IPL 2026 CSK vs PBKS Match Preview : IPL 2026 मध्ये आज, शुक्रवार ३ एप्रिल रोजी, दोन 'किंग्स' संघात लढत होणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणारा हा सामना जबरदस्त रंगतदार होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया दोन्ही टीम्सची संभाव्य प्लेइंग XI आणि इतर महत्त्वाची माहिती.

IPL 2026 CSK vs PBKS Match Preview : आयपीएल 2026 चा सातवा सामना आज (शुक्रवार, ३ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात खेळवला जाईल. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. गुवाहाटीमध्ये झालेल्या पराभवानंतर, आता घरच्या मैदानावर आपल्या चाहत्यांसमोर खेळण्याचा टीमला नक्कीच फायदा होईल, अशी आशा CSK चे बॅटिंग कोच मायकल हसी यांनी व्यक्त केली आहे.

चेपॉक पिच रिपोर्ट: सपाट खेळपट्टीवर बॅट्समनची चांदी

चेन्नईची खेळपट्टी आता पूर्वीपेक्षा जास्त सपाट (flat) झाली आहे. अशा पिचवर मोठे शॉट्स खेळणाऱ्या फलंदाजांना जास्त फायदा मिळतो. उदाहरणार्थ, संजू सॅमसन, ज्याने यावर्षी T20 क्रिकेटमध्ये प्रत्येक ८ बॉलमागे एक सिक्सर मारला आहे. असे फलंदाज चेपॉकच्या नव्या परिस्थितीमध्ये जास्त प्रभावी ठरू शकतात.

PBKS ची ताकद: पॉवर-हिटिंग बॅटिंग लाईनअप

मोठे शॉट्स खेळण्यात पंजाब किंग्सही मागे नाही. प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग ओपनिंगलाच धमाकेदार सुरुवात करून देतात. या दोघांनी आपल्या IPL करिअरमधील निम्मे सिक्सर्स पॉवरप्लेमध्येच मारले आहेत. श्रेयस अय्यर मधल्या ओव्हर्समध्ये आक्रमक बॅटिंग करतो. तर शशांक सिंग डेथ ओव्हर्समध्ये मोठे फटके मारण्यात माहिर आहे आणि तो IPL 2025 मध्ये सर्वाधिक सिक्सर्स मारणाऱ्या खेळाडूंपैकी एक होता.

Head-to-Head: चेन्नईमध्ये PBKS चा रेकॉर्ड मजबूत

चेन्नईमध्ये CSK विरुद्ध चांगला रेकॉर्ड असलेल्या काही मोजक्या टीम्सपैकी PBKS एक आहे. इथे झालेल्या एकूण ९ सामन्यांपैकी PBKS ने ५ जिंकले आहेत, तर CSK ला ४ सामन्यांत विजय मिळाला आहे. चेपॉकमधील गेल्या तीन सामन्यांमध्येही पंजाबचंच पारडं जड राहिलं आहे.

CSK संभाव्य प्लेइंग XI

संजू सॅमसन (विकेटकीपर)

ऋतुराज गायकवाड (कर्णधार)

आयुष म्हात्रे

मॅट शॉर्ट

शिवम दुबे

सरफराज खान / प्रशांत वीर

कार्तिक शर्मा

जेमी ओवरटन

नूर अहमद

मॅट हेन्री

अंशुल कंबोज

खलील अहमद

PBKS संभाव्य प्लेइंग XI

श्रेयस अय्यर (कर्णधार)

प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर)

प्रियांश आर्य

कूपर कोनोली

नेहल वढेरा

शशांक सिंग

मार्कस स्टोइनिस

मार्को जानसन

जेवियर बार्टलेट

विजयकुमार विशक

अर्शदीप सिंग

युजवेंद्र चहल