MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Sports
  • Cricket
  • Gen Z Indian Cricketers : रोहित-विराटनंतर आता यांचीच हवा; कमाई ऐकून थक्क व्हाल

Gen Z Indian Cricketers : रोहित-विराटनंतर आता यांचीच हवा; कमाई ऐकून थक्क व्हाल

जेन झी क्रिकेटर्स इंडिया: रोहित शर्मा, विराट कोहलीच्या युगानंतर आता तरुण, टॅलेंटेड खेळाडू टीम इंडियाची धुरा सांभाळायला सज्ज झालेत. हे खेळाडू फक्त त्यांच्या दमदार खेळानेच नाही, तर ब्रँड एंडोर्समेंट, आयपीएल कॉन्ट्रॅक्ट्समधून कोट्यवधी रुपये कमवत आहेत.

3 Min read
Author : Karishma R
Published : Oct 20 2026, 03:36 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
कोट्यधीश यंग इंडियन क्रिकेटर्स... हीच आहे जेन झीची हवा!
Image Credit : Asianet News

कोट्यधीश यंग इंडियन क्रिकेटर्स... हीच आहे जेन झीची हवा!

आपल्या देशात क्रिकेट हा फक्त खेळ नाही, तर एक भावना आहे. काळानुसार आपल्या देशाला अनेक दिग्गज खेळाडू मिळाले. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या स्टार खेळाडूंनी आपल्या सर्वांच्या हृदयात जागा निर्माण केली.

पण आता वेळ बदलली आहे. क्रिकेट विश्वावर आता 'जेन झी' (Gen Z) पिढीने ताबा मिळवला आहे. प्रत्येक क्षेत्रात आपली ताकद दाखवणारी ही पिढी क्रिकेटच्या पिचवरही धुमाकूळ घालत आहे. सध्या भारतीय क्रिकेटमध्ये जेन झी खेळाडूंचीच हवा आहे.

वनडे आणि टेस्टमध्ये आपल्या राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करणारा शुभमन गिल असो किंवा अगदी लहान वयात टीम इंडियात एन्ट्री मारणारा वैभव सूर्यवंशी, हे सगळे याच पिढीचे आहेत. अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि यशस्वी जैस्वाल हेसुद्धा या यादीत टॉपवर आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
शुभमन गिल - प्रिन्स ऑफ इंडियन क्रिकेट
Image Credit : X@BCCI

शुभमन गिल - प्रिन्स ऑफ इंडियन क्रिकेट

या जेन झी क्रिकेटर्सच्या यादीत सर्वात पहिलं नाव येतं ते शुभमन गिलचं. तो २७ वर्षांचा आहे. पंजाबमधील फाजिल्का येथे त्याचा जन्म झाला. इतक्या लहान वयात टीम इंडियाचं नेतृत्व करणं ही साधी गोष्ट नाही. शुभमन सध्या टेस्ट आणि वनडे फॉरमॅटमध्ये कॅप्टन म्हणून जबाबदारी सांभाळत आहे.

पण टी-२० इंटरनॅशनलमध्ये तो कॅप्टन नाही. त्याला सगळे प्रेमाने 'प्रिन्स ऑफ इंडियन क्रिकेट' म्हणतात. आयपीएलमध्ये तो गुजरात टायटन्स संघाचा कॅप्टन आहे.

संपत्तीचा विचार केला तर, शुभमन गिलची अंदाजित संपत्ती ८० कोटी ते १०० कोटी रुपयांच्या घरात आहे. बीसीसीआय कॉन्ट्रॅक्ट, आयपीएलची फी आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून तो बक्कळ कमाई करतो.

Related Articles

Related image1
Virat Kohli BCCI Salary : रोहित शर्मा आणि विराट कोहली एका वनडे मॅचसाठी किती फी घेतात?
36
यशस्वी जैस्वाल
Image Credit : X/BCCI

यशस्वी जैस्वाल

जेन झी स्टार्समध्ये यशस्वी जैस्वालचं नावही आवर्जून घेतलं जातं. तो २४ वर्षांचा आहे. उत्तर प्रदेशातील भदोही जिल्हा हे त्याचं मूळ गाव. टीम इंडियामध्ये ओपनिंग बॅट्समन म्हणून मैदानात उतरणारा यशस्वी त्याच्या आक्रमक बॅटिंगसाठी प्रसिद्ध आहे.

आज या टप्प्यावर पोहोचण्यासाठी यशस्वीने खूप कष्ट घेतले आहेत, त्याचा प्रवास अनेक संघर्षांनी भरलेला आहे. आयपीएलमध्ये हा युवा खेळाडू राजस्थान रॉयल्स टीमकडून खेळतो.

'द स्पोर्ट्स लिजेंड' संस्थेने या वर्षी ११ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, २०२६ पर्यंत यशस्वी जैस्वालची अंदाजित संपत्ती सुमारे ५५ कोटी रुपये असेल.

