात दिल्लीच्या फॅमिली कोर्टाने धवनच्या बाजूने निकाल देत घटस्फोट मंजूर केला.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

26
Image Credit : Instagram@yuzi_chahal23
मुलापासून दूर
पहिलं लग्न मोडल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून मुलगा झोरावरला भेटता आलेलं नाही, असं शिखर धवनने सांगितलं आहे.
36
Image Credit : Instagram@sophieshine93
मुलाला पाहून 2 वर्षं झाली
ANI ला दिलेल्या एका मुलाखतीत धवनने त्याचा मुलगा झोरावरसोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला. तो म्हणाला, "माझ्या मुलाला पाहून दोन वर्षे झाली आहेत. आमचं बोलणं होऊन एक वर्ष झालंय. कारण, मला सर्व बाजूंनी ब्लॉक केलं गेलं आहे. अर्थात, हे खूप कठीण आहे. पण... यासोबत जगायला शिकावं लागतं. मला त्याची खूप आठवण येते."
46
Image Credit : Instagram@yuzi_chahal23
आधी साखरपुडा झाला
लग्नाआधी टीम इंडियाचा माजी क्रिकेटर शिखर धवनने त्याची गर्लफ्रेंड सोफी शाईनसोबत साखरपुडा केला. या जोडीने इन्स्टाग्रामवर एक सुंदर फोटो शेअर करत ही बातमी दिली. 'हास्य आणि स्वप्नं शेअर करण्यापासून... आमच्या या प्रवासाला तुमच्या प्रेमाचा आणि आशीर्वादाची गरज आहे. आता आम्ही एक आहोत,' असं शिखर आणि सोफीने लिहिलं आहे.
56
Image Credit : Instagram@sophieshine93
अनेकांकडून शुभेच्छा
ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये नवीन जोडीवर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव केला. एका युझरने 'तुमचं अभिनंदन' असं लिहिलं, तर दुसऱ्याने हार्ट इमोजी टाकून आनंद व्यक्त केला.
66
Image Credit : Instagram@Shikhardhawan
डेटिंग करत होते
शिखर धवन आणि सोफी शाईन काही काळापासून एकमेकांना डेट करत होते. त्यांनी 'माय लव्ह' असं लिहून आणि लाल हार्ट इमोजी टाकून आपलं नातं सर्वांसमोर जाहीर केलं होतं. तेव्हापासून दोघेही सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि रील शेअर करत असत.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.

