MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Sports
  • Cricket
  • Jasprit Bumrah Net Worth : आयपीएलमध्ये कोट्यवधींची कमाई, गॅरेजमध्ये मेबॅक... बुमराहची संपत्ती किती?

Jasprit Bumrah Net Worth : आयपीएलमध्ये कोट्यवधींची कमाई, गॅरेजमध्ये मेबॅक... बुमराहची संपत्ती किती?

जसप्रीत बुमराह नेट वर्थ 2026 : जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फास्ट बॉलर्सपैकी एक असलेला टीम इंडियाचा स्टार पेसर जसप्रीत बुमराह मैदानावर यॉर्कर टाकून विकेट्स तर काढतोच, पण कमाईच्या बाबतीतही तो मोठे रेकॉर्ड बनवत आहे.

3 Min read
Author : Karishma R
Published : Oct 03 2026, 11:55 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
बीसीसीआय कॉन्ट्रॅक्ट, कोट्यवधींच्या कार्स आणि अहमदाबादमध्ये व्हिला...
Image Credit : X/Jaspritbumrah93

बीसीसीआय कॉन्ट्रॅक्ट, कोट्यवधींच्या कार्स आणि अहमदाबादमध्ये व्हिला...

टीम इंडियाचा फास्ट बॉलिंग सेन्सेशन जसप्रीत बुमराह मैदानावर यॉर्कर टाकून भल्याभल्या बॅटर्सच्या दांड्या कसा गुल करतो, हे वेगळ्याने सांगायची गरज नाही. वर्ल्ड क्रिकेटमध्ये सर्वात डेंजरस बॉलर म्हणून ओळखला जाणारा बुमराह मैदानाबाहेर आपल्या ब्रँड व्हॅल्यूमधूनही तगडी कमाई करतो.

2026 च्या विविध रिपोर्ट्स आणि फायनान्शियल ट्रॅकर्सच्या अंदाजानुसार, बुमराहची एकूण संपत्ती सुमारे ₹60 कोटी ते ₹80 कोटींच्या घरात आहे. 2013 मध्ये फक्त ₹10 लाखांच्या आयपीएल डीलने करिअरची सुरुवात करणारा बुमराह आज देशातील सर्वात महागड्या स्पोर्ट्स स्टार्सपैकी एक बनला आहे. बुमराहकडे ही कोट्यवधींची संपत्ती कुठून येते, त्याच्या कार्स आणि प्रॉपर्टीज किती आहेत, हे आपण इथे जाणून घेऊया.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
मुंबई इंडियन्स आयपीएल सॅलरी cr: मेगा अमाऊंट रिटेन्शन
Image Credit : ANI

मुंबई इंडियन्स आयपीएल सॅलरी cr: मेगा अमाऊंट रिटेन्शन

बुमराहच्या इन्कम सोर्समध्ये सर्वात मोठा वाटा आयपीएल लीगमधून येतो. 2013 पासून मुंबई इंडियन्स (MI) फ्रँचायझीचा कणा असलेल्या बुमराहला आयपीएल 2026 सीझनसाठी मॅनेजमेंटने तब्बल ₹18 कोटींना रिटेन केले आहे. लीगमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टॉप प्लेयर्सच्या लिस्टमध्ये बुमराह आघाडीवर आहे. दर सीझनला मिळणाऱ्या या ₹18 कोटींच्या फिक्स सॅलरीने त्याचे बँक बॅलन्स जबरदस्त वाढवले आहे.

Related Articles

Related image1
Vinod Kambli : विनोद कांबळी आता कुठे आहे? वृद्धाश्रमातील व्हिडिओ आला समोर
36
बीसीसीआय कॉन्ट्रॅक्ट आणि मॅच फी
Image Credit : X/Jaspritbumrah93

बीसीसीआय कॉन्ट्रॅक्ट आणि मॅच फी

इंडियन क्रिकेट बोर्डाचा (BCCI) वार्षिक करार हा देखील बुमराहच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. बीसीसीआयच्या 2025-26 कॉन्ट्रॅक्ट सायकलमध्ये तो A+ कॅटेगरीमध्ये आहे. सर्वोच्च श्रेणी म्हणून ग्रेड ए कॅटेगरी कायम ठेवली असून, त्यानुसार बुमराहकडे ग्रेड ए कॉन्ट्रॅक्ट आहे. यातून मिळणाऱ्या वार्षिक मानधनासोबतच बोर्ड प्रत्येक मॅचसाठी फी देखील देते.

• टेस्ट मॅच: प्रत्येक मॅचसाठी ₹15 लाख

• वनडे मॅच: प्रत्येक मॅचसाठी ₹6 लाख

• टी-20 मॅच: प्रत्येक मॅचसाठी ₹3 लाख

या मॅच फी आणि परफॉर्मन्स इन्सेंटिव्हच्या माध्यमातूनच बुमराहच्या खात्यात दरवर्षी सुमारे ₹3 कोटी ते ₹5 कोटींची अतिरिक्त कमाई जमा होते.

