MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Sports
  • Cricket
  • Arshdeep Singh Fiancee : अर्शदीप सिंहची सिक्रेट एंगेजमेंट... कोण आहे ही समरीन कौर?

Arshdeep Singh Fiancee : अर्शदीप सिंहची सिक्रेट एंगेजमेंट... कोण आहे ही समरीन कौर?

टीम इंडियाचा स्टार फास्ट बॉलर अर्शदीप सिंहने अभिनेत्री समरीन कौरसोबत एंगेजमेंट केली आहे. न्यूझीलंडमध्ये झालेल्या या सोहळ्याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. अर्शदीपची होणारी बायको समरीन नक्की कोण आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?

2 Min read
Author : Karishma R
Published : Nov 13 2026, 03:11 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
एकिकडे मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री तर दुसरीकडे गर्लफ्रेंडसोबत एंगेजमेंट...
Image Credit : instagram/samreenkaur__

एकिकडे मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री तर दुसरीकडे गर्लफ्रेंडसोबत एंगेजमेंट...

टीम इंडियाचा स्टार फास्ट बॉलर अर्शदीप सिंहने आपल्या वैयक्तिक आयुष्यात एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री समरीन कौरसोबत त्याने एंगेजमेंट केली आहे. बुधवारी, 11 नोव्हेंबरला हा सोहळा पार पडला. सध्या न्यूझीलंडसोबत सुरू असलेल्या वनडे सिरीजसाठी अर्शदीप तिथेच आहे. याच दौऱ्यात त्याने समरीनला अंगठी घालून खूप रोमँटिक अंदाजात प्रपोज केलं. समरीनने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर याचे फोटो शेअर केल्यावर ही बातमी समोर आली.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
इन्स्टाग्रामवर केली इमोशनल पोस्ट
Image Credit : Instagram/samreenkaur__

इन्स्टाग्रामवर केली इमोशनल पोस्ट

एंगेजमेंटच्या अंगठीसोबतच, अर्शदीप तिला अंगठी घालत असल्याचे फोटो समरीनने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंना तिने एक सुंदर कॅप्शनही दिलं आहे. "आयुष्याने मला जे काही दिलंय, त्यात आपण एकमेकांना मिळालो, याचा मला सर्वात जास्त आनंद आहे. आयुष्यभर एकत्र राहण्यासाठी.. 11.11.2026 (हाय फिऑन्से)," असं तिने लिहिलंय.

आयपीएल 2027 च्या सीझनआधी पंजाब किंग्समधून मुंबई इंडियन्स टीममध्ये गेल्याच्या काही तासांतच अर्शदीपने ही गुड न्यूज दिली. हार्दिक पंड्याच्या ट्रेड डीलद्वारे अर्शदीप मुंबईच्या टीममध्ये गेला आहे. पण, त्यांच्या लग्नाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

View this post on Instagram

A post shared by Samreen (@samreenkaur__)

Related Articles

Related image1
Hardik Pandya Trade : अखेर अधिकृत घोषणा, हार्दिकचा मुंबईला रामराम, आता पंजाबमध्ये, अर्शदीप सिंग मुंबईत
35
कोण आहे ही समरीन कौर?
Image Credit : Instagram/samreenkaur__

कोण आहे ही समरीन कौर?

अर्शदीप सिंहची होणारी बायको समरीन कौर ही एक अभिनेत्री, मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. 7 सप्टेंबर 1999 रोजी जम्मू काश्मीरमध्ये तिचा जन्म झाला. तिने पुण्यातील सिंबायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समधून बीकॉम (ऑनर्स) पूर्ण केलंय.

शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने मॉडेलिंग आणि अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. 2018 मध्ये झालेल्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेत तिने जम्मू काश्मीरचं प्रतिनिधीत्व करत फायनलिस्टपर्यंत मजल मारली. या ओळखीमुळे तिला मनोरंजन क्षेत्रात चांगल्या संधी मिळाल्या.

45
चित्रपट आणि म्युझिक व्हिडिओंमधून मिळवली ओळख
Image Credit : Instagram/samreenkaur__

चित्रपट आणि म्युझिक व्हिडिओंमधून मिळवली ओळख

समरीन कौरने हिंदी आणि पंजाबी भाषेत अनेक प्रोजेक्ट्स केले आहेत. 1983 च्या क्रिकेट वर्ल्ड कप विजयावर आधारित कबीर खान दिग्दर्शित बॉलिवूड चित्रपट '83' मध्ये ती एका छोट्या भूमिकेत दिसली होती. तसेच अर्जुन रामपाल स्टारर 'नेल पॉलिश' वेब सिरीज आणि 'सरदार जी 2', 'बावरी' सारख्या पंजाबी चित्रपटांमध्येही तिने काम केलंय.

चित्रपटांपेक्षा म्युझिक व्हिडिओंमुळे तिला जास्त प्रसिद्धी मिळाली. बादशहा, गुरु रंधवा, जुबिन नौटियाल, जस्स मानक, मनिंदर बुट्टर सारख्या स्टार सिंगर्सच्या गाण्यांमध्ये तिने काम केलंय. 'बावला', 'तुझे भूलना तो चाहा' या गाण्यांनी तिला चांगली ओळख मिळवून दिली.

55
आयपीएलपासून एंगेजमेंटपर्यंतची लव्ह स्टोरी
Image Credit : Instagram/samreenkaur__

आयपीएलपासून एंगेजमेंटपर्यंतची लव्ह स्टोरी

आयपीएल 2026 च्या वेळी समरीन कौर पंजाब किंग्सचे सामने पाहायला जायची आणि अर्शदीपला चीअर करायची, तेव्हापासूनच त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर दोघेही धर्मशालाला सुट्ट्या घालवण्यासाठी गेल्याचे फोटो व्हायरल झाले होते. जुलै 2026 मध्ये अर्शदीपने आपल्या इन्स्टाग्रामवर समरीनसोबतचे फोटो शेअर करत, 'माय पर्सन' म्हणत त्यांच्या नात्याला अधिकृत दुजोरा दिला होता.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत विकेट घेतल्यानंतर अर्शदीपने केलेलं खास डान्स सेलिब्रेशन त्याने समरीनलाच डेडिकेट केलं होतं. नुकतंच नोव्हेंबरच्या सुरुवातीला त्यांच्या नात्यावर झालेल्या ऑनलाइन ट्रोलिंगला समरीनने सडेतोड उत्तर दिलं होतं. वयाच्या 17 व्या वर्षापासून आपण स्वतःच्या पायावर उभे असल्याचं तिने स्पष्ट केलं, तेव्हा अर्शदीपनेही तिला पाठिंबा दिला होता.

क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
क्रिकेट बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Arshdeep Singh Fiancee : अर्शदीप सिंहची झाली एंगेजमेंट! कोण आहे ही समरीन कौर?
Recommended image2
India Vs New Zealand : न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या वनडेत श्रेयस अय्यरने जिंकला टॉस, गोलंदाजीचा निर्णय
Recommended image3
Virat Kohli : विराट कोहलीने चाहत्याच्या कॉमिक टॉयवर ऑटोग्राफ देण्यास दिला नकार; म्हणाला, 'तू हे जास्त पैशांना विकशील'
Recommended image4
IPL Top 5 Trades : आयपीएलचा इतिहास बदलणारे 5 भन्नाट ट्रेड्स, संजू-हार्दिकची डील पाहून थक्क व्हाल
Recommended image5
Hardik Pandya : 'श्रेयस माझा कर्णधार', पंजाब किंग्जमध्ये आल्यावर हार्दिक पंड्याची पहिली प्रतिक्रिया
Related Stories
Recommended image1
Hardik Pandya Trade : अखेर अधिकृत घोषणा, हार्दिकचा मुंबईला रामराम, आता पंजाबमध्ये, अर्शदीप सिंग मुंबईत
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved