पुण्यातील १९ वर्षीय तरुणीला पाकिस्तानच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याच्या आरोपामुळे अटक केली. तिने इन्स्टाग्रामवर 'पाकिस्तान जिंदाबाद' असा मजकूर पोस्ट केला होता, ज्यामुळे संतापाची लाट उसळली आणि सकल हिंदू समाजाने कारवाईची मागणी केली. 

पुणे: पाकिस्तानच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याच्या आरोपामुळे पुण्यातील १९ वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली आहे. कोंढवा परिसरात वास्तव्यास असलेल्या खतीजा शहाबुद्दीन शेख (वय १९) हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून 'पाकिस्तान जिंदाबाद' असा मजकूर पोस्ट केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सामाजिक स्तरावर संतापाची लाट उसळली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

या प्रकाराची माहिती सकल हिंदू समाजाने प्रसारित केली असून, त्यांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. पोलिसांनी तत्काळ दखल घेत कोंढवा पोलिस ठाण्यात संबंधित तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला. शनिवारी (दि. १० मे) तिला पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने तिला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलीस निरीक्षक विनायक पाटणकर यांनी सांगितले की, "देशात युद्धजन्य स्थिती असताना अशा प्रकारचे वक्तव्य अत्यंत गंभीर मानले जाते. आम्ही प्रकरणाची सखोल चौकशी करत आहोत."

या प्रकरणानंतर संबंधित तरुणीने तिचे इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट केले असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र तिची पोस्ट व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

हा प्रकार देशविरोधी मानसिकतेचा भाग असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.