46
अभिषेक शर्मा - पॉवर हिटर
Image Credit : BCCI

अभिषेक शर्मा - पॉवर हिटर

या यादीत तिसरं नाव आहे अभिषेक शर्माचं. तो २६ वर्षांचा आहे. यापूर्वी त्याने भारताकडून अंडर-१९ वर्ल्ड कपही खेळला आहे. अभिषेकची बॅटिंग पाहताना नजर हटत नाही, तो चाहत्यांना अक्षरशः वेड लावतो.

अभिषेक लेफ्ट हँड बॅट्समन आहे आणि एक उत्तम ऑलराउंडरही आहे. टीम इंडियाकडून तो ओपनर म्हणून मैदानात उतरतो. आयपीएलमध्ये तो सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना आपली चमक दाखवत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिषेक शर्माची एकूण संपत्ती सुमारे १२ कोटी ते ३० कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे.

56
तिलक वर्मा - मिडल ऑर्डरची ताकद
Image Credit : PTI

तिलक वर्मा - मिडल ऑर्डरची ताकद

जेन झी क्रिकेटर्समध्ये आणखी एक नाव म्हणजे तिलक वर्मा. तो २३ वर्षांचा आहे. ८ नोव्हेंबर २००२ रोजी तेलंगणातील हैदराबादमध्ये त्याचा जन्म झाला. तिलक फक्त लेफ्ट हँड बॅट्समन नाही, तर गरज पडल्यास तो ऑफ-स्पिन बॉलिंगही करू शकतो.

त्याची बॅटिंग स्टाईल खूप खास आहे. प्रेशरमध्येही क्रीजवर टिकून राहणं आणि संधी मिळताच वेगाने रन्स काढणं ही त्याची खासियत आहे. विशेषतः टी-२० फॉरमॅटमध्ये तो भारताकडून मिडल ऑर्डरमध्ये खेळतो. आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्स टीमचं प्रतिनिधित्व करतो.

मीडियाच्या अंदाजानुसार, तिलक वर्माची संपत्ती सुमारे २० कोटी रुपयांहून अधिक आहे. मुंबई इंडियन्सकडून मिळणारी सॅलरी, मॅच फी आणि ब्रँड्सच्या माध्यमातून तो ही कमाई करतो.

66
वैभव सूर्यवंशी - सर्वात कमी वयाचा सेन्सेशन
Image Credit : ANI

वैभव सूर्यवंशी - सर्वात कमी वयाचा सेन्सेशन

जेन झी स्टार्सच्या यादीत वैभव सूर्यवंशीचं नाव सध्या हॉट टॉपिक बनलं आहे. या युवा खेळाडूचं वय अवघं १५ वर्षे आहे. २७ मार्च २०११ रोजी बिहारमधील समस्तीपूरमध्ये त्याचा जन्म झाला. इतक्या लहान वयातच त्याने आपल्या आक्रमक बॅटिंगने क्रिकेट विश्वाला थक्क केलं आहे.

वैभव लेफ्ट हँड बॅट्समन आहे. मैदानात मोठे सिक्सर मारण्यात तो पटाईत आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या या यंग स्टारने आपल्या स्फोटक बॅटिंगने आधीच काही रेकॉर्ड्स मोडले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वैभव सूर्यवंशीची एकूण संपत्ती सुमारे २.५ कोटी ते ७ कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचं समजतं.

हे सर्व जेन झी क्रिकेटर्स आपल्या मेहनतीवर आणि टॅलेंटवर खूप लहान वयातच क्रिकेटमध्ये चमत्कार घडवत आहेत. शुभमनची कॅप्टनन्सी, यशस्वीचा आक्रमकपणा, अभिषेकचे मोठे शॉट्स, तिलकचा संयम आणि वैभवची फटकेबाजी... हे सगळं आपल्या इंडियन क्रिकेटचं फ्युचर काय असेल हे दाखवून देतं.

क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
क्रिकेट बातम्या
2nd TEST • SA vs AUS
Lunch
SASA
(72.0 ov)216/6
AUSAUS
-
Day 3 - Session 1
Schedule ›
5th T20 • IND vs WI
abandoned
INDIND
118/5
WIWI
-
Match abandoned
Schedule ›
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Hardik Pandya Fan: २३०० किमी पायी चालत आलेल्या फॅनला हार्दिकने दिलं खास गिफ्ट
Recommended image2
Sanju Samson Jailer 2 : संजू सॅमसनने 'जेलर 2' पाहण्यासाठी अख्खं थिएटरच बुक केलं; सोबत टीम इंडियाचे भिडूही
Recommended image3
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने तिन्ही फॉरमॅट खेळू नयेत, टेस्टवर फोकस करावा; रवी शास्त्रींचा सल्ला
Recommended image4
BCCI Selection Committee : अजित आगरकरच्या जागी रमेश पोवारची एन्ट्री; प्रज्ञान ओझा नवा चेअरमन
Recommended image5
MS Dhoni Viral Video : अनंत अंबानींनी धोनीला राईडवर बोलावले, कॅप्टन कूलची रिअ‍ॅक्शन व्हायरल
Related Stories
Recommended image1
Virat Kohli BCCI Salary : रोहित शर्मा आणि विराट कोहली एका वनडे मॅचसाठी किती फी घेतात?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved