Sachin Ahir Residence Theft : शिवसेना नेते सचिन अहिर यांच्या घरी २.६५ लाखांची चोरी झाली आहे. या घटनेत एकाला अटक करण्यात आली आहे.
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते सचिन अहिर यांच्या घरातून मागील पाच वर्षात तब्बल २.६५ कोटी रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची समोर आलं. पाच वर्षात झालेल्या या चोरीच्या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक करण्यात आल आहे. तर तीन जण फरार आहेत. फरार असलेल्या तिघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
सचिन अहिर यांच्या घरातून २.६५ कोटी इतक्या किमतीच्या अनेक वस्तू गायब झाल्या, चोरीला गेल्या. या चोरीला गेलेल्या वस्तूंमध्ये हिऱ्यांच्या सोन्याच्या बांगड्या, तसंच अंगठ्या, पाच हिऱ्यांचे हार आणि अंगठ्या, १०० ग्रॅम सोन्याची बिस्किटं, चांदीचे पेले, पाण्याची भांडी अशा २.६५ कोटींचं मौल्यवान सामान चोरीला गेलं होतं.
ऑक्टोबर २०२५ मध्ये त्यांच्या घरात आग लागली होती. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. घरात खर्चासाठी ठेवलेले पैसे या आगीनंतर गायब झाले. त्यामुळे या आगीतच हे पैसे जळून खाक झाल्याचा अंदाज कुटुंबाने व्यक्त केला होता. या घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्या सीसीटीव्हीमध्ये काही भाग गायब असल्याचं समोर आलं. त्यामुळे संशय वाढला.
याची माहिती पोलिसांत देण्यात आली. तपासात घरातील काम करणाऱ्या नोकरांनीच अतिशय पद्धतशीरपणे, प्लॅन करून रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंची चोरी केली होती. या वस्तू आणि रोख रक्कम मिळून हा आकडा २.६५ इतका होता.
मुंबई क्राईम ब्रांचकडून या चोरीच्या प्रकरणात सचिन अहिर यांच्या घरातील प्रविण सोलंकी या नोकराला अटक केली आहे. त्याला ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तसंच इतर अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील आरोपींचा शोध सुरू आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अटक करण्यात आलेला ४५ वर्षीय प्रविण सोलंकी मागील २४ वर्षांपासून सचिन अहिर यांच्या घरात काम करत होता. त्यानेच साथीदारांच्या मदतीने इतकी मोठी चोरी केली आहे. सोलंकी याने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने चोरी केलेला माल विकला आणि त्यातून आलेले पैसे आपल्या इतर साथीदारांसोबत वाटून घेतली अशी कबुली दिली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, फरार असलेल्या आरोपींपैकी दोघांना कमी पगार असूनही मधल्या काही काळात त्यांनी त्यांच्या झारखंडमधील आपल्या मूळ गावी घर बांधल्याचं सचिन अहिर यांना माहिती मिळाली होती. तसंच कारही घेतली. कमी पगारात इतक्या गोष्टी केल्यानंतर अहिर यांच्या कुटुंबात संशय निर्माण झाला होता. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आलं आहे.

