देशभरात मान्सून सक्रिय झाला आहे. शनिवारी केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. आता हवामान खात्याने गुजरात आणि इतर राज्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवली असून अनेक राज्यांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात यंदा मोसमी पाऊस नियोजित वेळेपेक्षा ११ दिवस आधी दाखल झाला आहे. रविवारी तळकोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, पुढील तीन दिवसांत मुंबई, पुणे, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्ह्यातील कुसूर गावात ९ वर्षांच्या श्रावणीची हत्या तिच्याच वडिलांनी केली. पित्याचे आईसोबत अनैतिक संबंध असल्याचे पाहिल्याने श्रावणीला जीव गमवावा लागला. ही घटना समाजातील नैतिक अधःपतनाचे भयावह उदाहरण आहे.
देशातील ५० शहरांमधील मालमत्ता किमतींच्या वाढीच्या अभ्यासात बंगळुरू अव्वल स्थानावर आहे. २०२४-२५ मध्ये बंगळुरूच्या मालमत्ता किमतीत १३.१% वाढ झाली आहे असे अहवालात म्हटले आहे.
नागपूरच्या घोडेस्वारी अकादमीत एका ३० वर्षीय व्यक्तीने घोडीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा प्रकार स्पष्ट दिसत असून, प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
पालघर जिल्ह्यातील एका रिसॉर्टमध्ये एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. प्रियंका पवार ही आपल्या प्रियकरासोबत रिसॉर्टमध्ये होती, तेव्हा अचानक तिची प्रकृती बिघडली आणि तिला मृत घोषित करण्यात आले. कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
ठाण्यात एका २३ वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर काही वेळातच त्याने अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणांपुढे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.
रेल्वे स्थानकातून निघालेल्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला रेल्वे पोलिसांनी कशाचीही पर्वा न करता वाचवले. मुंबईतील बोरिवली स्थानकात ही घटना घडली असून, महिलेला रेल्वेतून पडण्यापासून पोलिसांनी वाचवले.
Monsoon Update : मुंबईत, ठाण्यासह नवी मुंबईला यल्लो अलर्ट दिला गेला आहे. तर कोकणातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
Sunday Mega Block : रविवारी लोकलने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर मध्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. याशिवाय पश्चिम मार्गावर शनिवारी मध्यरात्री ब्लॉक असणार आहे. यामुळे वेळापत्रक पाहून नागरिकांनी घराबाहेर पडावे.
mumbai