वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात निलेश चव्हाणला नेपाळ सीमेवरून अटक झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरी क्राइम सीनची पुनर्रचना केली. चव्हाणच्या घरातून वैष्णवीच्या सासू आणि नणंदचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात निलेश चव्हाणला नेपाळ सीमेवरून अटक झाल्यानंतर पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. काल त्याला अटक करत पुण्यात आणण्यात आले. आज पोलिसांनी त्याला घेऊन कर्वेनगरमधील त्याच्या घरी क्राइम सीनची पुनर्रचना केली आणि घराची सखोल चौकशी केली.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ निलेश चव्हाणकडे सोपवलं गेलं होतं. परंतु त्याच्यावर वैष्णवीच्या कुटुंबियांना बंदूक दाखवून धमकावल्याचा आणि बाळाची गैरवहाण करून ठेवल्याचा आरोप आहे. २१ मेपासून पोलिसांना फसवत असलेल्या चव्हाणने अटक होतेय याची दखल घेत चक्क चार राज्ये ओलांडून नेपाळमध्ये पळ काढला होता. तिथल्या एका लॉजमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

चव्हाणच्या घरातून लता आणि करिश्मा हगवणे यांच्या मोबाईलची ताब्यात घेतली गेली असून, त्यांच्यामध्ये महत्त्वाचा डेटा असण्याची शक्यता आहे. वैष्णवीच्या सासू लता आणि नणंद करिश्मा यांच्या मोबाईलमध्ये तिच्या सासरी झालेल्या छळाचे पुरावे मिळू शकतात. तपासात समोर आले आहे की, करिश्माच वैष्णवीला होणाऱ्या छळाची सूत्रधार आहे. वैष्णवीची ऑडिओ क्लिप, ज्यात तिने करिश्मा उर्फ पिंकी ताईकडून होणाऱ्या त्रासाची माहिती दिली आहे, ही या प्रकरणाची महत्त्वाची कडी आहे.

वैष्णवीने १६ मे रोजी आत्महत्या केली. तिच्या नंतर नवरा शशांक, सासू लता व नणंद करिश्मा यांना अटक झाली. आत्महत्यानंतर हगवणे कुटुंब गोंधळलेल्या अवस्थेत आहे. वैष्णवीचा ९ महिन्यांचा लेक जनक तब्बल ५-६ दिवस चव्हाणच्या ताब्यात होता. नातेवाईकांनी बाळाची चौकशी करत त्याला परत मागितले असता, चव्हाणने त्यांना पिस्तुल दाखवून धमकावलं.