पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती महिलेला पैशांअभावी उपचार नाकारल्याने तिचा मृत्यू झाला. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली असून, दोषींवर कारवाईची मागणी होत आहे.
संजय राऊत यांनी वक्फ विधेयकावर टीका केली, याला व्यापार म्हटलं आहे. सरकारचा भर वक्फ मालमत्तांवर असल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या निधनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला.
जिओ स्टुडिओज आणि केदार शिंदे यांचा 'झपुक् झुपुक' सिनेमा येतोय! डीजे क्रेटेक्सचा धमाकेदार पार्टी सॉंग.
सात महिन्यांच्या गर्भवती महिलेवर पैशांच्या चणचणीमुळे उपचार करण्यास नकार दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयाच्या अशा वागण्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप पीडित महिलेच्या परिवाराने केला आहे.
एआयएमआयएम नेते वारिस पठाण यांनी असदुद्दीन ओवैसी यांनी वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध करत लोकसभेत विधेयकाची प्रत फाडल्याच्या कृतीचे समर्थन केले आहे. पठाण म्हणाले की, हे विधेयक मुस्लिम समाजावर थेट हल्ला आहे आणि ते असंवैधानिक आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर वक्फ विधेयकाला विरोध केल्याने टीका केली. त्यांनी ठाकरेंवर हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांचा त्याग केल्याचा आरोप केला, या विधेयकामुळे वक्फ मालमत्तेवरील मक्तेदारी संपेल.
पालघरमध्ये एक अनोखा कावळा माणसांसारखे बोलतो! 'काका', 'आई' असे शब्द बोलणारा हा कावळा कुटुंबाचा सदस्य बनला आहे. जखमी अवस्थेत सापडलेल्या या कावळ्याने प्रेम आणि काळजीच्या जोरावर माणसांशी जिव्हाळ्याचे नाते जोडले आहे.
वक़्फ़ सुधारणा विधेयकाला विरोधकांनी विरोध दर्शवल्यानंतर शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी विरोधकांवर खोट्या कथा पसरवल्याचा आरोप केला आहे. त्यांनी वक़्फ़ बोर्डात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आवश्यक असल्याचे सांगितले.
युवा शिवसेना सरचिटणीस राहुल कनाल यांनी कुणाल कामराच्या आगामी शोसाठी तिकीट विक्री थांबवण्याची मागणी BookMyShow कडे केली आहे. कामराच्या वादग्रस्त विनोदांमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
Maharashtra