- Home
- Maharashtra
- Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना KYC मुदतवाढ मिळाली, पण वेबसाइट ठप्प! टेन्शन घेऊ नका, 'ही' आहे सोपी ट्रिक!
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना KYC मुदतवाढ मिळाली, पण वेबसाइट ठप्प! टेन्शन घेऊ नका, 'ही' आहे सोपी ट्रिक!
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी eKYC करणे अनिवार्य आहे, परंतु अनेक महिलांना तांत्रिक अडचणी येत आहेत. सरकारने केवायसीसाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली असून रात्री १२ ते पहाटे ५ या वेळेत प्रक्रिया केल्यास ती अडथळ्याशिवाय पूर्ण होऊ शकते.

लाडक्या बहिणींनो, लक्ष द्या!
मुंबई: महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana) अंतर्गत महिलांना दर महिन्याला ₹१५०० चा लाभ मिळणार आहे. मात्र, या लाभासाठी ई-केवायसी (eKYC) करणे अनिवार्य आहे. काही दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे महिलांना KYC पूर्ण करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. ही गैरसोय लक्षात घेऊन, सरकारने आता केवायसी पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही नक्कीच दिलासादायक बातमी आहे!
वेबसाइट ठप्प, OTP चा प्रश्न कायम! आता काय कराल?
मुदतवाढ मिळाली असली तरी, वेबसाइटवर एकाच वेळी जास्त लोड येत असल्याने, 'लाडकी बहीण' योजनेच्या पोर्टलवर अजूनही तांत्रिक अडचणी कायम आहेत. महिलांना खालील समस्या येत आहेत.
वेबसाइट वारंवार क्रॅश होत आहे आणि एरर (Error) दाखवत आहे.
OTP (वन टाइम पासवर्ड) येण्यास खूप वेळ लागत आहे किंवा तो येतच नाहीये.
केवायसीची प्रक्रिया पूर्ण होत नाहीये.
तांत्रिक अडचणीवर 'हा' आहे रामबाण उपाय!
या तांत्रिक अडचणींचे मुख्य कारण म्हणजे, लाखो महिला एकाच वेळी केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे वेबसाइटवर प्रचंड लोड येत आहे.
उपाय:
यावरचा सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे, तुम्ही रात्री १२:०० ते पहाटे ५:०० वाजेच्या दरम्यान केवायसी करण्याचा प्रयत्न करा. या काळात वेबसाइटवरील वापरकर्त्यांचा (Users) लोड खूप कमी असतो. त्यामुळे तुमची केवायसीची प्रक्रिया अवघ्या काही मिनिटांत आणि कुठल्याही तांत्रिक अडथळ्याशिवाय पूर्ण होऊ शकते.
'लाडकी बहीण' eKYC प्रक्रिया कशी करावी?
जर तुम्ही रात्रीच्या वेळेस केवायसी करत असाल, तर खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा.
१. अधिकृत वेबसाइटवर जा.
२. eKYC पर्याय: स्क्रीनवर दिसणाऱ्या ईकेवायसी (eKYC) या पर्यायावर क्लिक करा.
३. माहिती भरा: तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड अचूक टाका.
४. तपासा: जर तुमची केवायसी आधीच पूर्ण झाली असेल, तर तसा मेसेज (संदेश) तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.
५. पुढील प्रक्रिया: यानंतर पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाका. त्यांच्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी (OTP) तिथे भरा.
६. डिक्लेरेशन: विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे द्या आणि डिक्लेरेशन फॉर्मवर क्लिक करा.
७. केवायसी पूर्ण: या सर्व स्टेप्स यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर, तुमची केवायसी पूर्ण झाल्याचा मेसेज तुम्हाला मिळेल आणि तुमची प्रक्रिया पूर्ण होईल.
(रात्री १२ ते पहाटे ५) केवायसी प्रक्रिया पूर्ण करा
आता मुदतवाढ मिळाली असल्यामुळे शेवटच्या दिवसांची वाट न पाहता, दिलेल्या वेळेनुसार (रात्री १२ ते पहाटे ५) केवायसी प्रक्रिया पूर्ण करा आणि योजनेच्या लाभापासून वंचित राहू नका!