46
ब्रँड एंडोर्समेंट आणि जाहिरातींचा पाऊस
Image Credit : X/Jaspritbumrah93

ब्रँड एंडोर्समेंट आणि जाहिरातींचा पाऊस

फक्त क्रिकेटच्या मैदानावरच नाही, तर जाहिराती आणि ब्रँड एंडोर्समेंटच्या जगातही बुमराहची जबरदस्त क्रेझ आहे. ड्रीम 11, बोट, एसिक्स, वनप्लस, थम्स अप, झेप्टो, यिप्पी, स्केचर्स, झागल आणि टाटा मोटर्स यांसारख्या टॉप क्लास ब्रँड्सचा तो ब्रँड ॲम्बेसेडर आहे. एका रिपोर्टनुसार, बुमराहचे जवळपास 20 वेगवेगळ्या ब्रँड्ससोबत कॉन्ट्रॅक्ट आहे. एका जाहिरातीसाठी किंवा एंडोर्समेंट डीलसाठी बुमराह दिवसाला ₹1.5 कोटी ते ₹3 कोटी रुपये चार्ज करतो. यातून तो दरवर्षी ₹8 कोटी ते ₹15 कोटींचे उत्पन्न मिळवतो.

56
अहमदाबादमधील ड्रीम होम आणि प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट
Image Credit : X/Jaspritbumrah93

अहमदाबादमधील ड्रीम होम आणि प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट

बुमराह आपला कमावलेला पैसा रिअल इस्टेट आणि इतर डिजिटल ॲसेट्समध्ये अतिशय हुशारीने गुंतवतो. त्याचे मूळ गाव असलेल्या अहमदाबादमध्ये त्याचे एक आलिशान डिझायनर घर आहे. या घराची मार्केट व्हॅल्यू जवळपास ₹3 कोटी ते ₹4 कोटींच्या घरात असल्याचा अंदाज आहे. यासोबतच मुंबईतही बुमराहच्या महागड्या रेसिडेन्शियल प्रॉपर्टीज असून इतर ठिकाणीही त्याने रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्याचे अनेक रिपोर्ट्स सांगतात.

66
बुमराहचे डोळे दीपवणारे लक्झरी कार कलेक्शन
Image Credit : X/Jaspritbumrah93

बुमराहचे डोळे दीपवणारे लक्झरी कार कलेक्शन

क्रिकेट स्टार्सना कार्सची किती क्रेझ असते, हे वेगळ्याने सांगायची गरज नाही. बुमराहच्या गॅरेजमध्येही सुपर फास्ट आणि लक्झरी कार्सचे शानदार कलेक्शन आहे.

• Mercedes-Maybach S560: अतिशय महागड्या आणि लक्झरी फीचर्स असलेल्या या कारची किंमत सुमारे ₹2 कोटींहून अधिक आहे.

• Nissan GT-R: वेगासाठी ओळखल्या जाणाऱ्या या सुपर कारची किंमतही ₹2 कोटींच्या पुढे आहे.

• Range Rover Velar: जवळपास ₹90 लाख किंमत असलेली ही मोस्ट रॉयल एसयूव्ही आहे.

• Toyota Innova Crysta, Hyundai Verna: रोजच्या प्रवासासाठी सोयीस्कर असलेल्या इतर कार्स.

क्रिकेटच्या मैदानावर टीम इंडियाला विजय मिळवून देणारा विकेट-टेकिंग बॉलर म्हणून नावारूपाला आलेल्या बुमराहने आपल्या मेहनतीच्या जोरावर हे कोट्यवधींचे आर्थिक साम्राज्य उभे केले आहे.

क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
क्रिकेट बातम्या
क्रीडा बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Mohammed Shami: न्यूझीलंड दौऱ्यावर नजर, मोहम्मद शमीची बंगालच्या रणजी संघात एन्ट्री
Recommended image2
Shaurya Bhattacharya: कपिल देव इन्व्हिटेशनल गोल्फ स्पर्धेत शौर्य भट्टाचार्यची शानदार आघाडी
Recommended image3
Rishabh Pant : दिल्ली कॅपिटल्समध्ये ऋषभ पंतची भूमिका काय? प्रशिक्षक सौरव गांगुलीने केला खुलासा
Recommended image4
Bhuvneshwar Kumar Comeback : 'भुवी'च्या कमबॅकवर सुरेश रैना खूश, म्हणाला...
Recommended image5
Virat Kohli : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात जाण्यासाठी 5 कोटी घेतले? विराट कोहलीने सांगितलं सत्य, अधिकृत माहिती समोर
Related Stories
Recommended image1
Vinod Kambli : विनोद कांबळी आता कुठे आहे? वृद्धाश्रमातील व्हिडिओ आला समोर
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved