आज पहाटे घणसोली येथील एनएमएमटी बस डेपोमध्ये भीषण आग लागली. या आगीत अनेक बसेस जळून खाक झाल्या असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
श्रीलंकेच्या औपचारिक विनंतीनंतर भारत ३२ डिझेल लोकोमोटिव्ह निर्यात करणार असून यातील ५ इंजिनं मुंबईतील आहेत. ही इंजिनं उत्कृष्ट कार्यक्षम स्थितीत श्रीलंका रेल्वेला प्रदान केली जाणार आहेत.
कार, SUV सारखी प्रवासी वाहने थेट रेल्वेच्या वॅगनवर घेऊन जाण्याचा प्रयोग कोकण रेल्वे गणपतीतून सुरू करण्याचा विचार करीत आहे.
मुंबईत १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ९८,८५० रुपये, तर २२ कॅरेटसाठी ९०,६१० रुपये इतका नोंदवला गेला. तसेच, चांदीतही प्रति किलो १०० रुपयांची वाढ झाली असून तिचा दर १,००,१०० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
आता नव्या अटींसह आणि सुधारित पद्धतीने ही सेवा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती उपपोलीस आयुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांनी दिली.
नाचन कुटुंबीयांनी देशविघातक कृत्यांसाठी एक स्लिपर सेल उभा केला होता. या स्लिपर सेलमार्फत मुस्लिम तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना भारतविरोधात चिथावणी देणे, देशात शरीयत कायद्यानुसार स्वतंत्र इस्लामी राष्ट्र निर्माण करण्याचा कट रचला होता.
आता इयत्ता पहिलीपासूनच मुलांना प्राथमिक लष्करी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जाहीर केले. या प्रशिक्षणात माजी सैनिकांची मदत घेण्यात येणार असून, हा उपक्रम संपूर्ण राज्यात राबवण्यात येणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र पाठवून अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास तीव्र आक्षेप घेतला आहे. मात्र कर्नाटक सरकारने या मागणीला ठाम नकार दिला आहे.
सध्या हवामान खात्याने राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे, तर उर्वरित भागांमध्ये हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा प्रखर उन्हाचा अनुभव येणार असल्याचे संकेत आहेत. यामुळे राज्यातील नागरिकांत गोंधळ आणि अस्वस्थता वाढली आहे.
महाराष्ट्र भाजपने २२ नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा केली असली तरी मुंबई अध्यक्षपदाचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. दिल्लीहून लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे, प्रवीण दरेकर, अमित साटम आणि सुनील राणे यांच्या नावांचा विचार सुरू आहे.
mumbai