- Home
- Sports
- Cricket
- अविश्वसनीय! एकाच षटकात ५ विकेट्स; क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला असा चमत्कार!
अविश्वसनीय! एकाच षटकात ५ विकेट्स; क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला असा चमत्कार!
एका ओव्हरमध्ये 5 विकेट्स: इंडोनेशियाचा गोलंदाज गेडे प्रियांदनाने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये एकाच ओव्हरमध्ये 5 विकेट्स घेऊन इतिहास रचला. कंबोडियाविरुद्धच्या सामन्यात हा अनोखा विश्वविक्रम नोंदवला गेला.

विश्वविक्रम: एकाच ओव्हरमध्ये 5 विकेट्स घेणारा गोलंदाज!
क्रिकेटमध्ये कधीकधी चमत्कार घडतात. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असाच एक अविश्वसनीय विक्रम इंडोनेशियाच्या गोलंदाजाने केला आहे. त्याने एकाच ओव्हरमध्ये पाच विकेट्स घेऊन इतिहास रचला.
विश्वविक्रम मोडणारा गेडे प्रियांदना
या कामगिरीमुळे गेडे प्रियांदनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खास ओळख निर्माण केली आहे. पुरुष किंवा महिला T20 मध्ये एका ओव्हरमध्ये ५ विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे.
कंबोडियाची बॅटिंग लाईनअप अशी कोसळली...
१६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कंबोडिया १५ ओव्हरमध्ये ५ बाद १०६ धावांवर होता. तेव्हा कर्णधाराने चेंडू गेडे प्रियांदनाकडे दिला आणि त्याने सामनाच फिरवला.
हॅटट्रिकने सुरू झाली गेडे प्रियांदनाची कमाल
त्या ऐतिहासिक ओव्हरची सुरुवात हॅटट्रिकने झाली. पहिल्या ३ चेंडूंवर ३ विकेट्स, चौथा चेंडू निर्धाव आणि शेवटच्या २ चेंडूंवर २ विकेट्स घेतल्या. यामुळे कंबोडियाचा संघ कोसळला.
शतक झळकावून धर्म केशुमाची शानदार कामगिरी
गोलंदाजीत प्रियांदना चमकला, तर फलंदाजीत धर्म केशुमाने ६८ चेंडूंत नाबाद ११० धावा केल्या. त्याच्या शतकामुळेच इंडोनेशियाने १६८ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते.
याआधी हा विक्रम कोणाच्या नावावर होता?
आंतरराष्ट्रीय T20 मध्ये हे पहिल्यांदाच घडले आहे. याआधी देशांतर्गत क्रिकेटमध्ये अल-अमीन हुसेन आणि अभिमन्यू मिथुन यांनी एका ओव्हरमध्ये ५ विकेट्स घेतल्या होत्या.
