Sanju Samson: टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात नॉकआऊट सामन्यातील ही चौथी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. या यादीत न्यूझीलंडचा फिन ऍलन (१००*) पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ही खेळी केली.

मुंबई: टी-२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध ४२ चेंडूत ८९ धावांची धडाकेबाज खेळी करत संजू सॅमसनने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. टी-२० वर्ल्ड कपच्या नॉकआऊट सामन्यात भारतीय खेळाडूने केलेल्या सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येच्या विक्रमाची संजूने बरोबरी केली आहे. हा विक्रम आधी विराट कोहलीच्या नावावर होता.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

विराट कोहलीने २०१६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये ८९ धावा केल्या होत्या. आता संजूनेही तितक्याच धावा करून विराटच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. विशेष म्हणजे, कोहली आणि संजू या दोघांनीही हा विक्रम मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरच केला आहे.

वर्ल्ड कपच्या इतिहासात नॉकआऊट सामन्यातील ही चौथी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. या यादीतले टॉप स्कोअर्स खालीलप्रमाणे

  1. फिन ऍलन (न्यूझीलंड): दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद १०० धावा.
  2. तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका): २००९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ९६ धावा.
  3. विराट कोहली आणि संजू सॅमसन (भारत): प्रत्येकी ८९ धावा.
  4. ॲलेक्स हेल्स (इंग्लंड): २०२२ मध्ये भारताविरुद्ध ८६ धावा.
View post on Instagram

संजूने फक्त २६ चेंडूत दुसरं अर्धशतक केलं पूर्ण 

संजूने फक्त २६ चेंडूत वर्ल्ड कपमधील आपलं सलग दुसरं अर्धशतक पूर्ण केलं. त्याने आपल्या खेळीत ८ चौकार आणि ७ षटकार लगावले. सलग दुसऱ्या सामन्यात संजूचं शतक थोडक्यात हुकलं. याआधी वेस्ट इंडिजविरुद्धच्या व्हर्च्युअल क्वार्टर फायनलमध्ये त्याने ५० चेंडूत नाबाद ९७ धावा करत भारताला सेमीफायनलचं तिकीट मिळवून दिलं होतं.

View post on Instagram