MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • पुणे पोलीस भरतीचा बिगुल वाजला! खाकी वर्दीचं स्वप्न होणार पूर्ण; 'या' तारखेपासून मैदानी चाचणीला सुरुवात?

पुणे पोलीस भरतीचा बिगुल वाजला! खाकी वर्दीचं स्वप्न होणार पूर्ण; 'या' तारखेपासून मैदानी चाचणीला सुरुवात?

Pune Police Bharti 2026 : पुणे शहर पोलीस दलात लवकरच मोठी भरती प्रक्रिया सुरू होणार असून मैदानी चाचणी फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यताय. या भरतीमुळे सध्याच्या मनुष्यबळावरील ताण कमी होऊन गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यास, तपासाला वेग देण्यास मदत होईल.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 01 2026, 04:37 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
पुणे शहर पोलीस दलात लवकरच मोठी पोलीस भरती
Image Credit : social media

पुणे शहर पोलीस दलात लवकरच मोठी पोलीस भरती

पुणे : पुणे शहर पोलीस दलात सामील होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली पुणे पोलीस भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून, लवकरच शहराच्या रस्त्यांवर धावणाऱ्या भावी पोलिसांची लगबग पाहायला मिळणार आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
खाकी वर्दीची प्रतीक्षा संपली! १० फेब्रुवारीपासून हालचाली?
Image Credit : Getty

खाकी वर्दीची प्रतीक्षा संपली! १० फेब्रुवारीपासून हालचाली?

मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार, पुणे पोलीस दलातील रिक्त पदांसाठीची मैदानी चाचणी साधारणपणे १० ते १५ फेब्रुवारी दरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे. या शारीरिक चाचणीसाठी राज्यभरातून हजारो उमेदवार पुण्यात दाखल होणार असून, पोलीस प्रशासनाने मैदानांच्या तयारीसह नियोजनाचे चक्र वेगाने फिरवायला सुरुवात केली आहे.

Related Articles

Related image1
Budget 2026 : महाराष्ट्रावर अर्थसंकल्पातून ‘लक्ष्मीवर्षाव’; हायस्पीड रेल्वे, हजारो कोटींचे प्रकल्प जाहीर
Related image2
Budget 2026: आता प्रत्येक जिल्ह्यात 'गर्ल्स हॉस्टेल'! महिला शिक्षणासाठी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'; आरोग्य आणि उद्योगासाठीही खजिन्याची पेटी उघडली
35
पोलीस दलावरील ताण होणार हलका
Image Credit : iSTOCK

पोलीस दलावरील ताण होणार हलका

पुणे शहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या पाहता, सध्या पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण आहे.

गरज विरुद्ध वास्तव: पुण्याच्या लोकसंख्येनुसार किमान २० ते २१ हजार पोलिसांची गरज असताना, सध्या केवळ १० हजार कर्मचारी कार्यरत आहेत.

२४-२४ तास ड्युटी: मनुष्यबळ अर्धे असल्याने सध्याच्या पोलिसांना सण, उत्सव किंवा आपत्कालीन परिस्थितीत सलग २४ तास ड्युटी करावी लागत आहे.

नवीन पोलीस ठाणी: शहरात पाच नवीन पोलीस ठाणी कार्यान्वित झाल्याने मनुष्यबळाचा हा तुटवडा अधिकच तीव्र झाला आहे.

45
या भरतीचे 'फायदे' काय असतील?
Image Credit : social media

या भरतीचे 'फायदे' काय असतील?

१. गुन्हेगारीवर वचक: नवीन कर्मचारी मिळाल्यामुळे गस्त (Patrolling) वाढेल आणि गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक बसेल.

२. मानसिक आरोग्य: कामाचे तास विभागले गेल्याने सध्याच्या पोलिसांना साप्ताहिक सुट्ट्या आणि कुटुंबासाठी वेळ मिळेल.

३. तपासाला वेग: नवीन पोलीस ठाण्यांना पुरेसे संख्याबळ मिळाल्यास गुन्ह्यांच्या तपासाची प्रक्रिया जलद होईल.

55
उमेदवारांसाठी टीप
Image Credit : Twitter

उमेदवारांसाठी टीप

जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज केला असेल, तर आता सरावाचा वेग वाढवा. मैदानी चाचणीसाठी आपले शारीरिक कौशल्य आणि कागदपत्रे सज्ज ठेवा!

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
पुण्याच्या बातम्या

Recommended Stories
Recommended image1
महायुतीत महामंडळ वाटपाची तयारी अंतिम टप्प्यात; महिन्याभरात पदाधिकाऱ्यांना ‘गुड न्यूज'
Recommended image2
मान्सूनच्या आगमनाची चाहूल; केरळमध्ये लवकरच दाखल होणार पाऊस
Recommended image3
Maharashtra Board Supplementary Exam 2026 : दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; 16 जूनपासून परीक्षांना होणार सुरुवात
Recommended image4
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; RCC संस्थापकाला CBI कडून अटक, लातूरमध्ये शिवसेनेचे आंदोलन
Recommended image5
उद्धव ठाकरेंचा हा खासदार शिंदे गटाला मिळणार, नाव ऐकून म्हणाल हे कस झालं?
Related Stories
Recommended image1
Budget 2026 : महाराष्ट्रावर अर्थसंकल्पातून ‘लक्ष्मीवर्षाव’; हायस्पीड रेल्वे, हजारो कोटींचे प्रकल्प जाहीर
Recommended image2
Budget 2026: आता प्रत्येक जिल्ह्यात 'गर्ल्स हॉस्टेल'! महिला शिक्षणासाठी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'; आरोग्य आणि उद्योगासाठीही खजिन्याची पेटी उघडली
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved