Ajinkya Rahane Announces Retirement : क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसर सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय आणि सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज, मागील २० वर्षांपासून तो क्रिकेटचा भाग होता. त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. अजिंक्यने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने तो क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्त होत असल्याचं सांगितलं आहे.

३० जुलै रोजी, गुरुवारी, इन्स्टाग्रामवर पोस्ट करत अजिंक्यने लिहिलंय, कॅप २७८, निरोप घेतो. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल, मागील अनेक वर्षांपासून देत असलेल्या पाठिंब्यासाठी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार, मी कायम कृतज्ञ राहीन, असं कॅप्शन लिहित ३८ वर्षीय अजिंक्यने क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं सांगितलं आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला सर्वच स्तरातून प्रेम मिळत आहे.

View post on Instagram

आयुष्याचं हेच सत्य आहे, की प्रत्येक गोष्टीला सुरुवात आणि शेवटही असतो. मी नेहमीच बॅटिंग करताना टायमिंगवर विश्वास ठेवला. जेव्हा वेळ येते तेव्हा पुढे जावंच लागतं. माझ्यासाठी पुढे जाण्याची आणि निवृत्ती घेण्याची योग्य वेळ आली आहे, असं म्हणत अजिंक्यने आपली निवृत्ती जाहीर केली.

अजिंक्य रहाणे क्रिकेटच्या तीनही प्रकारांमध्ये नेतृत्त्व करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. अजिंक्यने कसोटी क्रिकेटमध्ये सहा मॅचमध्ये भारताचं नेतृत्त्व केलं आहे. या सहापैकी चार मॅच जिंकले, तर दोन मॅच अनिर्णित होत्या. महत्त्वाची बाब म्हणजे कर्णधारपदाखाली भारताला एकाही कसोटी सामन्यात पराभव मिळालेला नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन सामन्यांमध्ये रहाणेने कर्णधारपद भूषवलं होतं. हे सामनेही त्याच्या नेवृत्त्वाखाली जिंकले.

अजिंक्य रहाणेने भारतासाठी ८५ कसोटी सामने, ९० एकदिवसीय सामने आणि टी-२० चे २० आंतरराष्ट्रीय सामने तो खेळला आहे. त्याने सर्व सामन्यांमध्ये ८४१४ रन्स केले. यापैकी १५ शतकं आणि ५१ अर्धशतकांचा समावेश आहे.