Chhatrapati Sambhaji Nagar Fire : छत्रपती संभाजी नगर येथे भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 100 हून अधिक दुकाने खाक झाल्याचे सांगितले जात आहे. घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेच्या पोटनिवडणुकांबाबत निवडणूक आयोगाकडे स्पष्टता मागितली आहे.
नागपूरमधील गणेशपेठ पोलिस स्टेशनमध्ये दाखल एफआयआरनुसार, फहीम शमीम खान यांच्या नेतृत्वाखाली जमावाने दंगल घडवली. औरंगजेबाच्या विरोधात निदर्शने करणाऱ्यांवर कारवाईच्या निषेधार्थ हे कृत्य करण्यात आले.
नागपूरमधील हिंसाचारावर शिवसेना (UBT) आमदार भास्कर जाधव यांनी निषेध व्यक्त केला आहे. सरकारने दोषींवर कठोर कारवाई करावी, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी नागपूर हिंसाचारातील आरोपींवर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी वेळीच कारवाई न केल्याने हिंसा भडकल्याचा आरोप त्यांनी केला. शहरात कलम १४४ लागू.
नागपूरमधील हिंसाचारावरून आदित्य ठाकरेंनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी महाराष्ट्राला मणिपूर बनवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला.
नागपुरात औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवरून झालेल्या हिंसाचारात विरोधकांचे षडयंत्र असल्याचा संशय शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी या घटनेचा निषेध करत, जमाव लोकांची आडनावं तपासत विशिष्ट घरांवर हल्ला करत असल्याचा आरोप केला.
काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्रातील जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. काही लोक राज्यातील सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
नागपुरातील हिंसाचारानंतर, शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी औरंगजेबाची कबर खुलताबादमधून हटवण्याची मागणी केली आहे. भाजपा आमदार प्रवीण दटके यांनी हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचा आरोप करत पोलीस प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप केला आहे.
शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी नागपूरमधील हिंसाचाराचा निषेध केला असून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
Maharashtra