MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Maharashtra Weather Update: अरे बापरे! इतकी उष्णता अचानक का वाढली? एप्रिलच्या 'या' तारखेपासून सुटणार घामाच्या धारा; कारण वाचून थक्क व्हाल!

Maharashtra Weather Update: अरे बापरे! इतकी उष्णता अचानक का वाढली? एप्रिलच्या 'या' तारखेपासून सुटणार घामाच्या धारा; कारण वाचून थक्क व्हाल!

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात उष्णतेचा अंदाज असून, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात पारा ४२ अंशांपर्यंत पोहोचू शकतो. वेस्टर्न डिस्टर्बन्स, दमट हवा, सायक्लोनिक सर्क्युलेशन या कारणांमुळे तापमानात अचानक वाढ होत आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Apr 06 2026, 05:25 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
अरे बापरे! इतकी उष्णता अचानक का वाढली?
Image Credit : Asianet News

अरे बापरे! इतकी उष्णता अचानक का वाढली?

मुंबई: कधी अवकाळी पाऊस तर कधी अंगातून घामाच्या धारा... सध्या महाराष्ट्रातील हवामानाचा लपंडाव सुरू आहे. एप्रिलच्या सुरुवातीला गारपीट आणि पावसाने झोडपल्यानंतर, आता तिसऱ्या आठवड्यात मात्र राज्याला भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. वाढत्या तापमानामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पारा ४० ते ४२ अंशांच्या पुढे जाण्याची भीती हवामान विभागाने वर्तवली आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
विदर्भात पाऊस, तर उर्वरित महाराष्ट्रात उन्हाचे चटके!
Image Credit : Asianet News

विदर्भात पाऊस, तर उर्वरित महाराष्ट्रात उन्हाचे चटके!

एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी असेल. मात्र, इतर भागात सूर्य आग ओकणार आहे. १५ एप्रिलनंतर तापमानात झपाट्याने वाढ होणार असून उन्हाची तीव्रता अधिक जाणवेल. हवामान विभागाने नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. 

Related Articles

Related image1
बारामती पोटनिवडणुकीत आली रंगत, करुणा मुंडेंनी भरला अर्ज
Related image2
गावची वाट झाली सोपी! उन्हाळी सुट्टीत पुण्यातून सुटणार ७४ जादा एसटी बसेस; प्रवाशांना मोठा दिलासा
35
उष्णता अचानक का वाढणार? ही आहेत महत्त्वाची कारणे
Image Credit : Asianet News

उष्णता अचानक का वाढणार? ही आहेत महत्त्वाची कारणे

वातावरणात एकाच वेळी अनेक बदल घडत आहेत, ज्यामुळे हवामान अस्थिर झाले आहे.

वेस्टर्न डिस्टर्बन्स: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव.

दमट हवा: अरबी समुद्रातून येणाऱ्या उष्ण आणि दमट हवेमुळे आर्द्रता वाढली आहे.

सायक्लोनिक सर्क्युलेशन: दक्षिण भारतात तयार झालेल्या चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीचा परिणाम महाराष्ट्रावर होत आहे. 

45
पाऊस आणि उष्णतेचे दुहेरी संकट!
Image Credit : Asianet News

पाऊस आणि उष्णतेचे दुहेरी संकट!

यावर्षी केवळ उन्हाळाच नाही, तर 'प्रि-मान्सून' पावसाचाही फटका बसण्याची शक्यता आहे. दुपारी कडक ऊन आणि घामाच्या धारा, तर संध्याकाळी पावसाची हजेरी असे विचित्र हवामान पाहायला मिळू शकते. विशेष म्हणजे, यंदा मान्सून उशिरा येण्याची आणि सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्याने चिंता अधिक वाढली आहे. 

55
IMD चा इशारा
Image Credit : Asianet News

IMD चा इशारा

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट (Heatwave) नसली, तरी तापमान ४० अंशांच्या वर गेल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मान्सूनबाबत अधिकृत अंदाज लवकरच प्रसिद्ध केला जाईल.

Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे न्यूयॉर्क टाइम्सच्या फ्रंट पेजवर 'रॉकस्टार'
Recommended image2
Sangli Waste Plant : प्रदूषणाच्या तक्रारींनंतर सांगलीतील 10 मेगावॅटचा वीज प्रकल्प बंद
Recommended image3
MPSC Protest: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रोहित पवारांचा पाठिंबा, सरकारला दिला इशारा
Recommended image4
Maharashtra Viral Video : रात्रीच्या वेळी महिला किती सुरक्षित? तरुणाने मुलीचा वेश धारण करून केला प्रयोग
Recommended image5
Maharashtra Politics: निवडणुकांवर बहिष्कार टाकणं चुकीचं, पृथ्वीराज चव्हाणांचा राज ठाकरेंना विरोध
Related Stories
Recommended image1
बारामती पोटनिवडणुकीत आली रंगत, करुणा मुंडेंनी भरला अर्ज
Recommended image2
गावची वाट झाली सोपी! उन्हाळी सुट्टीत पुण्यातून सुटणार ७४ जादा एसटी बसेस; प्रवाशांना मोठा दिलासा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved