MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • म्हाडाच्या लॉटरीसाठी पहिल्यांदाच अर्ज करताय? ही कागदपत्रे नसतील तर स्वप्न पडेल महागात; आजच करा तयारी!

म्हाडाच्या लॉटरीसाठी पहिल्यांदाच अर्ज करताय? ही कागदपत्रे नसतील तर स्वप्न पडेल महागात; आजच करा तयारी!

MHADA lottery required documents: मुंबईत घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडा लॉटरी एक मोठी संधी आहे. अर्ज करताना कोणतीही चूक होऊ नये म्हणून पॅन कार्ड, आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्रासारख्या सर्व आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती दिली आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 18 2026, 10:13 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
म्हाडाच्या लॉटरीसाठी पहिल्यांदाच अर्ज करताय?
Image Credit : our own

म्हाडाच्या लॉटरीसाठी पहिल्यांदाच अर्ज करताय?

मुंबई : मुंबईत स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाची लॉटरी ही सर्वात मोठी संधी असते. पण, अनेकदा केवळ कागदपत्रांच्या त्रुटीमुळे किंवा माहितीच्या अभावामुळे हक्काचे घर हातातून निसटण्याची भीती असते. तुम्हीही यावेळेस नशीब आजमावणार असाल, तर 'ही' यादी एकदा तपासून घ्या. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
म्हाडाचे घर का आहे खास?
Image Credit : our own

म्हाडाचे घर का आहे खास?

किमतीत सवलत: खाजगी बिल्डरांच्या तुलनेत म्हाडाची घरे ५० टक्क्यांपर्यंत स्वस्त असू शकतात.

सुरक्षितता: सरकारी प्रक्रिया असल्याने फसवणुकीची शून्य शक्यता आणि व्यवहारात पूर्ण पारदर्शकता असते.

अनुदान: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र अर्जदारांना २.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळू शकते. 

Related Articles

Related image1
ठाण्यातील 'नंदनवना'त राजकीय खलबतं! उद्धव ठाकरेंशी युतीनंतर राज ठाकरेंची शिंदेंसोबत पहिलीच भेट; मनसेच्या 'लवचिक' भूमिकेचे नेमके संकेत काय?
Related image2
सावधान! म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताय? 'हा' नवा नियम चुकला तर घरासोबतच लाखांची अनामत रक्कमही बुडणार!
36
अर्जासाठी आवश्यक असलेली 'मस्ट हॅव' कागदपत्रे
Image Credit : Twitter

अर्जासाठी आवश्यक असलेली 'मस्ट हॅव' कागदपत्रे

तुमची फाईल तयार करताना खालील कागदपत्रे डिजिटल स्वरूपात (Scanned Copy) तयार ठेवा.

१. ओळख आणि रहिवासी पुरावा

पॅन कार्ड (PAN Card): अर्जदाराचे स्वतःचे पॅन कार्ड अनिवार्य. (विवाहित असल्यास पती/पत्नीचेही लागेल).

आधार कार्ड (Aadhaar Card): आधार कार्डवर तुमचा मोबाईल नंबर अपडेटेड असावा, कारण त्यावरच OTP येतो.

डोमिसाईल (Domicile Certificate): अर्जदार महाराष्ट्र राज्याचा किमान १५ वर्षे रहिवासी असल्याचा पुरावा. हे प्रमाणपत्र बारकोडसह असणे बंधनकारक आहे.

46
२. आर्थिक उत्पन्नाचा पुरावा
Image Credit : Twitter

२. आर्थिक उत्पन्नाचा पुरावा

तुमच्या गटाप्रमाणे (EWS, LIG, MIG, HIG) खालीलपैकी एक आवश्यक आहे.

सक्षम प्राधिकरणाचे (तहसीलदार/जिल्हाधिकारी) चालू आर्थिक वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र.

किंवा मागील वर्षाचे आयकर विवरणपत्र (ITR).

56
३. बँक आणि संपर्क माहिती
Image Credit : Twitter

३. बँक आणि संपर्क माहिती

बँक तपशील: तुमच्या नावाचा 'रद्द केलेला चेक' (Cancelled Cheque) किंवा पासबुकची प्रत.

संपर्क: एक चालू मोबाईल नंबर आणि वैध ई-मेल आयडी. 

66
४. आरक्षित वर्गासाठी (Special Categories)
Image Credit : Twitter

४. आरक्षित वर्गासाठी (Special Categories)

तुम्ही जर विशेष कोट्यातून अर्ज करत असाल, तर खालील कागदपत्रे सज्ज ठेवा.

जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate): SC, ST, NT, OBC प्रवर्गासाठी.

इतर पुरावे: दिव्यांग, माजी सैनिक, पत्रकार किंवा सरकारी कर्मचारी असल्यास त्याबाबतची वैध प्रमाणपत्रे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या
उपयुक्तता बातम्या
Recommended Stories
Recommended image1
Mumbai Auto Fare Hike : मुंबईत रिक्षा प्रवास आणखी महागणार; नवीन दर लवकरच लागू होण्याची शक्यता
Recommended image2
Mumbai Weather : मुंबईत पावसाची एन्ट्री, पुढचे ५ दिवस मेघगर्जनेसह सरी; IMD चा अंदाज
Recommended image3
Vidhan Parishad | महायुतीचे 6 बिनविरोध, नाशिक-जळगावात बंडखोरी
Recommended image4
TUKARAM MUNDHE | पण साहेब या भेसळखोरांची तक्रार करायची तरी कुठे, पाहा हा पर्याय
Recommended image5
Mumbai Local : लोकल ट्रेनमध्ये भाजीपाल्याची विक्री; व्हायरल व्हिडीओनंतर रेल्वे प्रशासनावर प्रश्न (Watch Video)
Related Stories
Recommended image1
ठाण्यातील 'नंदनवना'त राजकीय खलबतं! उद्धव ठाकरेंशी युतीनंतर राज ठाकरेंची शिंदेंसोबत पहिलीच भेट; मनसेच्या 'लवचिक' भूमिकेचे नेमके संकेत काय?
Recommended image2
सावधान! म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताय? 'हा' नवा नियम चुकला तर घरासोबतच लाखांची अनामत रक्कमही बुडणार!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved