MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
TRENDING :
Royal Enfield Classic 350 Mileage
Sanju Samson
Gold Rate Today
EPFO WhatsApp Services
SIP Calculator
Kitchen Tips
8th Pay Commission
Indoor Bedrooms Plants
ज्वेलरी
माझे पुणे
माझी मुंबई
ऑटोमोबाईल
Religion & राशिभविष्य
  • Home
  • Maharashtra
  • Maharashtra Weather Update: महाराष्ट्रावर 'दुहेरी' संकट! एकाच वेळी उष्णतेची लाट आणि पावसाचा तडाखा; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची स्थिती

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रावर 'दुहेरी' संकट! एकाच वेळी उष्णतेची लाट आणि पावसाचा तडाखा; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची स्थिती

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात ९ एप्रिलला हवामानाचे दुहेरी संकट निर्माण झाले. हवामान खात्यानुसार विदर्भात उष्णतेची लाट येणारय, तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Apr 08 2026, 08:34 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
महाराष्ट्रावर 'दुहेरी' संकट! एकाच वेळी उष्णतेची लाट आणि पावसाचा तडाखा
Image Credit : freepik

महाराष्ट्रावर 'दुहेरी' संकट! एकाच वेळी उष्णतेची लाट आणि पावसाचा तडाखा

मुंबई: महाराष्ट्राच्या हवामानात सध्या निसर्गाचा अजब खेळ पाहायला मिळत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असतानाच, आता राज्यावर 'दुहेरी संकट' घोंगावत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, ९ एप्रिल रोजी राज्याच्या काही भागांत उष्णतेची तीव्र लाट असेल, तर काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
कुठे उन्हाचा तडाखा अन् कुठे पावसाची 'एन्ट्री'?
Image Credit : Meta AI

कुठे उन्हाचा तडाखा अन् कुठे पावसाची 'एन्ट्री'?

राज्यातील विभागवार हवामानाचा सविस्तर अंदाज खालीलप्रमाणे आहे.

१. मराठवाडा: विजांच्या कडकडाटासह पावसाचे संकेत

मराठवाड्यातील वातावरणात मोठे फेरबदल होणार आहेत. विशेषतः लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तापमान: किमान २२°C ते २४°C | कमाल ३४°C ते ३६°C. 

Related Articles

Related image1
Toll Plaza New Rules: हायवेने प्रवास करताय? १० एप्रिलपासून टोल नाक्यावर 'हा' बदल; जाणून घ्या नवीन नियम, अन्यथा खिसा होईल रिकामा!
Related image2
AI Conference: मुलांच्या भविष्यावर AI चा कसा होतोय परिणाम? बेनेट युनिव्हर्सिटीमध्ये होणार मोठी आंतरराष्ट्रीय परिषद
37
२. पश्चिम महाराष्ट्र: सोलापूर-सांगलीत पावसाची शक्यता
Image Credit : ANI

२. पश्चिम महाराष्ट्र: सोलापूर-सांगलीत पावसाची शक्यता

पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येथे दुपारनंतर अचानक ढग दाटून येतील आणि पावसाच्या सरी कोसळू शकतात.

तापमान: किमान २३°C ते २५°C | कमाल ३३°C ते ३५°C. 

47
३. विदर्भ: सूर्य आग ओकणार!
Image Credit : Asianet News

३. विदर्भ: सूर्य आग ओकणार!

विदर्भात मात्र पावसाची चिन्हे नसून उष्णतेची तीव्रता वाढणार आहे. कोरड्या हवामानामुळे नागरिकांना उन्हाच्या झळा अधिक सोसाव्या लागतील.

तापमान: किमान २४°C ते २६°C | कमाल ३६°C ते ३९°C. 

57
४. कोकण: उष्णता आणि दमट हवेचा दुहेरी मारा
Image Credit : Asianet News

४. कोकण: उष्णता आणि दमट हवेचा दुहेरी मारा

कोकण किनारपट्टीवर पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे, मात्र आर्द्रतेमुळे (Humidity) प्रचंड उकाडा जाणवेल.

तापमान: किमान २५°C ते २७°C | कमाल ३२°C ते ३४°C. 

67
५. उत्तर महाराष्ट्र: कोरडे हवामान
Image Credit : Asianet News

५. उत्तर महाराष्ट्र: कोरडे हवामान

नाशिक, जळगाव आणि धुळे परिसरात हवामान प्रामुख्याने कोरडे राहील. आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असली तरी तापमानात फारशी घट होणार नाही. 

77
नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना आणि खबरदारी
Image Credit : Asianet News

नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना आणि खबरदारी

हवामान विभागाने अधिकृत 'रेड अलर्ट' दिला नसला तरी, बदलत्या वातावरणामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

शेतकरी बांधवांसाठी: ज्या भागात पावसाचा अंदाज आहे, तिथे कापणी केलेली पिके आणि वाळवणीची कामे सुरक्षित स्थळी हलवावीत.

आरोग्याची काळजी: उन्हात बाहेर पडताना भरपूर पाणी प्या आणि विजा चमकत असताना झाडाखाली उभे राहणे टाळा.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
मराठवाड्याच्या बातम्या
मुंबई बातम्या
विदर्भातील बातम्या
नाशिक बातम्या
कोल्हापूर बातम्या
पुण्याच्या बातम्या
छ. संभाजीनगर बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं, सरकारला ९० दिवसांचा अल्टिमेटम
Recommended image2
Parag Shah : 3 हजार कोटींची संपत्ती असलेला हा आमदार रस्त्यावर भिकारी का बनला?
Recommended image3
Maratha Reservation Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला अल्टिमेटम; तर मंत्र्यांची मविआवर टीका
Recommended image4
Tukaram Mundhe : 11 रुपयांची सलाईनची नळी 325 रुपयांना? तुकाराम मुंढेंनी उघड केली रुग्णालयांची लूट
Recommended image5
Heart of India : भारताच्या अगदी मध्यभागी कोणतं शहर आहे माहितीये? महाराष्ट्रातील हे शहर आहे खूप खास
Related Stories
Recommended image1
Toll Plaza New Rules: हायवेने प्रवास करताय? १० एप्रिलपासून टोल नाक्यावर 'हा' बदल; जाणून घ्या नवीन नियम, अन्यथा खिसा होईल रिकामा!
Recommended image2
AI Conference: मुलांच्या भविष्यावर AI चा कसा होतोय परिणाम? बेनेट युनिव्हर्सिटीमध्ये होणार मोठी आंतरराष्ट्रीय परिषद
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved