MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Sports
  • Cricket
  • Asia Cup 2025 : आजचा भारत-पाकिस्तान सामना होणार की नाही? वाचा BCCI च्या गोटात काय घडले? भारतीय खेळाडूंसोबत काय चर्चा झाली?

Asia Cup 2025 : आजचा भारत-पाकिस्तान सामना होणार की नाही? वाचा BCCI च्या गोटात काय घडले? भारतीय खेळाडूंसोबत काय चर्चा झाली?

Asia Cup 2025 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आज संध्याकाळी ८ वाजता रंगणार आहे, पण सामन्यापूर्वी अनेक राजकीय आणि भावनिक वादळ उठले आहे. टीम इंडियातही आज मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे आज सामना होणार की नाही, असे विचारले जात आहे.

2 Min read
Author : Asianetnews Team Marathi
Published : Sep 14 2025, 01:41 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
शिवसेनेचा जोरदार विरोध
Image Credit : X/ Rayham, ANI

शिवसेनेचा जोरदार विरोध

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय संघाने हा सामना खेळू नये, अशी जोरदार मागणी देशभरातून होत आहे. बीसीसीआयने सामना खेळण्याची परवानगी दिली असली तरी अनेक नेत्यांनी जाहीरपणे या भूमिकेला विरोध दर्शवला आहे. एवढेच नव्हे तर पहलगाम हल्ल्यातील काही शहिदांच्या पत्नीनेही हा सामना होऊ नये असे म्हटले आहे. महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गटाने या मॅचला जोरदार विरोध केला आहे. उद्धव ठाकरे यांनी युद्ध आणि सामना सोबत कसे होऊ शकतो, असे म्हटले आहे. संजय राऊत यांनीही आज पत्रकार परिषद घेऊन याला विरोध केला आहे. त्यामुळे हा सामना होणार की नाही असा प्रश्न विचारला जात आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
खेळाडूंसोबत बैठक
Image Credit : ANI

खेळाडूंसोबत बैठक

सामन्याला काही तास शिल्लक असताना, टीम इंडियाच्या गोटातूनही एक मोठी बातमी समोर आली आहे. अनेक खेळाडूंच्या मनातही हा सामना खेळू नये अशी भावना आहे. संपूर्ण देशातून होणारा विरोध पाहता, संघातही यावर जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, कोणताही खेळाडू जाहीरपणे बोलण्यास तयार नाही. खेळाडूंच्या मनातील हा संभ्रम दूर करण्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसह सर्व सपोर्ट स्टाफने खेळाडूंशी चर्चा केली. त्यांनी खेळाडूंना 'व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून सामन्याकडे पहा' असा सल्ला दिला आहे. खेळाडू वृत्ती जागृत ठेवून मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न करा असेही सांगण्यात आले आहे.

Related Articles

Related image1
तुमची 3D इमेज बनवण्यासाठी Google Gemini च्या Nano Banana फीचरचा असा करा वापर, स्टेप बाय स्टेप प्रोसेस!
Related image2
Asia Cup 2025 : Team India विरुद्धच्या सामन्यापूर्वी Pakistan Team ची ताकद, कमकुवत बाजू यासह इतर विश्लेषण!
35
मैदानावर भारत विरुद्ध पाकिस्तान
Image Credit : Getty

मैदानावर भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजे नेहमीच तणावपूर्ण आणि उत्कंठावर्धक असतो. मैदानाबाहेरही या सामन्याचे महत्त्व खूप मोठे असते. या सामन्याला भावनिक किनार असल्याने दोन्ही संघांमध्ये कडवा संघर्ष पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, सध्याच्या संघांची ताकद पाहता पाकिस्तानचा संघ भारतापुढे किती मोठे आव्हान उभे करेल, हा प्रश्नच आहे.

45
भारताची फलंदाजी खूपच मजबूत
Image Credit : X/@BCCI

भारताची फलंदाजी खूपच मजबूत

भारतीय गोलंदाजांना रोखण्यापेक्षा भारतीय फलंदाजांना थांबवण्याचे मोठे दडपण पाकिस्तानच्या संघावर असणार आहे. शुभमन गिल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे हे कोणत्याही गोलंदाजीची धुलाई करू शकतात. पाकिस्तानचा फाहीम अश्रफ एक चांगला अष्टपैलू मानला जातो, पण तो हार्दिक पांड्याप्रमाणे एकहाती सामना जिंकून देऊ शकत नाही.

55
शाहीन आफ्रिदी
Image Credit : ANI

शाहीन आफ्रिदी

पाकिस्तानचा मुख्य गोलंदाज शाहीन आफ्रिदीने २०२१ च्या स्पर्धेत याच मैदानावर लोकेश राहुल आणि रोहित शर्माला एकाच षटकात बाद केले होते, पण त्यानंतर गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे त्याच्या गोलंदाजीची धार कमी झाली आहे. आता त्याला चेंडू उशिरा स्विंग करता येत नाही, ज्यामुळे त्याची भेदकता कमी झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या गोलंदाजांपुढे भारताचे फलंदाज काय कमाल करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
क्रिकेट बातम्या

Recommended Stories
Recommended image1
IPL Match Today : आज कुणाचा सामना? पंजाब-दिल्ली धर्मशाळात भिडणार, एका चुकीने प्लेऑफचं स्वप्न भंगणार!
Recommended image2
Happy Birthday Rohit Sharma : हॅप्पी बर्थ डे रोहित शर्मा; वाढदिवसानिमित्त वाचा 'हिटमॅन'ची रेकॉर्डब्रेक कारकीर्द
Recommended image3
वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम; सर्वात जलद १००० धावांचा टप्पा केला पूर्ण
Recommended image4
Virat-Anushka: विराट-अनुष्का पुन्हा एकदा प्रेमानंद महाराजांच्या चरणी, वृंदावनातील आश्रमात लावली हजेरी
Recommended image5
क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडचं घर आहे खास, पाहून जाल हरखून
Related Stories
Recommended image1
तुमची 3D इमेज बनवण्यासाठी Google Gemini च्या Nano Banana फीचरचा असा करा वापर, स्टेप बाय स्टेप प्रोसेस!
Recommended image2
Asia Cup 2025 : Team India विरुद्धच्या सामन्यापूर्वी Pakistan Team ची ताकद, कमकुवत बाजू यासह इतर विश्लेषण!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved