MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • Mumbai Metro 8 : मुंबई–नवी मुंबई विमानतळ थेट मेट्रोने जोडले जाणार! मेट्रो लाईन 8 वरील 20 स्थानकांची संपूर्ण यादी

Mumbai Metro 8 : मुंबई–नवी मुंबई विमानतळ थेट मेट्रोने जोडले जाणार! मेट्रो लाईन 8 वरील 20 स्थानकांची संपूर्ण यादी

Mumbai Metro 8 : राज्य मंत्रिमंडळाने मुंबई मेट्रो लाईन 8 ला मंजुरी दिली आहे, जी मुंबई आणि नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळांना थेट जोडेल. हा 35 किलोमीटरचा मार्ग PPP मॉडेलवर उभारला जाणार असून, यामुळे दोन्ही विमानतळांमधील प्रवास सुलभ आणि वेगवान होईल.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Jan 28 2026, 03:42 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
मुंबई–नवी मुंबई विमानतळ थेट मेट्रोने जोडले जाणार!
Image Credit : Getty

मुंबई–नवी मुंबई विमानतळ थेट मेट्रोने जोडले जाणार!

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबईतील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला थेट जोडणाऱ्या मेट्रो लाईन 8 ला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (27 जानेवारी) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. ही मुंबई मेट्रोची आठवी लाईन असून, ती दोन्ही प्रमुख विमानतळांना थेट जोडणारी पहिली मेट्रो सेवा ठरणार आहे. या मेट्रो मार्गामुळे प्रवासी, एअरलाईन क्रू, कार्गो ऑपरेटर तसेच रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

25
मेट्रो लाईन 8 चा मार्ग आणि लांबी
Image Credit : ANI

मेट्रो लाईन 8 चा मार्ग आणि लांबी

मुख्यमंत्र्यांनी बैठकीत मेट्रो लाईन 8 चा सविस्तर आराखडाही मांडला.

या मेट्रो मार्गाची एकूण लांबी 35 किलोमीटर असून, त्यापैकी

9.25 किमी भूमिगत मार्ग,

24.636 किमी उन्नत (Elevated) मार्ग असणार आहे.

या मार्गावर एकूण 20 स्थानके असतील. त्यामध्ये 6 भूमिगत आणि 14 उन्नत स्थानकांचा समावेश आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

Related Articles

Related image1
Mumbai Local : एसी लोकलमुळे हार्बर मार्गावर प्रवाशांना अडचण; मध्य रेल्वेने दिल्या कारणांची माहिती
Related image2
Mira-Bhayandar Flyover : मीरा-भाईंदर उड्डाणपूल वादावर एमएमआरडीएचे स्पष्टीकरण; ‘४ पदरीवरून २ पदरी होणे ही डिझाइन चूक नाही’
35
Mumbai Metro Line 8 : नियोजित 20 स्थानकांची यादी
Image Credit : X

Mumbai Metro Line 8 : नियोजित 20 स्थानकांची यादी

मेट्रो लाईन 8 वरील प्रस्तावित स्थानके पुढीलप्रमाणे आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ – टर्मिनल 2

फिनिक्स मॉल

एस. जी. बर्वे मार्ग

कुर्ला

लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT)

गरोडिया नगर

बैगनवाडी

मानखुर्द

ISBT

वाशी

सानपाडा

जुईनगर

एल. पी. जंक्शन

नेरुळ स्टेशन

सीवूड्स स्टेशन

अपोलो हॉस्पिटल

सागर संगम

तारघर

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ – पश्चिम

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ – टर्मिनल 2

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 ते घाटकोपर पूर्व हा मार्ग भूमिगत असणार असून, घाटकोपर पश्चिम ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 पर्यंतचा मार्ग उन्नत असेल. 

45
प्रकल्पाचा खर्च आणि भूसंपादन
Image Credit : X

प्रकल्पाचा खर्च आणि भूसंपादन

दोन स्थानकांमधील सरासरी अंतर 1.9 किमी असेल. या प्रकल्पासाठी सुमारे 30.7 हेक्टर भूसंपादन आवश्यक असून, त्यासाठी अंदाजे 388 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. संपूर्ण मेट्रो प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 22,862 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. 

55
PPP मॉडेलवर मेट्रो उभारणार
Image Credit : X

PPP मॉडेलवर मेट्रो उभारणार

राज्य सरकारने हा प्रकल्प PPP (Public-Private Partnership) मॉडेल अंतर्गत उभारण्यास मंजुरी दिली आहे.

राज्य सरकार – 20%

केंद्र सरकार – 20% (व्हायबिलिटी गॅप फंडिंग)

उर्वरित 60% खर्च खासगी कंपनी करणार

मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना जमिनीचे अधिग्रहण, विविध परवानग्या आणि आवश्यक मंजुरीची प्रक्रिया जलद पूर्ण करून पुढील तीन वर्षांत संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
BMC Mayor 2026 : शिंदे शिवसेनेला उपमहापौरपद निश्चित, महिला नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब होणार?
Recommended image2
मुंबईत हक्काचं घर हवंय? लॉटरीचं टेन्शन सोडा! म्हाडाच्या 'या' घरांसाठी उद्यापासून करा थेट बुकिंग
Recommended image3
Mayors Salary And Allowance: महापौरांचा पगार वाचून बसेल धक्का! मानधन कमी पण थाट कॅबिनेट मंत्र्यासारखा; पाहा काय मिळतात सुविधा
Recommended image4
मुंबईच्या रनवेवर IndiGo आणि Air India विमानांचे पंख एकमेकांना धडकले, दोन्ही विमानांमध्ये होते प्रवासी!
Recommended image5
Mumbai MHADA Lottery: मुंबईत हक्काचं घर हवंय? म्हाडाच्या १२० फ्लॅट्ससाठी 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य'; ताडदेव ते कांदिवलीपर्यंत संधी!
Related Stories
Recommended image1
Mumbai Local : एसी लोकलमुळे हार्बर मार्गावर प्रवाशांना अडचण; मध्य रेल्वेने दिल्या कारणांची माहिती
Recommended image2
Mira-Bhayandar Flyover : मीरा-भाईंदर उड्डाणपूल वादावर एमएमआरडीएचे स्पष्टीकरण; ‘४ पदरीवरून २ पदरी होणे ही डिझाइन चूक नाही’
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved