मुंबई पोलिसांना स्मार्ट डिजिटल आयडी कार्ड दिले जाणार आहे. यामुळे बनावट पोलीस ओखळपत्रांच्या प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल. हे ओखळपत्र पोलीस आयुक्त ते शिपाई अशा सर्व पदांवरील कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे.
Mumbai : वरळीतील दोन सी-फेसिंग ड्युप्लेक्स अपार्टमेंट्ससाठी कोट्यावधी रुपयांची खरेदी झाल्याचे समोर आले आहे. खरंतर, अपार्टमेंट्स तब्बल 639 कोटींना खरेदी करण्यात आले आहेत.
भारतीय नौदलाच्या सुरक्षेसाठी अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या डॉकयार्डमधून पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला गोपनीय माहिती पुरविल्याप्रकरणी ठाण्यातील कळव्यातून एका अभियंत्याला अटक करण्यात आली आहे.
पावसाने दोन ते तीन दिवस झोडपून काढल्यानंतर अचानक ब्रेक घेतल्याने वातावरणात बदल जाणवत आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, अनेक जिल्ह्यांमध्ये आजपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच तापमान वाढण्याची शक्यता आहे
मुंबईत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाळीव प्राण्यांमुळे वाद निर्माण झाले आहेत. एका प्रकरणात कुत्रा चावल्याने मालकाला शिक्षा झाली आहे, तर दुसऱ्या प्रकरणात अंध कुत्र्याला लिफ्टमध्ये प्रवेश नाकारल्याने मालकाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ सिएरा लिओनमध्ये दाखल झाले आहे. पाकिस्तानस्थित दहशतवादाविरुद्ध भारताचे धोरण अधोरेखित करणे आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करणे हा या दौऱ्याचा उद्देश आहे.
मुंबईतील विक्रोळी येथे एका 26 वर्षीय तरुणावर गुलमोहरचे झाड कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. खरंतर, मित्रांसोबत गप्पा मारत असताना तरुणाच्या अंगावर झाड उन्मळून पडल्याचे सांगितले जात आहे.
मुलाकडून करण्यात येणाऱ्या छळाला कंटाळून गोरेगावमधील एका 78 वर्षीय महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाच मुलाने प्रॉपर्टीच्या वादातून महिलेवर हल्ला देखील केला होता.
मुंबईत बुधवारी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले आहे. ठाण्यातही मुसळधार पाऊस झाला आहे. सायन परिसरात बुधवारी मुसळधार पावसामुळे पाणी साचले.
तुम्हाला वैद्यकीय खर्चासाठी, शिक्षणासाठी किंवा कोणत्याही तातडीच्या वैयक्तिक गरजांसाठी निधीची आवश्यकता असली तरीही, गोल्ड लोन तुम्हाला तुमचे सोन्याचे दागिने तारण म्हणून देऊन जलद वित्तपुरवठा करण्याची परवानगी देते.
mumbai